तुम्हाला आठवतं का?
टेहळणी बुरूज नियतकालिकातले अलीकडचे अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरं द्यायला तुम्हाला जमतं का ते पाहा:
कोणत्या चार गोष्टींद्वारे तुम्ही गाण्याचं कौशल्य वाढवू शकता?
गीत पुस्तक समोर पकडून सरळ उभं राहा. तसंच गाताना मोठा श्वास घ्या. तोंड मोठं उघडून गायल्यामुळे तुम्ही मोठ्या आवाजात गाऊ शकता.—टेहळणी बुरूज१७.११, पृ. ५.
प्राचीन इस्राएलमधल्या शरणपुरांची ठिकाणं आणि त्यांना जोडणारे सुव्यवस्थित रस्ते कशा प्रकारे उल्लेखनीय होते?
संपूर्ण राष्ट्रात सहा शरणपुरे होती आणि तिथे पोहोचण्यासाठी सुव्यवस्थित रस्ते होते. यामुळे एका व्यक्तीला तिथे सहज आणि लवकर पोहोचणं शक्य होतं.—टेहळणी बुरूज१७.११, पृ. १४.
देवाने येशूद्वारे दिलेलं खंडणी बलिदान आपल्यासाठी सर्वात चांगली भेट का आहे?
यामुळे आपण आपली कायमस्वरूपी जीवन जगण्याची इच्छा पूर्ण करू शकतो. तसंच पाप आणि मृत्यूपासून सुटका मिळवणंही आपल्याला शक्य होतं. आपण पापी होतो तरीही आदामच्या संततीबद्दल वाटणाऱ्या आपुलकीमुळे देवाने आपल्यासाठी येशूला दिलं.—टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.०३, पृ. ६-७.
येशूच्या पुनरुत्थानाबद्दल स्तोत्र ११८:२२ मध्ये काय सांगण्यात आलं होतं?
येशूला मसीहा म्हणून नाकारण्यात आलं आणि जिवे मारण्यात आलं. त्याला “कोनशिला” म्हणजे कोपऱ्याचा मुख्य दगड बनण्यासाठी त्याचं पुनरुत्थान होणं गरजेचं होतं.—टेहळणी बुरूज१७.१२, पृ. ९-१०.
ज्या वंशावळीतून मसीहा प्रकट होणार होता ती प्रथमपुत्राच्या हक्कावर आधारलेली होती का?
काही वेळा मसीहाचा पूर्वज बनण्याचा हक्क प्रथमपुत्राला देण्यात आला होता, पण नेहमीच नाही. इशायचा पुत्र दावीद हा प्रथमपुत्र नव्हता तरीसुद्धा तो मसीहाचा पूर्वज बनला.—टेहळणी बुरूज१७.१२, पृ. १४-१५.
ख्रिश्चनांनी योग्य प्रमाणात स्वतःवर प्रेम करणं चुकीचं का नाही?
आपण आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखं प्रेम केलं पाहिजे. (मार्क १२:३१) पती “स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात तसेच त्यांनी आपल्या पत्नीवरही प्रेम करावे.” (इफिस. ५:२८) पण स्वतःवर खूप जास्त प्रेम करणं हानीकारक ठरू शकतं.—टेहळणी बुरूज१८.०१, पृ. २३.
आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
आपण देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे, त्यावर मनन केलं पाहिजे आणि शिकलेल्या गोष्टी लागू केल्या पाहिजेत. तसंच आपण यहोवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी पूर्ण मनाने तयार असलं पाहिजे आणि इतरांची मदत स्वीकारून त्याबद्दल कदर बाळगली पाहिजे.—टेहळणी बुरूज१८.०२, पृ. २६.
भविष्य जाणण्यासाठी ज्योतिषशास्त्र आणि भविष्य पाहणं या पद्धतींचा उपयोग करणं योग्य का ठरणार नाही?
याची बरीच कारणं आहेत, पण मुख्य कारण म्हणजे बायबल या पद्धतींचा विरोध करतं.—टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१८.०२, पृ. ४-५.
जेवणाचं आमंत्रण स्वीकारण्याच्या बाबतीत आपण कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?
आपण आमंत्रण स्वीकारतो तेव्हा आपण आपल्या शब्दाला जागलं पाहिजे. (स्तो. १५:४) आपल्याला मिळालेलं आमंत्रण आपण क्षुल्लक कारणासाठी रद्द करू नये. कारण आमंत्रण देणाऱ्याने आपल्या पाहुण्यांसाठी चांगली तयारी केलेली असते.—टेहळणी बुरूज१८.०३, पृ. १८.
नियुक्त बांधव तीमथ्यकडून काय शिकू शकतात?
तीमथ्यला मनापासून लोकांची काळजी होती आणि त्याने आध्यात्मिक गोष्टींना जीवनात पहिल्या स्थानी ठेवलं होतं. त्याने पवित्र सेवेसाठी खूप मेहनत घेतली. तसंच शिकलेल्या गोष्टी लागूही केल्या. तो स्वतःला प्रशिक्षण देत राहिला. तो यहोवाच्या पवित्र आत्म्यावर विसंबून राहिला. वडील आणि सर्वच जण त्याचं अनुकरण करू शकतात.—टेहळणी बुरूज१८.०४, पृ. १३-१४.