तुम्हाला आठवतं का?
या वर्षाचे टेहळणी बुरूज अंक तुम्ही लक्ष देऊन वाचले आहेत का? तर मग, पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात का ते पाहा:
अभिषिक्त ख्रिश्चनांना आपण खूप जास्त महत्त्व दिलं पाहिजे का?
अभिषिक्त ख्रिश्चनांचा देवावर किती विश्वास आहे या गोष्टीची आपण नक्कीच कदर करतो. पण आपण त्यांना खूप जास्त महत्त्व देऊ नये. आपण “व्यक्तिपूजा” करू नये. (यहू. १६, तळटीप) तसंच, स्वर्गातल्या जीवनाच्या त्यांच्या आशेबद्दल आपण त्यांना प्रश्न विचारू नये.—टेहळणी बुरूज२०.०१, पृ. २९.
यहोवा ‘तुम्हाला’ ओळखतो हे तुम्ही कशावरून म्हणू शकता?
तुमचा जन्मही झाला नव्हता, म्हणजे तुम्ही अजून आईच्या गर्भातच होता तेव्हा यहोवाने तुम्हाला पाहिलं होतं. तसंच तो तुमच्या प्रार्थना ऐकतो. तुमच्या मनात काय आहे, तुम्ही कसा विचार करता हेसुद्धा त्याला माहीत असतं. तुम्ही ज्या प्रकारे वागता त्यावरून तो आनंदी किंवा दुःखी होतो. (१ इति. २८:९; नीति. २७:११) याशिवाय, तो तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करतो.—टेहळणी बुरूज२०.०२, पृ. १२.
आपण कधी बोलतो आणि कधी शांत राहतो?
आपण सेवाकार्यात यहोवाबद्दल आनंदाने इतरांशी बोलतो. तसंच, जेव्हा आपल्याला कळतं की एखादी व्यक्ती गंभीर चूक करण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा तिला सावध करण्यासाठी आपण तिच्याशी बोलतो. याशिवाय, एखाद्याला सल्ला द्यायची गरज वाटली तर वडील त्याच्याशी बोलतात. पण जिथे आपल्या कामावर बंदी आहे तिथल्या भाऊबहिणींना आपण तिथल्या कामाबद्दल माहिती विचारत नाही किंवा माहिती देत नाही. तसंच, जी माहिती गुप्त ठेवायची असते ती आपण इतरांना सांगत नाही.—टेहळणी बुरूज२०.०३, पृ. २०-२१.
प्रकटीकरणाच्या ९ व्या अध्यायात सांगितलेले टोळ आणि योएलच्या २ ऱ्या अध्यायात सांगितलेले टोळ यांच्यात काय फरक आहे?
योएल २:२०-२९ मध्ये सांगितलं आहे, की देव टोळांना घालवून देतो आणि त्यांच्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करायचं वचन देतो. त्यानंतर तो त्यांच्यावर आपली पवित्र शक्ती ओततो. या घटना, बाबेलच्या सैन्याने इस्राएलवर हल्ला केला त्या वेळी आणि नंतर घडल्या. पण प्रकटीकरण ९:१-११ या वचनांमध्ये सांगितलेले टोळ यहोवाच्या अभिषिक्त सेवकांना सूचित करतात. हे अभिषिक्त सेवक धैर्याने सांगतात की देव या दुष्ट जगाचा न्याय करणार आहे. आणि जे लोक जगाचं समर्थन करतात ते ही गोष्ट ऐकून अस्वस्थ होतात.—टेहळणी बुरूज२०.०४, पृ. ३-६.
आज उत्तरेचा राजा कोण आहे?
रशिया आणि त्याची मित्र राष्ट्रं. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात राहणाऱ्या देवाच्या लोकांच्या प्रचारकार्यावर बंदी आणली आहे आणि ते त्यांचा खूप द्वेष करतात. उत्तरेचा राजा दक्षिणेच्या राजाशी आजही लढत आहे.—टेहळणी बुरूज२०.०५, पृ. १३.
गलतीकर ५:२२, २३ यांत उल्लेख केलेले नऊ गुणच ‘पवित्र आत्म्याच्या फळाचे’ पैलू आहेत का?
नाही. देवाचा पवित्र आत्मा आपल्याला इतरही चांगले गुण स्वतःमध्ये वाढवायला मदत करतो; जसं की नीती. (इफिस. ५:८, ९) —टेहळणी बुरूज२०.०६, पृ. १७.
सोशल मीडियावर स्वतःचे फोटो, व्हिडिओ किंवा काही कमेंट्स टाकण्याचा एक धोका कोणता आहे?
सोशल मीडियावर आपण जे काही पोस्ट करतो त्यावरून लोकांना कदाचित असं वाटेल, की आपण स्वतःची बढाई मारत आहोत. आपण एक नम्र व्यक्ती आहोत असं त्यांना वाटणार नाही.—टेहळणी बुरूज२०.०७, पृ. ६-७.
मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांपासून आपण काय शिकू शकतो?
मासेमारी करणारे सहसा अशा वेळी आणि अशा ठिकाणी जाळं टाकतात जिथे त्यांना भरपूर मासे मिळतील. त्यासाठी ते योग्य साधनं वापरतात. शिवाय हवामान वाईट असलं तरीही ते धाडसाने काम करत राहतात. सेवाकार्य करताना आपणसुद्धा या गोष्टी लक्षात ठेवू शकतो.—टेहळणी बुरूज२०.०९, पृ. ५.
यहोवावरचं प्रेम वाढवायला आपण आपल्या विद्यार्थ्याला कशी मदत करू शकतो?
आपण त्यांना दररोज बायबल वाचायचं आणि त्यावर मनन करायचं प्रोत्साहन देऊ शकतो. तसंच, आपण त्यांना प्रार्थना करायलाही शिकवू शकतो.—टेहळणी बुरूज२०.११, पृ. ४.
“ख्रिस्तामुळे सगळे जिवंत केले जातील” असं कोणाबद्दल म्हटलं आहे?—१ करिंथ. १५:२२.
प्रेषित पौल इथे सगळ्या मानवांबद्दल बोलत नव्हता; तर “ख्रिस्त येशूचे शिष्य या नात्याने ज्यांना पवित्र करण्यात आलं आहे” त्यांच्याबद्दल, म्हणजेच अभिषिक्त ख्रिश्चनांबद्दल बोलत होता. (१ करिंथ. १:२; १५:१८)—टेहळणी बुरूज२०.१२, पृ. ५-६.
अभिषिक्त जनांचं स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान झाल्यावर ते तिथे काय करतील?—१ करिंथ. १५:५१-५३.
ते ख्रिस्तासोबत मिळून लोहदंडाने लोकांवर अधिकार चालवतील. (प्रकटी. २:२६, २७)—टेहळणी बुरूज२०.१२, पृ. १२-१३.