व्हिडिओ पाहण्यासाठी

रामापो प्रकल्पाची झलक. चौकोनात: २८ जून २०२३ ला रामापोच्या शहर विकास प्राधिकरणाची सभा

३ जुलै २०२३
आंतरराष्ट्रीय बातम्या

रामापो इथला जागतिक मुख्यालयाचा प्रकल्प

रामापो प्रकल्पासाठी मोठी परवानगी मिळाली

रामापो प्रकल्पासाठी मोठी परवानगी मिळाली

२८ जून २०२३ ला, अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या रामापो प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. रामापोच्या शहर विकास प्राधिकरणाच्या सगळ्या सदस्यांनी या प्रकल्पाच्या बांधकाम योजनेला परवानगी दिली. या योजनेमधल्या काही बारीकसारीक गोष्टी ठरवायच्या बाकी असल्या, तरी या परवानगीमुळे आपल्याला हे काम पुढे नेता येणार आहे.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, शहर विकास प्राधिकरणाच्या सभेत स्थानिक लोकांनी आणि अधिकाऱ्‍यांनी आपल्या प्रकल्पाबद्दल कोणताच आक्षेप घेतला नाही. बांधकाम प्रकल्प समितीचे भाऊ केथ कॅडी म्हणतात: “प्राधिकरणासमोर आपला प्लॅन सादर करण्यासाठी आणि लागू होणारे सगळे नियम पाळण्यासाठी आम्ही बरेच महिने काम केलं. आपल्या प्लॅनसाठी प्राधिकरणाने पटकन परवानगी द्यावी हाच आमचा प्रयत्न होता.” प्राधिकरणाने आमच्या मेहनतीची दखल घेतली आणि एका नंतर एक, असे सगळे ठराव एकमताने मंजूर केले. बांधकाम प्रकल्प समितीचे आणखी एक भाऊ डेव्हिड सोटो म्हणतात: “या संपूर्ण चर्चेला आणि निकाल लागायला एका तासापेक्षा कमी वेळ लागला! शहर विकास प्राधिकरणाने या कामात खूप मेहनत घेतली आणि आम्हाला सहकार्य केलं याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. शहर विकास विभागासोबत पुढेही काम करायला आम्ही उत्सुक आहोत.”

या परवानगीमुळे रामापो प्रकल्पाची काही महत्त्वाची कामं सुरू करता येतील. ब्रदर कॅडी म्हणतात: “एकदा का इथली झाडं काढली, की कंत्राटदारांना इथे काम सुरू करता येईल. यामुळे पुढच्या वर्षाच्या शेवटीशेवटी इथे काम करण्यासाठी बऱ्‍याच स्वयंसेवकांची गरज पडेल. त्या दिवशी शहर विकास प्राधिकरणाच्या सभेत उपस्थित असलेल्या आम्हा सगळ्यांना एकमताने दिलेल्या या परवानगीमुळे खूप आनंद झाला.”

रामापो प्रकल्पासाठी आपल्याला अलीकडेच जी परवानगी मिळाली, त्यासाठी आम्ही यहोवाचे खूप आभार मानतो. या प्रकल्पात काम करणाऱ्‍या भाऊबहिणींनी “चांगल्या कामासाठी एकमेकांना प्रोत्साहन” देत राहावं, म्हणून यहोवाने त्यांच्यावर आशीर्वाद देत राहावेत अशी आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करतो.—नहेम्या २:१८.