६ जून २०२३
आंतरराष्ट्रीय बातम्या
रामापो इथला जागतिक मुख्यालयाचा प्रकल्प
रामापो प्रकल्पासाठी आणखी एक परवानगी मिळाली
१ जून २०२३ ला न्यू यॉर्क राज्याच्या पर्यावरण संवर्धन विभागाने रामापो प्रकल्पाच्या ठिकाणी तोडलेली झाडं काढून टाकायची परवानगी दिली. झाडं काढायचा काळ संपण्याच्या दोन आठवड्यांआधीच, म्हणजे १८ मार्चला तिथलं झाडं काढायचं काम पूर्ण झालं.
रामापो प्रकल्पाच्या बांधकाम प्रकल्प समितीचे संयोजक ब्रदर रॉबर्ट मॅकरेडमंड म्हणतात: “रामापोसारख्या मोठ्या प्रकल्पासाठी प्रत्येक परवान्यामुळे बांधकाम सुरू करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकता येतं. आमच्यापुढे आलेले बरेच अडथळे यहोवाने दूर केलेले आम्ही पाहिले आहेत. भविष्यात येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करायला तो आम्हाला कशी मदत करेल हे पाहायला आम्ही उत्सुक आहोत.”—यशया ५७:१४.
संपूर्ण बांधकामाची परवानगी मिळवण्यासाठी बांधकाम प्रकल्प समिती, स्थानिक आधिकाऱ्यांसोबत मिळून सातत्याने काम करत आहे.