JW प्रसारण
Roku चा वापर करून व्हिडिओ ऑन डिमान्ड पाहा
JW प्रसारण यावरील व्हिडिओ ऑन डिमान्ड यातील व्हिडिओ पाहात असताना तुम्ही तो पॉझ, रीवाइन्ड, फास्ट फॉर्वर्ड किंवा स्किप करू शकता. तुम्ही कलेक्शनमधील सगळे व्हिडिओ एका वेळेसच किंवा एकेक करून पाहू शकता.
(नोंद: या उपयुक्त माहितीमध्ये बऱ्याच ठिकाणी Roku 3 रिमोटचे चित्र दिले आहे. तुमच्या आणि या रिमोटमध्ये फरक असू शकतो.)
JW प्रसारणाच्या होम पेजवरील व्हिडिओ ऑन डिमान्ड निवडून त्यात कोणतेकोणते व्हिडिओ कॅटेगरी उपलब्ध आहेत ते पाहा. एखादा व्हिडिओ शोधून तो पाहण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा:
व्हिडिओ शोधा
कंट्रोल व्हिडिओ प्लेबॅक
नवीन किंवा फिचर्ड व्हिडिओ पाहा
व्हिडिओ शोधा
व्हिडिओचे सर्व कॅटेगरी पाहण्याकरता Roku रिमोटवरील लेफ्ट आणि राइट अॅरोचा वापर करा. हायलाइट केलेल्या कॅटेगरीचे चित्र, नाव आणि त्याची माहिती स्क्रीनच्या मध्यभागी दिसेल. हायलाइट केलेली कॅटेगरी निवडण्याकरता ओके बटण दाबा.
काही व्हिडिओ अनेक कॅटेगरीमध्ये पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, द प्रॉडिगल रिटर्न्स हा व्हिडिओ चित्रपट, कुटुंब आणि तरुण अशा कॅटेगरीजमध्ये असेल.
प्रत्येक कॅटेगरीमध्ये बरेच व्हिडिओ आहेत. या पेजवरील इतर कॅटेगरी पाहण्याकरता Roku रिमोटचा वापर करून तुम्ही जसजसे पुढे जाल तसतसे हायलाइट झालेल्या व्हिडिओचे नाव आणि त्याचा कालावधी डिटेल्स बबलवर दिसेल.
अप आणि डाउन अॅरो: दुसऱ्या कलेक्शनला नॅव्हीगेट करण्यासाठी याचा उपयोग करा. नॅव्हीगेट करत असताना वरच्या बाजूला त्या-त्या कलेक्शनचे नाव दिसेल.
लेफ्ट आणि राइट अॅरो: कलेक्शनमधील व्हिडिओ पाहण्याकरता याचा उपयोग करा.
टिप: उजव्या बाजूला वरच्या भागात कलेक्शनमध्ये किती व्हिडिओ आहेत ते व हायलाइट केलेला व्हिडिओ दिसेल.
व्हिडिओ निवडण्याकरता व त्याची अधिक माहिती पाहण्याकरता ओके दाबा. या पेजवर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
प्ले: व्हिडिओ सुरुवातीपासून प्ले करा.
प्ले विथ सबटाइटल्स: सध्या सुरू असलेल्या व्हिडिओला सबटाइटल्स उपलब्ध असतील तरच हा ऑपशन दिसेल. हा ऑपशन निवडल्याने व्हिडिओचे सबटाइटल्स दिसतील आणि स्ट्रीमिंग व व्हिडिओ ऑन डिमान्ड यातील सबटाइटल्स (उपलब्ध असतील तेव्हा) एनेबल होतील. सबटाइटल्स डिसएबल करण्यासाठी प्ले विदाउट सबटाइटल्स हा पर्याय निवडा.
प्ले ऑल इन धिस कलेक्शन: सध्या निवडलेल्या व्हिडिओसोबतच या कलेक्शनमधील सर्व व्हिडिओ प्ले करा.
नोंद: कलेक्शनमधील सर्व व्हिडिओ प्ले झाल्यावरच प्लेबॅक स्टॉप होईल.
कंट्रोल व्हिडिओ प्लेबॅक
खाली दिल्याप्रमाणे Roku रिमोटचा वापर करून तुम्ही व्हिडिओ ऑन डिमान्ड या सेक्शनमधील व्हिडिओचे प्लेबॅक कंट्रोल करू शकता:
पॉझ: व्हिडिओ पॉझ करण्यासाठी हे बटण दाबा; आणि तो पुन्हा रिझ्यूम करण्याकरता तेच बटण दाबा.
फास्ट फॉर्वर्ड: व्हिडिओ सुरू असताना प्लेबॅक थांबवून पटकन पुढे जाण्याकरता याचा वापर करा. तुम्हाला जिथून व्हिडिओ पाहायचा आहे तिथपर्यंत व्हिडिओचा प्रोग्रेस इंडिकेटर आल्यावर प्ले बटण दाबा.
टिप: फास्ट फॉर्वर्डचे बटण बरेचदा दाबल्यास स्पीड वाढेल.
रीवाइन्ड: व्हिडिओ सुरू असताना प्लेबॅक थांबवून पुन्हा सुरुवातीपासून तो पाहायचा असेल तर याचा वापर करा. तुम्हाला जिथून व्हिडिओ पाहायचा आहे तिथपर्यंत व्हिडिओचा प्रोग्रेस इंडिकेटर आल्यावर प्ले बटण दाबा.
टिप: रीवाइन्ड बटण बरेचदा दाबल्यास स्पीड वाढेल.
राइट अॅरो: व्हिडिओ सुरू असताना प्लेबॅक थांबवून तुम्हाला १० सेकंद पुढे जायचे असेल तर याचा वापर करा. तुम्हाला जिथून व्हिडिओ पाहायचा आहे तिथपर्यंत व्हिडिओचा प्रोग्रस इंडिकेटर आल्यावर प्ले बटण दाबा.
लेफ्ट अॅरो: व्हिडिओ सुरू असताना प्लेबॅक थांबवून तुम्हाला १० सेकंद पाठीमागे जायचे असेल तर याचा वापर करा. तुम्हाला जिथून व्हिडिओ पाहायचा आहे तिथपर्यंत व्हिडिओचा प्रोग्रस इंडिकेटर आल्यावर प्ले बटण दाबा.
डाउन अॅरो: काही सेकंदाकरता व्हिडिओची माहिती डिस्प्ले करण्याकरता हे बटण दाबा. डिस्प्ले झालेली माहिती काढून टाकण्याकरता पुन्हा हेच बटण दाबा.
अप अॅरो किंवा बॅक: परत व्हिडिओ डिटेल्स पेजवर जाण्याकरता या बटणांचा वापर करा.
नवीन किंवा फिचर्ड व्हिडिओ पाहा
JW प्रसारणाच्या होम पेजवरील व्हिडिओ ऑन डिमान्ड यामध्ये दोन खास कलेक्शन्स उपलब्ध आहेत:
फिचर्ड: या कलेक्शनमध्ये काही खास व्हिडिओ आहेत; जसे की आठवड्याच्या सभांशी किंवा कौटुंबिक उपासनेशी संबंधित व्हिडिओ.
लेटेस्ट: अलीकडेच अॅड केलेले सहा नवीन व्हिडिओ.
या कलेक्शनमधील एखादा व्हिडिओ निवडण्याकरता खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा:
अप किंवा डाउन अॅरोचा वापर करून एखादे कलेक्शन हायलाइट करा.
हायलाइट केलेल्या कलेक्शनमधील व्हिडिओची यादी पाहण्याकरता ओके बटण दाबा.
अप किंवा डाउन अॅरोचा वापर करून एखादा व्हिडिओ निवडा.
हायलाइट केलेला व्हिडिओ निवडण्याकरता आणि त्याची माहिती डिस्प्ले करण्याकरता ओके बटण दाबा.
नोंद: यापैकी एखाद्या खास कलेक्शनमधील सर्व व्हिडिओ प्ले करण्याकरता प्ले ऑल इन धिस कलेक्शन या बटणावर क्लिक करा.