व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

योग्य कारण नसताना एक अविवाहित पुरुष आणि स्त्री रात्री एकाच घरात राहिले असतील तर त्यांनी पाप केलं आहे असा याचा अर्थ होतो का आणि यासाठी न्यायिक समिती बनवली जावी का?

हो. योग्य कारण नसताना रात्री एकाच घरात सोबत एकटं राहणं अनैतिक कृत्य केल्याचा सबळ पुरावा आहे. म्हणून, जेव्हा योग्य कारण नसताना एकत्र राहण्याची घटना घडते तेव्हा न्यायिक समिती बसवली पाहिजे.—१ करिंथ. ६:१८.

न्यायिक समिती बसवली पाहिजे की नाही हे ठरवताना वडीलवर्ग प्रत्येक परिस्थितीचा विचार करतात. उदाहरणार्थ, ती दोघं डेटिंग करत होती का? ज्या प्रकारे ते एकमेकांशी वागत होते त्याबद्दल त्यांना वडिलांकडून आधी सल्ला देण्यात आला होता का? त्या रात्री ते एकत्र का होते? त्याबद्दल त्यांनी आधीच ठरवलं होतं का? त्यांच्यासमोर इतरही पर्याय होते का, की अशा काही गोष्टी घडल्या ज्या त्यांच्या हाताबाहेर होत्या; जसं की, अशा अनपेक्षित घटना किंवा निकडीचा प्रसंग ज्यामध्ये एकत्र राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. (उप. ९:११) ते कुठे झोपले होते? प्रत्येक परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे इतर काही अशी माहिती असू शकते जिच्या आधारावर वडील निर्णय घेतात.

मिळालेल्या सर्व माहितीवर विचार केल्यानतंरच वडीलवर्ग हा निर्णय घेतील की न्यायिक समिती बनवावी की नाही.