व्हिडिओ पाहण्यासाठी

लग्न न करता सोबत राहण्याबद्दल बायबल काय म्हणतं?

लग्न न करता सोबत राहण्याबद्दल बायबल काय म्हणतं?

बायबलचं उत्तर

 बायबल सांगतं की आपण “अनैतिक लैंगिक कृत्यांपासून स्वतःला दूर ठेवावं” अशी देवाची इच्छा आहे. (१ थेस्सलनीकाकर ४:३) बायबलप्रमाणे ‘अनैतिक लैंगिक कृत्यांमध्ये’ व्यभिचार, समलैंगिक संबंध आणि एकमेकांशी लग्न न झालेल्या स्त्रीपुरुषांचे शारीरिक संबंध या गोष्टी येतात.

 एखाद्या जोडप्याने लग्न झाल्यावरच सोबत राहावं असं देवाला का वाटतं?

  •   विवाहाची व्यवस्था देवाने केली आहे. देवाने पहिल्या मानवी जोडप्याला एकत्र आणून विवाहाची व्यवस्था सुरू केली. (उत्पत्ती २:२२-२४) एका स्त्रीने आणि पुरुषाने फक्‍त काही काळासाठी नाही, तर लग्न करून कायम एकमेकांसोबत राहावं अशी त्याची इच्छा होती.

  •   मानवांसाठी काय चांगलं आहे हे देवालाच सगळ्यात चांगलं माहीत आहे. विवाहाचं बंधन कायमचं असावं आणि त्यामुळे कुटुंबातल्या सगळ्यांना फायदा आणि संरक्षण मिळावं अशा प्रकारे देवाने ही व्यवस्था केली आहे. एका उदाहरणाचा विचार करा. तुम्ही एखादं टेबल विकत घेतलंय आणि त्याचे सुटे भाग जोडून तुम्हाला ते बनवायचं आहे. टेबलचे सुटे भाग कसे जोडायचे याबद्दल कंपनीने दिलेल्या मार्गदर्शिकेत काही सूचना दिल्या आहेत. या सूचनांप्रमाणे तुम्ही ते भाग जोडले तर टेबल व्यवस्थित तयार होईल. त्याच प्रकारे यशस्वी कौटुंबिक नाती जोडण्यासाठी देवाने आपल्याला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आणि जे लोक देवाच्या मार्गदर्शनाचं पालन करतात त्यांना नेहमी फायदा होतो.​—यशया ४८:१७, १८.

    टेबलचे सुटे भाग जोडण्याबद्दल कंपनी मार्गदर्शिकेत काही सूचना देते. त्याच प्रकारे, यशस्वी कौटुंबिक नाती जोडण्यासाठी देव आपल्याला मार्गदर्शक सूचना देतो

  •   लग्न न करता शारीरिक संबंध ठेवल्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. जसं की, इच्छा नसताना होणारी गर्भधारणा, लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार, तसंच मानसिक आणि भावनिक समस्या.

  •   देवाने पुरुषांना आणि स्त्रियांना लैंगिक संबंधांतून मुलांना जन्म देण्याची क्षमता दिली आहे. देव जीवनाला पवित्र समजतो आणि मुलांना जन्म देण्याची क्षमता ही त्याने दिलेली एक मौल्यवान भेट आहे. आपण विवाहाच्या व्यवस्थेचा आदर करून देवाच्या या भेटीबद्दल कदर दाखवावी अशी देवाची इच्छा आहे.​—इब्री लोकांना १३:४.

 आपण एकमेकांसाठी योग्य आहोत का हे पाहण्यासाठी एखाद्या जोडप्याने लग्नाआधीच सोबत राहावं का?

 आपण एकमेकांसाठी योग्य आहोत का हे पाहण्यासाठी काही जोडपी लग्नाआधीच सोबत राहतात. जर त्यांचं पटलं नाही तर ते वेगळे होतात. पण असं करून पाहणं हे काही यशस्वी विवाहाचं रहस्य नाही. उलट, दोघंही जोडीदार जेव्हा लग्न करून एकमेकांसोबत कायम राहण्याचं वचन देतात आणि समस्या सोडवण्याचा सोबत मिळून प्रयत्न करतात तेव्हा त्यांचं नातं यशस्वी होतं. a विवाहामुळे स्त्री आणि पुरुष कायमच्या बंधनात जोडले जातात.​—मत्तय १९:६.

 पती-पत्नी आपलं नातं मजबूत कसं करू शकतात?

 वैवाहिक जीवनात समस्या येणार. पण बायबलमधला सल्ला पाळल्यामुळे पती-पत्नीचं नातं मजबूत होऊ शकतं. काही सल्ले पुढे दिले आहेत: