व्हिडिओ पाहण्यासाठी

डावीकडून उजवीकडे: बहीण नादेझ्दा कोरोबोच्को, भाऊ इगोर क्लेट्‌किन, आणि भाऊ निकोलेय कोनोनेन्को

१ अप्रिल २०२४ | अपडेट: ३० जुलै २०२४
रशिया

अपडेट—तीन जणांना दोषी ठरवण्यात आलं | “हार मानणं हा पर्याय नाही”

अपडेट—तीन जणांना दोषी ठरवण्यात आलं | “हार मानणं हा पर्याय नाही”

३० जुलै २०२४ ला, खाबारोव्हस्क प्रांतातल्या निकोलेव्स्क-ऑन-अमूर या शहराच्या कोर्टाने भाऊ इगोर क्लेट्‌किन, भाऊ निकोलेय कोनोनेन्को, आणि बहिण नादेझ्दा कोरोबोच्को यांना दोषी ठरवलं. इगोर आणि निकोलेय यांना सहा वर्षांच्या, तर नादेझ्दा यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण सध्या या सर्वांना तुरुंगात जायची गरज नाही.

थोडक्यात माहिती

यहोवाला एकनिष्ठ राहणाऱ्‍या आणि “तू माझा देव आहेस,” असं विश्‍वासाने म्हणणाऱ्‍या सगळ्या भाऊबहिणींची यहोवा देव प्रेमाने काळाजी घेतो. त्यासाठी आम्ही त्याचे मनापासून आभार मानतो.—स्तोत्र ३१:१४.

घटनाक्रम

  1. ११ ऑक्टोबर २०२१

    इगोर आणि नादेझ्दा यांच्या घराची झडती घेण्यात आली. इगोर यांना काही काळासाठी जेलमध्ये टाकण्यात आलं

  2. १२ ऑक्टोबर २०२१

    नादेझ्दा यांची अधिकाऱ्‍यांकडून उलटतपासणी

  3. ● १३ ऑक्टोबर २०२१

    इगोर यांना तुरुंगातून सुटका मिळाली

  4. ● १४ ऑक्टोबर २०२१

    इगोर आणि नादेझ्दा यांच्यावर शहर सोडून जाण्याची बंदी घालण्यात आली

  5. २७ सप्टेंबर २०२२

    निकोलेय यांच्यावर शहर सोडून जाण्याची बंदी घालण्यात आली

  6. ● १६ जानेवारी २०२३

    गुन्हेगारी खटला सुरू झाला