‘आनंदाच्या संदेशाची घोषणा करा!’
यहोवाच्या साक्षीदारांचं २०२४ सालचं अधिवेशन
मोफत प्रवेश • वर्गणी गोळा केली जाणार नाही
या अधिवेशनात तुम्ही काय पाहाल?
शुक्रवार: आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकांमध्ये येशूच्या जीवनाचं केलेलं वर्णन अचूक आहे, याचे पुरावे पाहा. या अहवालांमधून आज आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हे आपल्याला शिकायला मिळेल.
शनिवार: येशूच्या जन्माबद्दल आणि बालपणाबद्दल कोणत्या भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या? आणि त्या खरंच पूर्ण झाल्या का?
रविवार: या दिवशी बायबलवर आधारित एक जाहीर भाषण दिलं जाईल. त्याचा विषय आहे “वाईट बातम्यांना का घाबरू नये?” जगभरातली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असली, तरी पुढे चांगलं भविष्य असेल याची आज लाखो लोकांना खातरी का आहे हे जाणून घ्या.
व्हिडिओ नाटक
येशूच्या सेवाकार्याची कहाणी: भाग १
जगाचा खरा प्रकाश
येशूच्या लहानपणी बऱ्याच आश्चर्यकारक घटना घडल्या. चमत्काराने झालेला त्याचा जन्मही त्या घटनांपैकीच एक होता. एका क्रूर राजाने त्याला मारून टाकायचा प्रयत्न केला. म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याला इजिप्तला नेलं. मग, काही काळाने त्याने काही बुद्धिमान शिक्षकांना आश्चर्यचकित करून टाकलं. शुक्रवारी आणि शनिवारी दाखवल्या जाणाऱ्या दोन भागांच्या व्हिडिओ नाटकामध्ये या आणि इतर घटना कशा घडल्या ते पाहा.
यावर्षाच्या अधिवेशनाबद्दलचे खाली दिलेले व्हिडिओ पाहा.
आमच्या अधिवेशनांमध्ये काय होतं?
यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनात काय होतं याची एक झलक पाहा.
यहोवाच्या साक्षीदारांचं २०२४ सालचं अधिवेशन: ‘आनंदाच्या संदेशाची घोषणा करा!’
या वर्षाच्या अधिवेशनाची झलक पाहा.
व्हिडिओ नाटकाची झलक: येशूच्या सेवाकार्याची कहाणी
येशूचा जन्म चमत्काराने झाला हे बऱ्याच लोकांना माहीत आहे. पण त्याच्याआधी आणि नंतर कोणत्या घटना घडल्या?