व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास प्रभावी व मजेशीर बनवा

बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास प्रभावी व मजेशीर बनवा

इस्राएल राष्ट्राला नियुक्‍त देशात घेऊन जाण्यासाठी यहोशवा त्यांचे नेतृत्व करणार होता. आणि हे काम सोपं नव्हतं. पण ते पूर्ण करण्यासाठी यहोवाने त्याला बळ दिलं व त्याला असं प्रोत्साहन दिलं: “तू खंबीर हो व खूप हिंमत धर.” पुढे त्याने यहोशवाला सांगितलं की जर त्याने त्याचं वचन वाचलं आणि त्याचं पालन केलं, तर तो योग्य निर्णय घेऊ शकेल आणि यशस्वी होईल.—यहो. १:७, ८.

आज आपणही “शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण” काळात जगत आहोत. (२ तीम. ३:१) जर आपल्याला यहोशवासारखं यशस्वी व्हायचं असेल, तर आपणही यहोवाने त्याला जे सल्ले दिले होते त्यांचं पालन केलं पाहिजे. आपण नियमितपणे बायबल वाचलं पाहिजे आणि त्यातून आपण जे शिकलो त्याचा वापर करून योग्य निर्णय घेतले पाहिजेत.

पण आपल्यापैकी काहींना कदाचित अभ्यास कसा करायचा तेच माहीत नसेल, म्हणून अभ्यास करणं त्यांना कंटाळवाणं वाटत असावं. पण तरीही बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. “ या सूचनांचा वापर करा.” या चौकटीत दिलेली माहिती अभ्यासातून उपयुक्‍त सल्ले मिळवण्यासाठी आणि तो मजेदार बनवण्यासाठी तुमची मदत करेल.

स्तोत्रकर्त्याने म्हटलं: “तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव; त्यातच मला आनंद आहे.(स्तो. ११९:३५) देवाच्या वचनाचा अभ्यास करताना तुम्हालाही आनंद मिळेल. तुम्ही जसजसा बायबलचा अभ्यास करत राहाल तसतशी त्यातून सुंदर माहिती तुम्हाला मिळत जाईल.

यहोशवासारखं एखाद्या राष्ट्राचं जरी तुम्हाला नेतृत्व करायचं नसलं तरी तुमच्या जीवनात येणाऱ्‍या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. म्हणून यहोशवासारखं देवाच्या वचनाचा अभ्यास करा आणि त्याचं पालन करा. असं केल्यामुळे तुम्ही चांगले निर्णय घ्याल आणि यशस्वी व्हाल.