आपण जुनं व्यक्तिमत्त्व काढून ते दूर कसं ठेवू शकतो?
“आपले जुने व्यक्तिमत्त्व त्याच्या वाईट सवयींसहित काढून टाका.”—कलस्सै. ३:९.
१, २. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा अनेकांच्या काय लक्षात येतं? उदाहरणं द्या.
यहोवाचे साक्षीदार इतरांपेक्षा किती वेगळे आहेत हे सहसा अनेकांच्या लक्षात येतं. याचं एक उदाहरण विचारात घ्या. अॅन्टोन गील नावाच्या एका लेखकाने, नाझी जर्मनीतल्या साक्षीदारांच्या गुणांचं कौतुक करताना म्हटलं: “यहोवाचे साक्षीदार हे नाझींच्या द्वेषाचे खास लक्ष्य बनले होते . . . १९३९ पर्यंत त्यांच्यापैकी ६,००० जण [छळ छावण्यांमध्ये] होते.” पुढे या लेखकाने म्हटलं, की यहोवाच्या साक्षीदारांना अमानुष यातना देण्यात आल्या; तरीसुद्धा भरवशालायक असण्यासाठी, दबावाखाली असतानाही शांत राहण्यासाठी, त्यांच्या देवाला एकनिष्ठ राहण्यासाठी आणि त्यांच्यातल्या एकीसाठी ते ओळखले जायचे.
२ काही वर्षांपूर्वी, दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांनासुद्धा यहोवाच्या साक्षीदारांबद्दल एक विशेष गोष्ट लक्षात आली. त्या देशात, अशी एक वेळ होती जेव्हा वेगळ्या वर्णाच्या साक्षीदारांना एकत्र येण्याची परवानगी नव्हती. पण रविवार, १८ डिसेंबर २०११ रोजी, दक्षिण आफ्रिकेतून आणि जवळपासच्या देशांतून वेगवेगळ्या वंशांतले ७८,००० पेक्षा अधिक साक्षीदार एकत्र जमले; जोहानिसबर्गमधल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियममध्ये एका खास कार्यक्रमासाठी ते आले होते. त्या वेळी, स्टेडियमच्या एका मॅनेजरने म्हटलं: “या स्टेडियममध्ये मी आजवर पाहिलेला हा सगळ्यात शिस्तप्रिय जमाव आहे. सगळ्यांचाच पेहराव किती शालीन आहे! शिवाय, तुम्ही लोकांनी हे स्टेडियमसुद्धा अगदी छान स्वच्छ केलं आहे! पण सगळ्यात विशेष म्हणजे, वेगवेगळ्या वंशातले असूनसुद्धा तुमच्यात एकी आहे.”
३. आपला बंधुसमाज इतका विशेष का आहे?
१ पेत्र ५:९, तळटीप.) पण, दुसऱ्या कोणत्याही संघटनेपेक्षा आपण वेगळे का आहोत? कारण, बायबलच्या आणि पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. आपण, “जुने व्यक्तिमत्त्व” काढून “नवीन व्यक्तिमत्त्व” परिधान करतो.—कलस्सै. ३:९, १०.
३ खरंच, आपला आंतरराष्ट्रीय बंधुसमाज इतका विशेष का आहे हे साक्षीदार नसलेल्या लोकांनासुद्धा स्पष्टपणे दिसून येतं. (४. या लेखात कोणत्या गोष्टींची चर्चा केली जाईल? आणि का?
४ जुनं व्यक्तिमत्त्व काढून टाकल्यानंतर ते नेहमी दूर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या लेखात आपण आधी हे पाहू, की आपल्याला जुनं व्यक्तिमत्त्व कसं काढून टाकता येईल आणि असं करणं का गरजेचं आहे. तसंच, एखादी व्यक्ती चुकीच्या गोष्टी करण्यात कितीही गुरफटून गेली असली, तरी तिला आपल्या जीवनात मोठे बदल करणं का शक्य आहे. त्यानंतर या लेखात आपण हे पाहू, की अनेक वर्षांपासून सत्यात असलेले लोक, त्यांनी काढून टाकलेलं जुनं व्यक्तिमत्त्व नेहमी दूर कसं ठेवू शकतात. या गोष्टींची चर्चा करणं का गरजेचं आहे? कारण, दुःखाची गोष्ट म्हणजे, एकेकाळी यहोवाची सेवा करणाऱ्या काही जणांनी या बाबतीत पुरेशी काळजी घेतली नाही; आणि सत्यात येण्यापूर्वी ते जसं वागायाचे-बोलायचे तसंच पुन्हा वागू लागले आहेत. म्हणूनच, आपल्यापैकी प्रत्येकाने पुढे दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे: “आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.”—१ करिंथ. १०:१२.
सर्व अनैतिक लैंगिक इच्छा “मारून टाका”
५. (क) जुनं व्यक्तिमत्त्व लगेच काढून टाकणं का गरजेचं आहे? उदाहरण देऊन सांगा. (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) जुन्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असलेल्या कोणत्या सवयींचा उल्लेख कलस्सैकर ३:५-९ मध्ये करण्यात आला आहे?
५ तुमच्या अंगावरचे कपडे जर मळलेले असतील किंवा त्यांना घाणेरडा वास येत असेल, तर तुम्ही काय कराल? तुम्ही ते लगेच काढून टाकाल. अगदी त्याच प्रकारे, यहोवाला वीट आणणाऱ्या गोष्टी आपण करत असू, तर त्या गोष्टी करण्याचं आपण लगेच सोडून दिलं पाहिजे. अशा वाईट गोष्टींबद्दल किंवा सवयींबद्दल बोलताना पौल म्हणाला: “या सर्व गोष्टी आपल्यामधून काढून टाकल्या पाहिजेत.” यांपैकी दोन गोष्टींवर आता आपण चर्चा करू या: अनैतिक लैंगिक कृत्ये आणि अशुद्धपणा.—कलस्सैकर ३:५-९ वाचा.
६, ७. (क) जुनं व्यक्तिमत्त्व काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात हे पौलच्या शब्दांवरून कसं दिसून येतं? (ख) एकेकाळी साकूरा कशा प्रकारचं जीवन जगत होती? कोणत्या गोष्टीमुळे तिला आपली जीवनशैली बदलण्यास बळ मिळालं?
६ अनैतिक लैंगिक कृत्ये. बायबलमध्ये “अनैतिक लैंगिक कृत्ये” असं जे म्हटलं आहे त्यात, कायद्याने विवाहित नसलेल्या व्यक्तींमधला लैंगिक संबंध समाविष्ट आहे. पौलने म्हटलं, की अनैतिक लैंगिक कृत्यांच्या बाबतीत ख्रिश्चनांनी त्यांच्या ‘शरीराच्या अवयवांना मारून टाकलं पाहिजे.’ याचा अर्थ, मनातून चुकीच्या इच्छा काढून टाकण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. असं करणं सोपं नसलं, तरी आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
७ ही गोष्ट, जपानमधल्या साकूरा नावाच्या एका बहिणीच्या अनुभवावरून दिसून येते. * लहानाची मोठी होत असताना साकूराला नेहमी खूप एकटं आणि दुःखी वाटायचं. आपला एकटेपणा घालवण्यासाठी, वयाच्या १५ व्या वर्षापासून ती वेगवेगळ्या पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवू लागली. तिने तीन वेळा गर्भपातसुद्धा केला. ती म्हणते: “अनैतिक संबंध ठेवल्यामुळे सुरुवातीला मला सुरक्षित वाटायचं. इतरांचं आपल्यावर प्रेम आहे, त्यांना आपण हवे आहोत असं मला वाटायचं. पण, मी जितके जास्त लैंगिक संबंध ठेवायचे तितकंच जास्त मला असुरक्षित वाटू लागलं.” वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत साकूरा अशा प्रकारचं जीवन जगत राहिली. मग, ती यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागली. ती जे काही शिकत होती ते तिला आवडू लागलं. यहोवाने तिला तिची अनैतिक जीवनशैली बदलण्यास आणि मनात खोलवर रुजलेल्या दोषीपणाच्या व शरमेच्या भावनांवर मात करण्यास मदत केली. सध्या साकूरा एक पायनियर म्हणून सेवा करत आहे आणि आता तिला मुळीच एकटं वाटत नाही. ती म्हणते: “दररोज यहोवाच्या प्रेमाची ऊब अनुभवत असल्यामुळे मला सुरक्षित वाटतं आणि मी खूप आनंदी आहे.”
अशुद्ध सवयींवर मात कशी कराल?
८. अशा कोणत्या काही सवयी आहेत ज्यांमुळे आपण देवाच्या नजरेत अशुद्ध ठरू शकतो?
८ अशुद्धपणा. बायबलमध्ये “अशुद्धपणा” असं जे म्हटलं आहे ते फक्त अनैतिक लैंगिक कृत्यांपुरतंच सीमित नाही; तर त्यात आणखीनही काही गोवलेलं आहे. उदाहरणार्थ, धूम्रपान करणं किंवा अश्लील विनोद सांगणं या गोष्टींचाही त्यात समावेश होऊ शकतो. (२ करिंथ. ७:१; इफिस. ५:३, ४) तसंच “अशुद्धपणा” यात, लोक गुप्तपणे करत असलेल्या वाईट गोष्टीही येऊ शकतात; जसं की, लैंगिक इच्छा उत्तेजित करणारी पुस्तकं वाचणं किंवा पोर्नोग्राफी (अश्लील चित्र) पाहणं. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे पुढे एखाद्याला हस्तमैथुनासारखी अशुद्ध सवय जडू शकते.—कलस्सै. ३:५. *
९. “अनावर लैंगिक वासना” उत्पन्न करण्याचे काय परिणाम होऊ शकतात?
९ पोर्नोग्राफी पाहण्याची सवय असलेल्या लोकांमध्ये “अनावर लैंगिक वासना” उत्पन्न होऊन त्यांना सेक्सचं व्यसन जडू शकतं. संशोधकांच्या मते, पोर्नोग्राफीचं व्यसन हे दारूच्या किंवा ड्रग्जच्या व्यसनासारखंच आहे. म्हणूनच, पोर्नोग्राफी पाहण्याचे परिणाम इतके भयंकर का असू शकतात, हे आपण समजू शकतो. त्या भयंकर परिणामांमध्ये, मनात खोलवर दडलेली शरमेची भावना, कामात लक्ष न लागणं, कुटुंबातला आनंद हरवणं, घटस्फोट आणि आत्महत्या या गोष्टी येऊ शकतात. एका मनुष्याला त्याचं पोर्नोग्राफीचं व्यसन सुटून एक वर्षं झाल्यानंतर तो म्हणतो: “मी गमावलेला आत्मसन्मान आता कुठं पुन्हा मला मिळाला आहे.”
१०. रिबेरोने पोर्नोग्राफीच्या व्यसनातून स्वतःची सुटका कशी केली?
१० अनेकांना, पोर्नोग्राफीच्या व्यसनातून स्वतःची सुटका करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पण, या संघर्षात ते नक्कीच विजयी ठरू शकतात. ही गोष्ट, ब्राझीलमध्ये राहणाऱ्या रिबेरो नावाच्या एका व्यक्तीच्या अनुभवावरून दिसून येते. किशोरवयात असताना त्याने घर सोडलं आणि तो कागद रिसायकल (रद्दीपासून कागद बनवण्याची प्रक्रिया) करणाऱ्या एका कारखान्यात काम करू लागला. रद्दीत त्याला अश्लील मासिकंसुद्धा पाहायला मिळायची. रिबेरो म्हणतो: “हळूहळू मला त्यांचं व्यसन लागलं. आणि पुढे तर ते इतकं वाढलं, की मी ज्या स्त्रीसोबत राहायचो ती कधी एकदा घराबाहेर जाते आणि मला अश्लील व्हिडिओ पाहायला मिळतात, असं मला वाटायचं.” एकदा कामावर असताना, रिसायकल करण्यासाठी ठेवलेला पुस्तकांचा एक गठ्ठा रिबेरोने पाहिला. त्याची नजर त्यातल्या एका पुस्तकावर गेली; ते पुस्तक होतं, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. त्याने ते घेतलं आणि वाचलं. त्यात त्याने जे काही वाचलं, ते आवडल्यामुळे तो यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागला. पण तरी, पोर्नोग्राफीच्या व्यसनातून स्वतःची सुटका करण्यासाठी रिबेरोला बराच काळ लागला. त्यासाठी कोणत्या गोष्टीने त्याला मदत केली? तो म्हणतो: “प्रार्थना, बायबलचा अभ्यास आणि शिकलेल्या गोष्टींवर मनन केल्यामुळे देवाच्या गुणांबद्दल माझी कदर वाढत गेली आणि शेवटी देवावरचं माझं प्रेम पोर्नोग्राफीबद्दलच्या इच्छेपेक्षा अधिक प्रबळ झालं.” बायबलच्या तसंच देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने रिबेरोला आपल्या जीवनात बदल करण्यास मदत झाली. पुढे त्याचा बाप्तिस्मा झाला आणि आज तो मंडळीत एक वडील म्हणून सेवा करत आहे.
११. पोर्नोग्राफीच्या व्यसनातून स्वतःची सुटका करण्यासाठी एका व्यक्तीला काय करण्याची गरज आहे?
११ तुमच्या लक्षात आलं असेल, की पोर्नोग्राफीच्या व्यसनातून स्वतःची सुटका करण्यासाठी रिबेरोने बायबलचा फक्त अभ्यासच केला नाही; तर, बायबलमधून वाचलेली माहिती मनापर्यंत पोचण्यासाठी त्याने त्या माहितीवर सखोल विचारही केला. तसंच, मदतीसाठी त्याने यहोवाला कळकळून प्रार्थनासुद्धा केली. या गोष्टींमुळे रिबेरोचं देवावरील प्रेम इतकं वाढलं, की पोर्नोग्राफी पाहण्याच्या इच्छेवर तो मात करू शकला. आपणसुद्धा, पोर्नोग्राफीच्या व्यसनातून स्वतःची सुटका करण्यासाठी, यहोवावर अगदी मनापासून प्रेम केलं पाहिजे आणि वाईट गोष्टींचा द्वेष केला पाहिजे.—स्तोत्र ९७:१० वाचा.
राग, शिवीगाळ आणि खोटं बोलणं सोडून द्या
१२. स्टीवनला त्याचा रागीट स्वभाव आणि शिवीगाळ करण्याचं सोडून देण्यास कशामुळे मदत झाली?
१२ काही लोकांना लगेच राग येतो आणि ते इतरांना कठोर व अपमानास्पद गोष्टी बोलतात. त्यांच्या अशा वागण्याचा त्यांच्या कुटुंबावरही परिणाम होतो. याचं एक उदाहरण विचारात घ्या. ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा स्टीवन नावाचा एक पिता खूप शिवीगाळ करायचा आणि अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्याच्या रागाचा पारा चढायचा. तो म्हणतो: “मी आणि माझी पत्नी तीन वेळा एकमेकांपासून वेगळे झालो होतो आणि घटस्फोट घेण्याची प्रक्रियाही चालू होती.” मग, त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली; आणि शिकत असलेल्या गोष्टी स्टीवन आपल्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करू लागला. तो म्हणतो, की यहोवाची ओळख होण्यापूर्वी एखाद्या गोष्टीवरून त्याला इतका राग यायचा, की आता त्याचा विस्फोट होतो की काय असं त्याला वाटायचं. पण, बायबलचा सल्ला लागू करायला लागल्यानंतर मात्र गोष्टी बदलू लागल्या. तो म्हणतो: “आमचं कौटुंबिक जीवन पूर्णपणे बदलून गेलं. यहोवाच्या मदतीमुळे, आता माझा स्वभाव खूप शांत झाला आहे आणि मला मनाची शांती आहे.” आज स्टीवन एक सहायक सेवक म्हणून मंडळीत सेवा करत आहे आणि त्याची पत्नी गेल्या कित्येक वर्षांपासून पायनियर या नात्याने सेवा करत आहे. स्टीवनच्या मंडळीतल्या वडिलांनी म्हटलं: “स्टीवन एक शांत मनोवृत्तीचा, मेहनती आणि अतिशय नम्र बांधव आहे.” त्यांनी असंही म्हटलं, की स्टीवनच्या रागाचा पारा चढल्याचं त्यांनी कधीच पाहिलेलं नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वात झालेल्या या बदलाचं श्रेय स्टीवन स्वतःकडे घेत नाही. उलट तो म्हणतो: “माझ्या व्यक्तिमत्त्वात पूर्णपणे बदल करण्यासाठी मी जर यहोवाची मदत स्वीकारली नसती, तर या सुंदर आशीर्वादांपैकी कोणतेच आशीर्वाद मला मिळाले नसते.”
१३. राग येणं इतकं वाईट का आहे? आणि बायबल आपल्याला कोणता इशारा देतं?
१३ बायबल आपल्याला इशारा देतं, की आपण राग, कठोरपणे बोलणं आणि इतरांवर आरडाओरड करणं या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. (इफिस. ४:३१) कारण, या गोष्टींमुळे पुढे सहसा हिंसक कृत्यं घडून येतात. जगातल्या अनेकांना असं वाटतं, की राग येणं किंवा हिंसकपणे वागणं यात काहीच गैर नाही. पण, खरंतर अशा प्रकारे वागल्यामुळे आपल्या निर्माणकर्त्याचा अनादर होतो. आज आपल्या अनेक बंधुभगिनींनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल करून नवीन व्यक्तिमत्त्व परिधान केलं आहे.—स्तोत्र ३७:८-११ वाचा.
१४. हिंसक मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीला नम्र होणं शक्य आहे का?
१४ हॅन्स नावाचा बांधव ऑस्ट्रियामध्ये एका मंडळीत वडील म्हणून सेवा करतो. त्याच्या मंडळीतल्या वडीलवर्गाचे संयोजक म्हणतात: “हॅन्स अतिशय नम्र असलेल्या बांधवांपैकी एक आहे.” पण, हॅन्स नेहमीच नम्र होता असं नाही. किशोरवयात असतानाच तो दारूच्या आहारी गेला आणि हिंसक बनला. एकदा तर दारूच्या नशेत, त्याच्या रागाचा पारा इतका चढला की त्याने स्वतःच्या मैत्रिणीचा खून केला. त्यामुळे त्याला २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण, ही शिक्षा होऊनही सुरुवातीला त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीच बदल झाला नाही. मग, त्याच्या आईने मंडळीतल्या एका वडिलांना त्याला भेटण्याची विनंती केली. त्यानंतर हॅन्सने बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली. तो म्हणतो: “जुनं व्यक्तिमत्त्व काढून टाकण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. पण, बायबलमधल्या अनेक वचनांमुळे मला धीर मिळाला; जसं की, यशया ५५:७. त्यात म्हटलं आहे: ‘दुर्जन आपला मार्ग सोडो.’ आणि १ करिंथकर ६:११. त्यात, वाईट मार्ग सोडून दिलेल्यांबद्दल म्हटलं आहे: ‘तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते.’ नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करण्यासाठी यहोवा कित्येक वर्षांपर्यंत त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे मला धीराने मदत करत राहिला.” तुरुंगात असताना हॅन्सचा बाप्तिस्मा झाला, आणि साडेसतरा वर्षं तुरुंगात राहिल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. तो म्हणतो: “यहोवाने माझ्यावर अपार दया केली आणि मला क्षमा केलं याबद्दल मी त्याचा खूप आभारी आहे.”
१५. जुन्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असलेली आणखी एक गोष्ट कोणती आहे? आणि त्याबद्दल बायबल काय म्हणतं?
१५ खोटं बोलणं हासुद्धा जुन्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. उदाहरणार्थ, कर चुकवण्यासाठी किंवा केलेल्या चुकांची जबाबदारी टाळण्यासाठी अनेक जण खोटं स्तो. ३१:५) त्यामुळे, आपल्या सर्व उपासकांनी नेहमी “खरे बोलावे,” त्यांनी ‘खोटे बोलू नये’ अशी तो अपेक्षा करतो. (इफिस. ४:२५; कलस्सै. ३:९) म्हणूनच, कितीही लाजिरवाणं किंवा कठीण वाटत असलं तरी आपण नेहमी खरं बोललं पाहिजे.—नीति. ६:१६-१९.
बोलतात. पण, यहोवा “सत्यस्वरूप” देव आहे. (त्यांनी कसा विजय मिळवला?
१६. जुनं व्यक्तिमत्त्व काढून टाकण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत मिळू शकते?
१६ स्वतःच्या बळावर जुनं व्यक्तिमत्त्व काढून टाकणं शक्य नाही. साकूरा, रिबेरो, स्टीवन आणि हॅन्स या सर्वांना आपली जुनी जीवनशैली बदलण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पण, देवाच्या वचनाच्या सामर्थ्याने आणि त्याच्या पवित्र आत्म्याने त्यांना जीवनात बदल करण्यास मदत केली. (लूक ११:१३; इब्री ४:१२) त्या सामर्थ्याचा लाभ घेण्यासाठी आपणही दररोज बायबलचं वाचन केलं पाहिजे, त्यावर मनन केलं पाहिजे आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करता याव्यात म्हणून बुद्धीसाठी व शक्तीसाठी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. (यहो. १:८; स्तो. ११९:९७; १ थेस्सलनी. ५:१७) याशिवाय, मंडळीच्या सभांची तयारी करून सभांना उपस्थित राहिल्यामुळेसुद्धा देवाच्या वचनाचा आणि त्याच्या पवित्र आत्म्याचा आपल्याला लाभ होऊ शकतो. (इब्री १०:२४, २५) तसंच, यहोवाच्या संघटनेनं पुरवलेल्या अनेक तरतुदींचाही आपण उपयोग केला पाहिजे; जसं की, आपली प्रकाशनं, JW ब्रॉडकास्टिंग, JW लायब्ररी आणि jw.org वेबसाईट.—लूक १२:४२.
१७. पुढच्या लेखात आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत?
१७ या लेखात आपण पाहिलं, की यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी ख्रिश्चनांनी कोणत्या वाईट गोष्टी स्वतःमधून काढून टाकल्या पाहिजेत आणि त्यांपासून दूर कसं राहिलं पाहिजे. पण, एवढंच करणं पुरेसं नाही. आपण नवीन व्यक्तिमत्त्वसुद्धा परिधान केलं पाहिजे आणि त्याला कायम आपल्या जीवनाचा भाग बनवलं पाहिजे. हे कसं करता येईल याबद्दल आपण पुढच्या लेखात चर्चा करू.
^ परि. 7 काही नावं बदलण्यात आली आहेत.
^ परि. 8 देवाच्या प्रेमात टिकून राहा, पृष्ठ २४९ वरील परिशिष्ट पाहा; तसंच, क्वेश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क, व्हॉल्यूम १, अध्याय २५ पाहा.