ईश्वरीय गुण हिऱ्यांपेक्षाही अधिक मौल्यवान
हिऱ्यांना लोक फार मौल्यवान समजतात. काही हिऱ्यांची किंमत तर लाखांच्या घरात आहे. पण असं काही आहे का, ज्याला यहोवा या रत्नांपेक्षाही अधिक मौल्यवान समजतो?
अर्मेनियात राहणारी हायगानूश हिला तिच्या घराजवळ एक पासपोर्ट सापडला. त्यामध्ये काही डेबिट कार्डस आणि बरेच पैसे होते. तिने लगेच याबद्दल आपल्या पतीला सांगितलं. हायगानूश आणि तिचा पती हे दोघेही बाप्तिस्मा रहित प्रचारक होते.
या जोडप्याची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती आणि त्यांच्यावर बरंच कर्जदेखील होतं. पण असं असलं तरी, त्यांनी ती रक्कम आणि तो पासपोर्ट त्यावर असलेल्या पत्त्यावर पोहचवला. या सर्व प्रकारावरून ज्याचा पासपोर्ट हरवला होता तो आणि त्याचं कुटुंब फार आश्चर्यचकित झालं. हायगानूशने आणि तिच्या पतीने त्यांना सांगितलं की ते बायबलचा अभ्यास करत आहेत. आणि त्यातून त्यांना जे काही शिकायला मिळालं त्यामुळे ते प्रामाणिकपणा दाखवू शकले. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी त्या कुटुंबाला यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सांगितलं आणि त्यांना काही प्रकाशनंदेखील दिली.
हायगानूशने दाखवलेल्या प्रामाणिकपणाची कदर म्हणून त्या कुटुंबानं तिला काही पैसे देऊ केले, पण तिने ते स्वीकारले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीची पत्नी हायगानूशला आणि तिच्या पतीला घरी भेटायला आली. आणि त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कदर व्यक्त करण्यासाठी, तिने हायगानूशला हिऱ्याची अंगठी स्वीकारण्यासाठी आर्जव केला.
या कुटुंबाप्रमाणेच इतर कोणीही, हायगानूश आणि तिच्या पतीने दाखवलेला प्रामाणिकपणा पाहून आश्चर्यचकित झालं असतं. पण यहोवालादेखील असंच वाटलं का? त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाला त्याने कोणत्या नजरेतून पाहिलं? त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा खरोखरच मोलाचा ठरला का?
चांगले गुण हे भौतिक गोष्टींपेक्षाही मौल्यवान आहेत
वरील प्रश्नांची उत्तरं देणं कठीण नाही. कारण, यहोवाच्या सेवकांना हे माहीत आहे की, यहोवाच्या नजरेत त्याचे गुण प्रदर्शित करणं हे सोन्या-चांदिपेक्षा किंवा हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान आहे. अनेक लोक ज्या गोष्टींना अनमोल समजतात त्यापेक्षा यहोवाचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. (यश. ५५:८, ९) आणि त्याच्या सेवकांनाही त्याचे गुण प्रदर्शित करण्यात ते घेत असलेली मेहनत फार मोलाची वाटते.
सुज्ञता आणि बुद्धीबद्दल बायबल जे म्हणतं त्यातून ही गोष्ट आपण पाहू शकतो. नीतिसूत्रे ३:१३-१५ म्हणतं: “ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करतो, तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही.” यावरून हे स्पष्टच आहे की चांगल्या गुणांना यहोवा इतर कोणत्याही भौतिक गोष्टींपेक्षा जास्त मौल्यवान समजतो.
मग प्रामाणिकपणाला देखील यहोवा मौल्यवान समजतो का?
यहोवा देव प्रामाणिक आहे. तो “खोटे बोलत नाही.” (तीत १:२, ईझी-टू-रीड व्हर्शन) त्याने प्रेषित पौलाला पहिल्या शतकातील इब्री ख्रिश्चनांना असं लिहिण्यास प्रवृत्त केलं: “आमच्यासाठी प्रार्थना करत राहा; सर्व बाबतीत चांगले [“प्रामाणिकपणे,” NW] वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.”—इब्री १३:१८.
येशू ख्रिस्तानेदेखील प्रामाणिकपणाच्या बाबतीत चांगलं उदाहरण मांडलं. जेव्हा मुख्य याजकाने त्याला म्हटलं, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग.” तेव्हा त्याने प्रामाणिकपणा दाखवून स्वतःची ओळख मसीहा म्हणून करून दिली. यामुळे तिथली न्यायसभा त्याला देवनिंदक म्हणून दोषी ठरवून मृत्युदंड देतील, हे त्याला माहीत होतं. असं असतानादेखील त्याने खरं ते सांगितलं.—मत्त. २६:६३-६७.
समजा आपल्यासमोर अशी परिस्थिती आली, की काही माहिती लपवून किंवा तिच्यात थोडा फेरफार करून सांगितल्यानं आपल्याला फायदा होणार असेल, तेव्हा काय? अशा वेळीही आपण प्रामाणिकपणा दाखवू का?
प्रामाणिकपणा दाखवणं इतकं कठीण का?
या शेवटल्या काळात प्रामाणिक राहणं कठीण जाऊ शकतं. कारण अनेक लोक ‘स्वार्थी व धनलोभी’ बनले २ तीम. ३:२) जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट होते किंवा रोजगार मिळत नाहीत, तेव्हा अनेकांना चोरी करण्यात, इतरांना फसवण्यात किंवा अप्रामाणिकपणे वागण्यात काहीच गैर वाटत नाही. अशा प्रकारची विचारसरणी आज अगदी सर्वसामान्य बनली आहे. त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की स्वतःचा फायदा करून घेण्याचा केवळ एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे अप्रामाणिकपणे वागणं. या चुकीच्या विचारसरणीचा प्रभाव काही ख्रिश्चनांवर देखील झाला आणि त्यांनी ‘अनीतीने पैसे मिळवण्यासाठी’ स्वतःच्या जीवनात काही चुकीचे निर्णय घेतले. यामुळे ख्रिस्ती मंडळीत त्यांनी स्वतःचं चांगलं नावदेखील गमावलं.—१ तीम. ३:८; तीत १:७.
आहेत. (असं असलं तरी अनेक ख्रिस्ती येशूचं अनुकरण करतात. त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की, ईश्वरीय गुण असणं हे कोणत्याही प्रकारच्या धनसंपत्तीपेक्षा किंवा फायद्यापेक्षा अधिक उत्तम व महत्त्वपूर्ण आहे. या कारणामुळेच तरुण ख्रिस्तीदेखील शाळेमध्ये चांगले मार्क मिळवता यावेत म्हणून परीक्षेत कॉपी करत नाहीत. (नीति. २०:२३) हायगानूश या बहिणीप्रमाणे, आपल्याही प्रामाणिकपणाची इतर जण नेहमीच कदर करतील असं नाही. पण तरीदेखील आपण सर्व प्रसंगी प्रामाणिक राहतो. असं करण्याद्वारे यहोवाच्या दृष्टीने जे योग्य ते आपण करतो आणि आपला विवेकही शुद्ध राहतो. या गोष्टी खरोखरच मौल्यवान नाहीत का?
गॅगीक नावाच्या आपल्या बांधवाच्या अनुभवावरून आपल्याला हेच दिसून येतं. तो म्हणतो: “साक्षीदार बनण्याआधी मी एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होतो. टॅक्स चुकवता यावा म्हणून त्या कंपनीचा मालक नफा कमी दाखवायचा. कंपनीतील घोटाळे उघडकीस येऊ नयेत म्हणून, मॅनेजींग डायरेक्टर या नात्यानं मग मला टॅक्स एजेंटला लाच द्यावी लागायची. त्यामुळे माझी ओळख एक अप्रामाणिकपणे वागणारी व्यक्ती म्हणून झाली. पण सत्य शिकल्यानंतर मात्र मी या चुकीच्या गोष्टी करण्यास नकार दिला. ही एक चांगल्या पगाराची नोकरी होती, तरी मी ती सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच मी कंपनीची कायदेशीर नोंदणी केली आणि सर्व टॅक्स प्रामाणिकपणे भरले.”—२ करिंथ. ८:२१.
गॅगीक पुढे म्हणतो: “यामुळे माझं उत्पन्न निम्म्यावर आलं, आणि कुटुंबाचा खर्च कसा भागवावा हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. पण असं असलं तरी मी आता आनंदी आहे. यहोवासमोर मी शुद्ध विवेकानं जाऊ शकतो. माझ्या मुलांसाठी मी एक चांगलं उदाहरण आहे, आणि मंडळीमध्येही मी जबाबदाऱ्या हाताळतो. ज्यांच्यासोबत मी व्यवसाय करतो, त्या टॅक्स ऑडिटर आणि इतर लोकांमध्ये, माझी ओळख एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून आहे.”
यहोवा आपल्याला मदत करतो
जे लोक यहोवाच्या प्रामाणिकपणा सारख्या सुरेख गुणांचं अनुकरण करून त्याच्या नावाचा महिमा करतात, अशांवर तो प्रेम करतो. (तीत २:१०) इतकंच नाही तर त्यांना लागणारी मदत पुरवण्याचं अभिवचनही त्याने दिलं आहे. दावीद राजाला त्याने पुढील वचन लिहिण्यास प्रेरित केलं. “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.”—स्तो. ३७:२५.
विश्वासू रूथच्या उदाहरणावरूनही हेच दिसून येतं. ती तिच्या सासूशी, नामीशी एकनिष्ठ राहिली. आपली सासू वृद्ध झाली आहे असा विचार करून तिने तिला सोडलं नाही. रूथ आपल्या सासूसोबत इस्राएलला गेली आणि तिथं ती खऱ्या देवाची उपासना करू शकली. (रूथ १:१६, १७) रूथ प्रामाणिक व फार मेहनती होती. गरिबांसाठी असलेल्या मोशेच्या नियमानुसार धान्य गोळा करण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली. दाविदाप्रमाणेच यहोवाने रूथ आणि नामीलादेखील कधीही सोडलं नाही. (रूथ २:२-१८) तसंच, यहोवाने रूथला फक्त भौतिक गोष्टीच पुरवल्या नाहीत, तर दाविदाच्या वंशातून येणाऱ्या मसीहाची पूर्वज होण्याचा बहुमानही तिला दिला!—रूथ ४:१३-१७; मत्त. १:५, १६.
हे खरं आहे की आज यहोवाच्या काही सेवकांना स्वतःच्या आर्थिक गरजा भागवणं फार कठीण जातं. पण अप्रामाणिकपणे पैसा मिळवण्याचा सोपा मार्ग निवडण्याऐवजी ते कष्ट करतात. असं करण्याद्वारे ते हे नीति. १२:२४; इफिस. ४:२८.
दाखवून देतात की प्रामाणिकपणा सारख्या ईश्वरीय गुणांना त्यांच्या जीवनात प्रथम स्थान आहे, इतर कोणत्याही भौतिक गोष्टींना नाही.—जगभरातील अनेक ख्रिश्चनांनी रूथप्रमाणेच यहोवावर विश्वास असल्याचं दाखवलं आहे. “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही,” या यहोवाने दिलेल्या वचनावर त्यांचा पूर्ण भरवसा आहे. (इब्री १३:५) यहोवाने वेळोवेळी हे दाखवून दिलं आहे की जे सर्व प्रसंगी प्रामाणिक राहतात त्यांना तो मदत पुरवतो. आपल्या सेवकांच्या गरजा पुरवण्याच्या वचनाला तो नेहमी जागला आहे.—मत्त. ६:३३.
लोक कदाचित हिऱ्यांना आणि इतर गोष्टींना मौल्यवान समजत असतील. पण आपण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो की आपला स्वर्गीय पिता आपल्या चांगल्या गुणांना आणि प्रामाणिकपणाला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मौल्यवान समजतो!