जीवन कथा
यहोवा आमच्याशी दयेने वागला
मी माझ्या बायकोसोबत डॅन्यलसोबत पश्चिम आफ्रिकेच्या गाबाँ शहरात पोहोचलो होतो. काही तासांनंतर जेव्हा आम्ही तिथल्या एका हॉटेलमध्ये गेलो तेव्हा हॉटेलच्या रीसेप्शनीस्टने मला विचारलं, की “सर, तुम्ही बॉर्डर पोलिसांना फोन करता का प्लीज?” इथे १९७० नंतर काही वेळासाठी आपल्या कामावर बंदी होती.
डॅन्यल दक्ष असल्यामुळे ती माझ्या कानात कुजबुजली: “पोलिसांना बोलवू नका. ते आधीच इथे आलेत.” पोलिसांची गाडी आमच्या मागे हॉटेलच्या बाहेर उभी होती. काही वेळेतच त्यांनी आम्हाला ताब्यात घेतलं. पण डॅन्यलने सावध केलं ते बरं झालं. कारण त्या थोड्या वेळेत मला काही महत्त्वाची कागदपत्रं एका बांधवाकडे सोपवता आली.
आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना मी हाच विचार करत होतो की डॅन्यल खरंच किती धाडसी आणि आध्यात्मिक विचारसरणीची आहे! मला खरंच खूप चांगली बायको मिळाली आहे! पण असं एकत्र मिळून काम करण्याची ही एकच वेळ नव्हती. डॅन्यल आणि मी बरीच वर्षं एका टीमसारखं काम केलं आहे. आपल्या प्रचाराच्या कामावर बंदी असलेल्या ठिकाणी आम्ही का गेलो? चला आता मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो.
यहोवाने प्रेमाने माझे डोळे उघडले
१९३० साली एका कॅथलिक घरात माझा जन्म झाला. उत्तर फ्रान्सचं क्रोइक्स हे छोटं शहर माझं जन्म ठिकाण आहे. आम्ही दर आठवडी चर्चला जायचो आणि माझे वडील चर्चचे आवेशी सदस्य होते. जवळजवळ १४ वर्षांचा असताना एका प्रसंगामुळे चर्चचा ढोंगीपणा उघड झाला.
दुसऱ्या विश्व युद्धात फ्रान्स जर्मन सेनेच्या ताब्यात होतं. आपल्या भाषणांत आमचे पास्टर विशी शहराच्या नात्झी सरकाराचं समर्थन करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. त्यांची भाषणं ऐकून आम्हाला भीती वाटायची. फ्रान्समध्ये अनेक जण लपूनछपून बीबीसी रेडिओ ऐकायचे. ते मित्र राष्ट्रांकडून प्रसारित केलं जायचं आणि आम्ही ते ऐकायचो. मग एके दिवशी पास्टरने अचानक आपली बाजू बदलली. आता ते दुसऱ्या राष्ट्राचं समर्थन करत होते. १९४४ सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी मित्र राष्ट्रांच्या प्रगतीचा उत्सव साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम योजला. या गोष्टीमुळे मला आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे त्यांच्यावरून माझा भरवसा उठला.
दुसऱ्या विश्व युद्धाच्या काही वर्षांनंतर माझे वडील वारले. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि ती बेल्जियमला राहत होती. वडिलांनंतर माझ्या आईची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. मला कापड उद्योगात नोकरी लागली. माझे मालक आणि त्यांची मुलं कट्टर कॅथलिक होते. माझ्यासमोर एक उज्ज्वल भविष्य होतं. असं असलं तरी मला लवकरच एका परीक्षेला सामोरं जावं लागणार होतं.
माझ्या मोठ्या बहिणीने सीमोनने सत्य स्वीकारलं होतं. १९५३ साली ती आम्हाला भेटायला आली. तिने तिच्या बायबलचा अगदी कुशलतेने वापर करून कॅथलिक चर्चच्या खोट्या
शिकवणींचा म्हणजे नरकाग्नी, त्रैक्य आणि आत्म्याचं अमरत्व यांचा पर्दाफाश केला. ती कॅथलिक बायबल वापरत नसल्यामुळे मी सुरुवातीला तिच्याशी वाद घातला. पण नंतर मला तिचं म्हणणं पटलं. तिने नंतर माझ्यासाठी टेहळणी बुरूजच्या जुन्या प्रती आणल्या. त्या प्रतींमध्ये काय लिहिलं आहे याची मला उत्सुकता होती म्हणून मी त्या रात्री वाचून काढल्या. मला लगेचच पटलं की हेच सत्य आहे. पण तरी माझ्या मनात भीती होती की यहोवाची बाजू घेतल्यामुळे मला माझी नोकरी गमवावी लागेल.मी काही महिन्यांसाठी बायबलचा आणि टेहळणी बुरूजच्या लेखांचा अभ्यास करत राहिलो. कालांतराने मी सभांना जायचा निर्णय घेतला. मंडळीचं प्रेमळ वातावरण पाहून मी भारावून गेलो. सहा महिन्यांसाठी एका बांधवासोबत बायबलचा अभ्यास केल्यानंतर १९५४ सालच्या सप्टेंबर महिन्यात मी बाप्तिस्मा घेतला. नंतर माझी आई आणि धाकटी बहीण सत्यात आले.
पूर्ण वेळच्या सेवेत यहोवावर भरवसा ठेवणं
१९५८ साली होणाऱ्या न्यूयॉर्कच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला हजर राहण्याची मला संधी मिळाली. पण त्याच्या काही आठवड्यांआधी मी माझ्या आईला मृत्यूत गमावलं. मी जेव्हा परतलो तेव्हा माझ्यावर कोणाचीच जबाबदारी नव्हती म्हणून मी माझी नोकरी सोडली आणि पायनियरींग सुरू केली. त्यादरम्यान डॅन्यल डेली नावाच्या एका आवेशी पायनियर बहिणीसोबत मी लग्न केलं. आमचा विवाह १९५९ सालच्या मे महिन्यात पार पडला.
डॅन्यलने तिच्या घरापासून दूर असलेल्या ब्रिटनी नावाच्या गावात तिची पूर्ण वेळची सेवा सुरू केली होती. गाव-खेड्यात जाण्यासाठी तिला सायकलने प्रवास करावा लागायचा, तसंच तिथल्या कॅथलिक लोकांना प्रचार करावा लागायचा. यासाठी तिला हिंमतीची गरज होती. माझ्याप्रमाणेच तिला काळाच्या निकडीची जाणीव होती आणि यामुळेच तिला प्रचार करण्याची प्रेरणा मिळाली. अंत कधीही येऊ शकतो याची जाणीव आम्हाला होती. (मत्त. २५:१३) तिच्या आत्मत्यागाच्या भावनेमुळे आम्हाला आमच्या पूर्ण वेळच्या सेवाकार्यात टिकून राहायला मदत झाली.
आमच्या लग्नाच्या काही दिवसांनंतर आम्हाला विभागीय कार्यात नेमण्यात आलं. आम्ही साध्या जीवनशैलीशी जुळवून घेतलं होतं. आम्ही ज्या पहिल्या मंडळीला भेट दिली त्यात १४ प्रचारक होते. तिथल्या बांधवांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कुठल्याही बांधवाच्या घरी राहणं आम्हाला शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही सभागृहाच्या मंचावर चटई टाकून झोपायचो. ते इतकं आरामदायी नव्हतं, पण आमच्या पाठीसाठी मात्र ते चांगलं होतं!
आम्ही विभागीय कार्यात खूप व्यस्त असायचो. पण डॅन्यलने स्वत:ला या कामाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलं होतं. वडिलांसोबत होणाऱ्या सभा अचानक ठरवल्या जायच्या. अशा वेळी डॅन्यलला बऱ्याचदा आमच्या छोट्या गाडीत माझी वाट पाहत बसावं लागायचं. याबद्दल तिने कधीच तक्रार केली नाही. विभागीय कार्यात आम्ही फक्त दोन वर्षं घालवली. त्यादरम्यान आम्ही शिकलो की विवाहित जोडप्यांसाठी एकमेकांशी प्रामाणिकपणे संवाद साधणं आणि एका टिमसारखं मिळून काम करणं खूप महत्त्वाचं आहे.—उप. ४:९.
नवीन नेमणुकीत आनंदी
१९६२ साली आम्हाला न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन शहरात दहा महिन्यांच्या ३७ व्या गिलियड प्रशालेसाठी आमंत्रित करण्यात आलं. शंभर विद्यार्थ्यांमध्ये फक्त १३ जोडपी होती. तिथे उपस्थित राहण्याची आम्हाला संधी मिळाली याचा आम्हाला खूप आनंद होता. आमच्या मनात तिथल्या खूप चांगल्या आठवणी आहेत. आमच्या वर्गात मजबूत विश्वास असणारे बांधव होते. जसं की फ्रेडरिक फ्रांझ, युलिसीझ ग्लास आणि अॅलक्झॅन्डर एच. मॅकमिलन.
आमच्या प्रशिक्षणादरम्यान, आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करण्याचं कौशल्य वाढवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देण्यात आलं. कधीकधी शनिवारी दुपारी जेव्हा आमचा वर्ग संपायचा तेव्हा आम्हाला न्यूयॉर्क शहरात फिरायला घेऊन जाण्यात यायचं. हा आमच्या प्रशिक्षणाचाच एक भाग होता. आम्हाला माहीत होतं की जे काही आम्ही पाहिलं त्यावर सोमवारी आमची लेखी परीक्षा होणार होती. आम्ही कधीकधी शनिवारी संध्याकाळी पार दमून जायचो. बेथेलमधला एक सदस्य आमच्यासोबत टूर गाईड म्हणून असायचा. तो आम्हाला लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी काही प्रश्न विचारायचा. एकदा शनिवारी पूर्ण दुपार आम्ही त्या शहरात फिरलो. तिथे आम्ही एका वेधशाळेला भेट दिली आणि आम्ही उल्का व उल्कापात यांबद्दल शिकलो. तसंच, अमेरिकन म्यूझियम ऑफ नॅचरल हिसट्रिमध्ये आम्ही सुसर आणि मगर यांच्यात काय फरक आहे हेही शिकलो. बेथेलला परतताना आमच्या टूर गाईडने विचारलं: “तर मग उल्का आणि उल्कापातमध्ये काय फरक आहे?” डॅन्यल पार थकली होती. त्यातच तिने उत्तर दिलं, “उल्कापातला मोठे दात असतात!”
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आमची फ्रांस शाखेत नियुक्ती करण्यात आली. तिथे आम्ही एकत्र मिळून ५३ वर्षं सेवा केली. १९७६ मध्ये माझी शाखा समिती संयोजक म्हणून नियुक्ती झाली. तसंच, आपल्या कार्यावर बंदी किंवा मर्यादा असलेल्या आफ्रिका आणि मध्य पूर्व देशांना भेटी देण्याचीही जबाबदारी मला मिळाली. यामुळेच आम्हाला सुरुवातीला उल्लेख केलेला गाबाँमधला अनुभव आला. खरं सांगायचं तर, अनपेक्षितपणे आलेल्या या जबाबदाऱ्या मी हाताळू शकेन की नाही याची मला शंका होती. पण माझ्या प्रिय पत्नीमुळे, डॅन्यलमुळे मी कोणतीही नेमणूक पार पाडू शकत होतो.
सोबत मिळून केलेला समस्यांचा सामना
सुरुवातीपासूनच आम्हाला बेथेलमध्ये काम करायला आवडायचं. गिलियड प्रशालेला हजर राहण्याआधी पाच महिन्यात डॅन्यल इंग्रजी शिकली होती. यामुळे ती भाषांतराच्या कामात अगदी कुशल बनली. बेथेलच्या कामात आम्हाला खूप समाधान मिळायचं. पण मंडळीच्या कामात सहभाग घेतल्यामुळे आमचा आनंद आणखी वाढायचा. मला आठवतं, मी डॅन्यलसोबत रात्री उशीरा पॅरीस मेट्रो पकडायचो तेव्हा आम्ही खूप थकलेलो असायचो. पण सोबत मिळून प्रगतिशील बायबल अभ्यास चालवल्यामुळे आम्ही आनंदी होतो. पण दु:खाची गोष्टी म्हणजे, डॅन्यल आजारी पडली आणि आता तिला आधीसारखं आवेशाने सेवा करणं शक्य होणार नव्हतं.
१९९३ साली तिला स्तनाच्या कॅन्सरने ग्रासलं. यामुळे तिला शस्त्रक्रिया व किमोथेरपी हे उपचार करावे लागले. या उपचारांमुळे तिला खूप वेदना व्हायच्या. याच्या पंधरा वर्षांनंतर, तिला पुन्हा कॅन्सर झाला आणि या वेळी तो तीव्र स्वरूपाचा होता. पण भाषांतरकार म्हणून काम करणं तिला इतकं आवडायचं की थोडं बरं वाटल्यावर ती परत तिचं काम सुरू करायची.
डॅन्यलला हा निर्दयी आजार असला तरी बेथेल सोडण्याचा विचार आमच्या मनात आला नाही. पण बेथेलमध्ये रुग्ण म्हणून जगणं खूप आव्हानात्मक असतं. खासकरून तुमची परिस्थिती किती गंभीर आहे हे इतरांना माहीत नसतं तेव्हा. (नीति. १४:१३) तिच्या सत्तरीतही तिला पाहून कोणी म्हटलं नसतं की ती आजारी आहे. तेव्हासुद्धा ती गोड दिसायची! तिने कधीच स्वतःची कीव केली नाही. याउलट तिचं पूर्ण लक्ष इतरांना मदत करण्यावर होतं. तिला माहीत होतं की इतरांचं लक्षपूर्वक ऐकल्यामुळे त्यांना दुःखातून सावरायला मदत होऊ शकते. (नीति. १७:१७) ज्या बहिणींना कॅन्सरचा सामना करावा लागत होता त्यांना मदत करण्यासाठी डॅन्यल आपला अनुभव सांगायची.
आम्हाला नवीन समस्यांनाही सामोरं जावं लागलं. जेव्हा डॅन्यलला पूर्ण वेळच्या सेवेत काम करणं अशक्य झालं तेव्हा मला नीति. १८:२२.
जास्तीत-जास्त मदत करण्यावर तिने लक्ष केंद्रित केलं. तिने मला खूप मदत केली. यामुळे मला ३७ वर्षं शाखा समिती संयोजक म्हणून सेवा करत राहणं शक्य झालं. उदाहरणार्थ, आम्हाला आमच्या खोलीत एकत्र दुपारचं जेवण करता यावं व रोज थोडा आराम करता यावा यासाठी ती सगळी तयारी करून ठेवायची.—रोज चिंतांचा सामना करताना
जीवनाबद्दल डॅन्यलचा सकारात्मक दृष्टिकोन होता. पण मग तिला तिसऱ्यांदा कॅन्सर झाला. त्या वेळी तर आम्ही अगदी हतबल झालो. किमोथेरपी आणि रेडिओथेरपी या उपचारपद्धती तिला इतक्या पिळवटून टाकायच्या की तिला चालणं मुश्किल व्हायचं. आणि जेव्हा कुशल भाषांतरकार असलेल्या माझ्या प्रिय पत्नीच्या तोंडून शब्द फुटत नव्हते तेव्हा माझ्या मनाला तीव्र वेदना व्हायच्या.
आम्हाला जरी हतबल झाल्यासारखं वाटलं तरी आम्ही सतत प्रार्थना करत राहायचो. आम्हाला याची खातरी होती की आमच्या क्षमतेपलीकडे यहोवा आमच्यावर कोणतंच दुःख येऊ देणार नाही. (१ करिंथ. १०:१३) यहोवाचं वचन, बेथेलमधले वैद्यकीय मदत पुरवणारे आणि आध्यात्मिक कुटुंब यांमुळे आम्हाला मदत झाली. यहोवाने जी मदत केली आम्ही त्याची नेहमी कदर बाळगण्याचा प्रयत्न करतो.
आम्ही कोणती उपचार पद्धती स्वीकारावी यासाठी आम्ही सहसा यहोवाला मार्गदर्शनासाठी प्रार्थना करायचो. एकदा तर आम्ही कोणत्याही उपचारपद्धतीविना दिवस काढले. कारण २३ वर्षांपासून डॅन्यलचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कळतच नव्हतं की किमोथेरपीच्या प्रत्येक उपचारानंतर डॅन्यल बेशुद्ध का पडते. दुसऱ्या उपचाराबद्दल त्यांना माहीत नव्हतं. आता सर्वकाही आम्हालाच ठरवायचं होतं. त्यामुळे आम्हाला पुढची खूप चिंता वाटली. त्यानंतर कॅन्सरचा उपचार करणारा दुसरा एक डॉक्टर डॅन्यलचा उपचार करायला तयार झाला. असं वाटत होतं की आमच्या चिंतेतून बाहेर येण्यासाठी हा मार्ग यहोवानेच मोकळा केला होता.
आम्ही उद्याची चिंता उद्यावर टाकायला शिकलो. याबाबतीत येशूने म्हटलं होतं की “ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे.” (मत्त. ६:३४) सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि हसत-खेळत राहिल्यामुळेही आम्हाला खूप मदत मिळाली. उदाहरणार्थ, जेव्हा डॅन्यलवर दोन महिने किमोथेरपी होत नव्हती तेव्हा मस्करीत ती मला बोलली: “तुम्हाला माहीत आहे का, मला आता खूप बरं वाटतंय.” (नीति. १७:२२) एवढा त्रास होत असतानाही ती नवीन राज्यगीतांचा मोठ्या आवाजात सराव करायची.
तिच्या सकारात्मक स्वभावामुळे मला स्वतःच्या कमतरतांवर मात करायला मदत मिळाली. खरं सांगायचं तर आमच्या या ५७ वर्षांच्या संसारात तिने माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. माझ्यावर कधी ऑमलेट बनवायचीही पाळी आली नाही! म्हणून जेव्हा तिची परिस्थिती खूपच गंभीर झाली तेव्हा मला धुणंभांडी करणं आणि साधं जेवण बनवणं शिकून घ्यावं लागलं. माझ्या हातून तर काचेचे ग्लासही फुटले आहेत. पण तिला खूश करण्यासाठी मी जे काही करायचो त्यामुळे मलाही आनंद व्हायचा. *
यहोवाच्या प्रेमळ कृपेसाठी आभारी
आयुष्यात मागे वळून बघताना मला जाणवतं की, वाढत्या वयामुळे आणि शारीरिक समस्यांमुळे आमच्यावर एका प्रकारचं बंधन आलं, पण त्यातून आम्ही महत्त्वाचे धडे शिकलो. एक म्हणजे, आपण कितीही व्यस्त असलो तरीही आपल्या सोबत्यासाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. आपली परिस्थिती जेव्हा चांगली असते, आपल्याकडे ताकद असते तेव्हा आपल्या प्रिय जणांची काळजी घेण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. (उप. ९:९) दुसरं म्हणजे, लहानसहान गोष्टींबद्दल आपण चिंता करत बसू नये; नाहीतर, रोजच्या जीवनात मिळणाऱ्या आशीर्वादांकडे आपलं दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.—नीति. १५:१५.
मी जेव्हा आमच्या पूर्णवेळेच्या सेवेचा विचार करतो तेव्हा यहोवाने मला माझ्या अपेक्षेपलीकडे आशीर्वाद दिले आहेत याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. माझ्या भावनाही स्तोत्रकर्त्याप्रमाणे आहेत जो म्हणतो: “यहोवा माझ्याशी दयेने वागला.”—स्तो. ११६:७, NW.
^ परि. 32 हा लेख तयार करत असताना सिस्टर डॅन्यल बोकार्ट यांचा मृत्यू झाला. त्या ७८ वर्षांच्या होत्या.