बाप्तिस्मा-ख्रिश्चनांसाठी आवश्यक
“ही घटना . . . तुम्हाला वाचवणाऱ्या बाप्तिस्म्याचे चिन्ह आहे.”—१ पेत्र ३:२१.
१, २. (क) मुलांनी बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्त केल्यावर काही आईवडिलांना कसं वाटतं? (ख) ’तुम्ही आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आहे का?’ असा प्रश्न बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असणाऱ्यांना का विचारला जातो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असणाऱ्या इतर जणांसोबत ९ वर्षांची मारीया उभी राहते, तेव्हा तिचे आईवडील तिच्याकडे पाहतात. मग वक्ता दोन प्रश्न विचारतो आणि मारीया अगदी मोठ्याने आणि स्पष्ट आवाजात उत्तर देते. त्यानंतर तिचा बाप्तिस्मा होतो.
२ मारीयाने आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आणि बाप्तिस्मा घेतला तेव्हा तिच्या आईवडिलांना तिचा खूप अभिमान वाटला. पण बाप्तिस्मा होण्याआधी मारीयाच्या आईला थोडी चिंता वाटत होती. तिला बरेच प्रश्न पडले. जसं की: ‘बाप्तिस्मा घेण्याचं मारीयाचं वय झालं आहे का? यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्याच्या गांभीर्याची तिला जाणीव आहे का? बाप्तिस्मा घेण्यासाठी तिने अजून थोडं थांबावं का?’ मुलं जेव्हा बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्त करतात, तेव्हा बऱ्याच प्रेमळ आईवडिलांना असेच प्रश्न पडतात. (उप. ५:५) असे प्रश्न मनात येणं साहजिक आहे, कारण यहोवाला आपलं जीवन समर्पित करणं आणि बाप्तिस्मा घेणं हा एक सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे.—“ तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं आहे का?” ही चौकट पाहा.
३, ४. (क) बाप्तिस्मा घेणं खूप महत्त्वाचं आहे, हे प्रेषित पेत्रने कसं समजवलं? (ख) नोहाने बांधलेल्या जहाजाची तुलना पेत्रने बाप्तिस्म्याशी का केली?
१ पेत्र ३:२०, २१ वाचा.) नोहा बांधत असलेल्या जहाजावरून स्पष्टपणे दिसून येत होतं, की त्याला मनापासून यहोवाची इच्छा पूर्ण करायची होती. यहोवाने त्याला जे काम दिलं होतं ते त्याने विश्वासूपणे पार पाडलं. नोहाने दाखवलेल्या विश्वासामुळेच यहोवाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जलप्रलयापासून वाचवलं. पण नोहाचा उल्लेख करण्याद्वारे पेत्रला काय सांगायचं होतं?
३ नोहाने जहाज बांधण्याची तुलना प्रेषित पेत्रने बाप्तिस्म्याशी केली. हे “तुम्हाला वाचवणाऱ्या बाप्तिस्म्याचे चिन्ह आहे,” असं त्याने म्हटलं. (४ नोहा बांधत असलेलं जहाज जेव्हा लोकांनी पाहिलं, तेव्हा त्यांना समजलं की त्याचा देवावर विश्वास आहे. त्याच प्रकारे, जेव्हा लोक एखाद्याला बाप्तिस्मा घेताना पाहतात तेव्हा त्यांना माहीत असतं, की येशू ख्रिस्तावर विश्वास असल्यामुळे त्याने देवाला समर्पण केलं आहे. ज्यांचा बाप्तिस्मा होतो ते नोहासारखंच देवाची आज्ञा पाळतात आणि त्याने दिलेलं काम पूर्ण करतात. यहोवाने नोहाला जलप्रलयापासून वाचवलं होतं तसंच तो दुष्ट जगाचा नाश करेल तेव्हा त्याच्या बाप्तिस्माप्राप्त विश्वासू सेवकांनाही तो वाचवेल. (मार्क १३:१०; प्रकटी. ७:९, १०) यावरून स्पष्टच आहे, की यहोवाला समर्पण करणं आणि बाप्तिस्मा घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर कोणी बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय लांबणीवर टाकत असेल किंवा टाळाटाळ करत असेल, तर सर्वकाळाचं जीवन मिळवण्याची संधी तो गमावू शकतो.
५. आपण या लेखात काय शिकणार आहोत?
५ आपण पाहिलं की बाप्तिस्मा घेणं हा खूप गंभीर निर्णय आहे. आता आपण पुढे दिलेल्या तीन प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. बायबल बाप्तिस्म्याबद्दल काय सांगतं? बाप्तिस्मा घेण्याआधी एका व्यक्तीने काय करणं गरजेचं आहे? बाप्तिस्म्याचं महत्त्व लक्षात ठेवून आपल्या मुलांना किंवा बायबल विद्यार्थ्यांना शिकवणं का गरजेचं आहे?
बायबल बाप्तिस्म्याबद्दल काय सांगतं?
६, ७. (क) योहानने दिलेल्या बाप्तिस्म्याचा काय अर्थ होतो? (ख) कोणाचा बाप्तिस्मा सर्वांपेक्षा वेगळा होता आणि का?
६ लोकांना बाप्तिस्मा द्यायला कोणी सुरुवात केली, याबद्दल आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. तो होता बाप्तिस्मा देणारा योहान. (मत्त. ३:१-६) पण लोक बाप्तिस्मा घ्यायला त्याच्याकडे का यायचे? त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रात दिलेल्या आज्ञांचं पालन केलं नव्हतं. त्यांनी पाप केलं व त्याबद्दल त्यांना मनापासून दुःख वाटत होतं, हे दाखवण्यासाठी ते बाप्तिस्मा घ्यायचे. यावरून ते दाखवायचे की त्यांना आपल्या पापांबद्दल पस्तावा आहे. पण योहानने जो सर्वात महत्त्वपूर्ण बाप्तिस्मा दिला, त्याचा अर्थ मात्र पूर्णपणे वेगळा होता. देवाचा परिपूर्ण पुत्र येशू याला बाप्तिस्मा देण्याचा मोठा बहुमान योहानला मिळाला होता. (मत्त. ३:१३-१७) पण येशूच्या हातून तर कधीच कोणतं पाप घडलं नव्हतं आणि त्याला पश्चात्ताप करण्याची गरज नव्हती. (१ पेत्र २:२२) तरी येशूने बाप्तिस्मा का घेतला? बाप्तिस्मा घेऊन त्याने दाखवलं, की तो आता यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचं जीवन अर्पण करत आहे.—इब्री १०:७.
७ येशूने प्रचारकार्य सुरू केल्यानंतर त्याचे शिष्य इतरांना बाप्तिस्मा देऊ लागले. (योहा. ३:२२; ४:१, २) त्यांनीही आज्ञांचं पालन केलं नव्हतं. याबद्दल त्यांना पस्तावा होत असल्यामुळे या लोकांनीही बाप्तिस्मा घेतला. पण येशूचं पुनरुत्थान झाल्यावर त्याचे शिष्य बनणाऱ्यांना मात्र वेगळ्या कारणासाठी बाप्तिस्मा घ्यावा लागणार होता.
८. (क) येशूचं पुनरुत्थान झाल्यावर त्याने कोणती आज्ञा दिली? (ख) ख्रिश्चनांनी बाप्तिस्मा घेणं का गरजेचं आहे?
८ इ.स. ३३ मध्ये येशूचं पुनरुत्थान झाल्याच्या काही वेळा नंतर तो ५०० पेक्षा जास्त पुरुष, स्त्रिया आणि कदाचित मुलांशीही बोलला असावा. कदाचित हीच ती वेळ असावी, जेव्हा तो म्हणाला, “जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, व मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.” (मत्त. २८:१९, २०; १ करिंथ. १५:६) येशूने त्याच्या अनुयायांना शिष्य बनवण्याची आज्ञा दिली. शिवाय, येशूचा शिष्य बनण्यासाठी किंवा त्याचं “जू” वाहण्यासाठी एखाद्याने बाप्तिस्मा घेणं गरजेचं होतं. (मत्त. ११:२९, ३०) देवाच्या इच्छेप्रमाणे त्याची सेवा करणाऱ्या एका व्यक्तीने आधी हे स्वीकारलं पाहिजे, की देव त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी येशूचा वापर करत आहे. त्यानंतरच ती बाप्तिस्मा घेऊ शकते. अशा प्रकारच्या बाप्तिस्म्याचाच देव स्वीकार करतो. बायबलच्या अहवालावरून आपल्याला कळतं, की येशूच्या सुरुवातीच्या शिष्यांना चांगल्या प्रकारे माहीत होतं की बाप्तिस्मा घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण थोडं थांबावं आणि नंतर बाप्तिस्मा घ्यावा असा त्यांनी विचार केला नाही.—प्रे. कार्ये २:४१; ९:१८; १६:१४, १५, ३२, ३३.
बाप्तिस्मा घेण्यासाठी उशीर करू नका
९, १०. आपण कूशी माणसाच्या आणि शौलच्या उदाहरणांवरून बाप्तिस्म्याबद्दल काय शिकू शकतो?
९ प्रेषितांची कार्ये ८:३५, ३६ वाचा. एका कूशी माणसाने यहुदी धर्म स्वीकारला होता. तो यरुशलेमच्या मंदिरात उपासना करून घरी परत यायला निघाला होता. त्या वेळी यहोवाच्या दूताने त्याला प्रचार करण्यासाठी फिलिप्पला त्याच्याकडे पाठवलं. फिलिप्पने “त्याला येशूविषयीचा आनंदाचा संदेश सांगितला.” यावर त्या कूशी माणसाने काय केलं? येशूला प्रभू म्हणून स्वीकारणं किती महत्त्वाचं आहे हे त्याला समजलं. म्हणून त्याने वेळ वाया न घालवता लगेच बाप्तिस्मा घेतला, कारण यहोवा ख्रिश्चनांकडून जी अपेक्षा करत होता त्यानुसार कार्यं करण्याची त्याची इच्छा होती.
१० दुसरं उदाहरण आहे शौल नावाच्या यहुदी माणसाचं. एके काळी संपूर्ण यहुदी राष्ट्र यहोवाला समर्पित होतं, पण त्यांनी यहोवाची आज्ञा मोडली आणि त्यामुळे यहोवाने त्यांना सोडून दिलं. पण शौलला वाटायचं की यहुदी अजूनही देवाची सेवा योग्य पद्धतीने करत आहेत आणि म्हणून तो ख्रिश्चनांचा छळ करायचा. तसंच त्याला माहीत होतं की येशूचा मृत्यू झाला आहे. पण एके दिवशी पुनरुत्थान झालेला येशू स्वर्गातून शौलशी बोलला, प्रे. कार्ये ९:१७, १८; गलती. १:१४) शौल त्यानंतर प्रेषित पौल या नावाने ओळखला जाऊ लागला. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा त्याला समजलं की देव आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी येशूचा वापर करत आहे, तेव्हा त्याने लगेच बाप्तिस्मा घेतला.—प्रेषितांची कार्ये २२:१२-१६ वाचा.
मग शौलने काय केलं? त्याने आनंदाने हनन्या नावाच्या ख्रिस्ती शिष्याची मदत स्वीकारली. बायबल म्हणतं: “मग, तो उठला आणि त्याने बाप्तिस्मा घेतला.” (११. (क) बायबल विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा घेण्यासाठी कशामुळे प्रोत्साहन मिळतं? (ख) जेव्हा एखाद्याचा बाप्तिस्मा होतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं?
११ आज तरुण आणि वृद्ध बायबल विद्यार्थ्यांच्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. त्यांना बायबलचं सत्य शिकायला आणि त्यावर विश्वास ठेवायला आवडतं. म्हणून यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्यासाठी आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी ते खूप उत्सुक असतात. खरंतर, संमेलन आणि अधिवेशनात बाप्तिस्म्याचं भाषण खूप खास असतं. बायबल विद्यार्थी सत्य शिकून बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय घेतात, तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांना खूप आनंद होतो. तसंच, मुलांनी बाप्तिस्म्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनाही आनंद होतो. २०१७ च्या सेवा वर्षादरम्यान २,८४,००० पेक्षा जास्त लोकांनी बाप्तिस्मा घेऊन हे दाखवलं, की त्यांनी आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आहे. (प्रे. कार्ये १३:४८) याचा अर्थ, ख्रिश्चनांनी बाप्तिस्मा घेणं किती आवश्यक आहे हे त्यांना समजलं आहे. पण बाप्तिस्मा घेण्याआधी त्यांनी कोणतं पाऊल उचलणं गरजेचं आहे?
१२. बाप्तिस्मा घेण्यापूर्वी एका बायबल विद्यार्थ्याने कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?
१२ बाप्तिस्मा घेण्याआधी बायबल विद्यार्थ्यांनी देवाबद्दल सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. तसंच, मानवांसाठी आणि पृथ्वीसाठी देवाचा काय संकल्प आहे व मानवजातीला वाचवण्यासाठी त्याने काय केलं आहे, हेसुद्धा त्यांनी शिकून घेतलं पाहिजे. (१ तीम. २:३-६) मग देवाच्या नियमांचं पालन करण्यासाठी आणि त्याला वीट आणणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी त्यांनी विश्वास विकसित करणं गरजेचं आहे. (प्रे. कार्ये ३:१९) कारण यहोवाला वीट आणणाऱ्या गोष्टी करत असलेल्या व्यक्तीचं समर्पण तो स्वीकारत नाही. (१ करिंथ. ६:९, १०) पण इतकंच करणं पुरेसं आहे का? यहोवाला आपलं जीवन समर्पित करायची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंडळीच्या सभांना हजर राहिलं पाहिजे. शिवाय त्यांनी नियमितपणे आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला पाहिजे व दुसऱ्यांना शिकवलं पाहिजे. ख्रिस्ताचा शिष्य बनण्यासाठी एका विद्यार्थ्याने हे सर्व करणं गरजेचं आहे. (प्रे. कार्ये १:८) विद्यार्थ्याने या सर्व गोष्टी केल्यानंतरच आपल्या वैयक्तिक प्रार्थनेत तो यहोवाला समर्पण करू शकतो आणि बाप्तिस्मा घेऊ शकतो.
विद्यार्थ्यांना बाप्तिस्म्याचं ध्येय ठेवायला मदत करा
१३. इतरांना शिकवत असताना आपण हे का लक्षात ठेवणं गरजेचं आहे की खरे ख्रिस्ती बनण्यासाठी बाप्तिस्मा घेणं आवश्यक आहे?
१३ आपल्या मुलांना आणि बायबल विद्यार्थ्यांना या सर्व आवश्यक गोष्टी करण्यासाठी मदत करताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की बाप्तिस्मा घेतल्याशिवाय कोणीही येशूचा खरा शिष्य बनू शकत नाही. मग समर्पण आणि बाप्तिस्मा किती महत्त्वपूर्ण आहे, हे योग्य वेळी त्यांना सांगताना आपण कचरणार नाही. आपल्या मुलांनी आणि बायबल विद्यार्थ्यांनी प्रगती करत राहावी आणि बाप्तिस्मा घ्यावा अशी आपली मनापासून इच्छा आहे!
१४. बाप्तिस्मा घेण्यासाठी आपण दुसऱ्यांवर दबाव का आणत नाही?
१४ पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की कोणीही आपल्या मुलावर किंवा बायबल विद्यार्थ्यावर बाप्तिस्मा घेण्याचा दबाव आणू नये. यहोवा कोणावरही त्याची सेवा करण्यासाठी जबरदस्ती करत नाही. (१ योहा. ४:८) आपण इतरांना शिकवतो, तेव्हा आपण त्यांना हे समजण्यासाठी मदत केली पाहिजे की त्यांचा यहोवासोबत वैयक्तिक नातेसंबंध असणं खूप महत्त्वाचं आहे. देवाबद्दल सत्य जाणल्यामुळे जर बायबल विद्यार्थी मनापासून आभारी असेल आणि खऱ्या ख्रिश्चनांकडून जी अपेक्षा केली जाते ती पूर्ण करण्यासाठी सर्व काही करायला तयार असेल, तर बाप्तिस्मा घ्यायला तो नक्कीच प्रेरित होईल.—२ करिंथ. ५:१४, १५.
१५, १६. (क) बाप्तिस्मा घेण्यासाठी अमुक वय असणं गरजेचं आहे का? स्पष्ट करा. (ख) बायबल विद्यार्थ्याचा जरी आधी बाप्तिस्मा झाला असला, तरी यहोवाचा साक्षीदार बनण्यासाठी त्याने पुन्हा बाप्तिस्मा घेणं गरजेचं का आहे?
१५ अमुक वय झाल्यावरच बाप्तिस्मा घेतला पाहिजे असा नियम नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. काही विद्यार्थी लगेच प्रगती करतात तर काही प्रगती करण्यासाठी थोडा जास्त वेळ घेतात. काही जण लहान वयात बाप्तिस्मा घेतात आणि मोठे झाल्यावरही यहोवाला विश्वासू राहतात. तर काही असे आहेत ज्यांना मोठं झाल्यावर सत्य मिळालं आणि त्यानंतर त्यांनी बाप्तिस्मा घेतला. काहींनी तर आपली शंभरी ओलांडल्यावर बाप्तिस्मा घेतला आहे!
१६ एका स्त्रीने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केला. पण त्या आधी तिचा वेगवेगळ्या चर्चमध्ये बाप्तिस्मा झाला होता. म्हणून तिने बायबल अभ्यास घेणाऱ्या बहिणीला विचारलं, की मी पुन्हा बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे का? त्या बहिणीने तिला बायबलमधून या विषयाशी संबंधित काही वचनं दाखवली आणि तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. बायबलमध्ये आपल्याकडून काय अपेक्षा केली आहे, हे जेव्हा त्या स्त्रीला समजलं तेव्हा तिचं वय जवळपास ८० होतं, तरीही तिने बाप्तिस्मा घेतला. आपण या उदाहरणावरून काय शिकतो? यहोवाच्या इच्छेबद्दल सत्य जाणून घेतल्यावर आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हाच देव त्याचा स्वीकार करतो. याचा अर्थ, आपण जरी सत्य शिकण्याच्या आधी बाप्तिस्मा घेतला असेल, तरी आपल्याला पुन्हा बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे.—प्रेषितांची कार्ये १९:३-५ वाचा.
१७. बाप्तिस्म्याच्या दिवशी बाप्तिस्मा घेणाऱ्याने कशावर विचार करणं गरजेचं आहे?
१७ एका व्यक्तीचा बाप्तिस्मा होतो तेव्हा तो दिवस तिच्यासाठी खूप आनंदाचा असतो. पण त्यासोबतच समर्पण आणि बाप्तिस्मा यांमध्ये कोणत्या गोष्टी गोवलेल्या आहेत यांबद्दल गंभीरपणे विचार करण्याचीही ती वेळ असते. खरे ख्रिस्ती या नात्याने आपल्याकडून ज्या काही अपेक्षा केल्या जातात त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. येशूचे शिष्य म्हणून आपण, “यापुढे स्वतःसाठी नाही, तर जो [आपल्यासाठी] मेला आणि उठवला गेला, त्याच्यासाठी जगावे.”—२ करिंथ. ५:१५; मत्त. १६:२४.
१८. पुढच्या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
१८ आपण या लेखात चर्चा केली की खरे ख्रिस्ती बनण्याचा निर्णय हा खरंच एक गंभीर निर्णय आहे. म्हणूनच लेखाच्या सुरुवातीला दिलेले प्रश्न मारीयाच्या आईच्या मनात आले होते. जर तुम्ही एक पालक असाल तर कदाचित तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचारले असतील: ‘माझं मूल बाप्तिस्मा घ्यायला खरंच तयार आहे का? देवाला समर्पण करण्यासाठी त्याच्याकडे यहोवाबद्दल पुरेसं ज्ञान आहे का? माझ्या मुलाने बाप्तिस्मा घेण्याआधी चांगलं शिक्षण आणि नोकरी मिळवली पाहिजे का? बाप्तिस्मा घेतल्यावर जर त्याच्या हातून गंभीर पाप घडलं तर काय?’ या सर्व प्रश्नांवर आपण पुढच्या लेखात चर्चा करणार आहोत. तसंच, ख्रिस्ती पालक बाप्तिस्म्याबद्दल योग्य दृष्टिकोन कसा ठेवू शकतात, हेदेखील आपण पाहणार आहोत.