व्हिडिओ पाहण्यासाठी

भाऊ वॉलीरी बायलो

२२ जुलै २०२४
रशिया

भाऊ वॉलीरी बायलो यांना तुरुंगवासाची शिक्षा

भाऊ वॉलीरी बायलो यांना तुरुंगवासाची शिक्षा

३ जुलै २०२४ ला, क्रॅस्नोडार क्षेत्रातल्या अबिनस्की जिल्हा कोर्टाने, भाऊ वॉलीरी बायलो यांना दोषी ठरवलं आणि दोन वर्षं सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. सध्या ते कैदेतच आहेत.

थोडक्यात माहिती

आम्हाला खातरी आहे, की भाऊ वॉलीरी आणि तुरुंगात असलेल्या इतर भाऊबहिणींना यहोवा देव त्याच्या ‘कायमच्या प्रेमाचं’ संरक्षण देत राहील.—यिर्मया ३१:३.

घटनाक्रम

  1. २८ मार्च, २०२४

    गुन्ह्याचा खटला दाखल करण्यात आला

  2. २ एप्रिल, २०२४

    भावाची उलटतपासणी करण्यात आली. त्यानंतर, देशाला धोका असणाऱ्‍या संघटनेच्या कामांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि काही काळासाठी जेलमध्ये टाकण्यात आलं

  3. ४ एप्रिल, २०२४

    खटल्याची सुनावणी होईपर्यंत तुरुंगात टाकण्यात आलं

  4. २६ जून, २०२४

    खटला सुरू झाला

  5. ३ जुलै, २०२४

    फक्‍त तीन सुनावण्या झाल्यानंतर न्यायाधीशाने भाऊ वॉलीरी यांना दोषी ठरवलं आणि दोन वर्षं सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली