“मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन”
“हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन.”—स्तो. ८६:११.
१-३. (क) बायबलमधील सत्यांबद्दल आपल्या भावना कशा असल्या पाहिजे? उदाहरण द्या. (लेखाच्या सुरुवातीला दिलेली चित्रं पाहा.) (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?
आज बऱ्याच ठिकाणी एखादी वस्तू विकत घेऊन ती परत करणं सर्वसामान्य आहे. आणि खासकरून ती वस्तू जर ऑनलाईन मागवली असेल तर मग परत करण्याची शक्यता जास्त असते. कदाचित विकत घेतलेली वस्तू त्यांना हवी होती तशी नसेल, किंवा त्यात काही बिघाड असेल म्हणून लोक असं करतात. सहसा लोक त्या वस्तूऐवजी दुसरं काही घेतात किंवा मग दिलेले पैसे परत मागतात.
२ बायबलमधील सत्यांच्या बाबतीत आपण कधीही असं करू नये. एकदा आपण सत्य “विकत” घेतलं, तर आपण ते कधीही “विकू” नये. म्हणजेच एकदा आपण सत्य शिकलो तर आपण कधीही ते सोडू नये. (नीतिसूत्रे २३:२३ वाचा; १ तीम. २:४) मागच्या लेखात आपण पाहिलं की सत्य शिकून घेण्यासाठी आपण बराच वेळ दिला आहे. सत्य शिकण्यासाठी आपण कदाचित आपलं करियर सोडलं असेल, असं करियर ज्यामुळे आपल्याला भरपूर पैसे मिळू शकले असते. तसंच, आपल्या जवळच्या लोकांसोबतचे आपले नातेसंबंध बदलले असतील, आपण आपल्या विचार करण्याच्या आणि कार्यं करण्याच्या पद्धतीत बदल केले असतील किंवा मग यहोवाला न आवडणाऱ्या प्रथा सोडून दिल्या असतील. पण आपण या सर्व गोष्टींचा जरी त्याग केला असला, तरी आपल्याला खातरी आहे की सत्य शिकल्यामुळे मिळणाऱ्या आशीर्वादांचं मूल्य या सर्व गोष्टींपेक्षा खूप जास्त आहे.
३ येशूने मौल्यवान मोत्यांच्या शोधात असणाऱ्या एका व्यापाऱ्याचं उदाहरण दिलं. त्याने सांगितलं की एक खूप मौल्यवान मोती मिळाल्यावर त्या मत्त. १३:४५, ४६) आपण जेव्हा सत्य शिकलो, म्हणजे देवाच्या राज्याबद्दल आणि बायबलमधील इतर सत्यं शिकलो तेव्हा आपण ते मिळवण्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करायला तयार होतो. आपण जर सत्याचं मूल्य नेहमी लक्षात ठेवलं तर आपण ते कधीच सोडणार नाही. पण दुःखाची गोष्टी ही आहे की काही लोकांनी सत्याला मौल्यवान लेखण्याचं सोडून दिलं आहे आणि ते सत्यातून बाहेर गेले आहेत. असं आपल्या बाबतीतही व्हावं अशी आपली मुळीच इच्छा नाही. “सत्याच्या मार्गावर चालत” राहा हा बायबलमधील सल्ला आपण नेहमी पाळला पाहिजे. (३ योहान २-४ वाचा.) याचा अर्थ आपण जीवनात सत्याला नेहमी पहिलं स्थान दिलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं जीवन जगलं पाहिजे. पण एखादी व्यक्ती का आणि कशा प्रकारे सत्य ‘विकू’ किंवा सोडून देऊ शकते? आपल्या हातून ही चूक होऊ नये यासाठी आपण कोणती खबरदारी बाळगू शकतो? आणि “सत्याच्या मार्गावर चालत” राहण्याचा आपला निर्धार आपण आणखी पक्का कसा करू शकतो?
व्यापाऱ्याने तो विकत घेण्यासाठी आपली सर्व मालमत्ता विकून टाकली. तो मोती देवाच्या राज्याबद्दलच्या सत्याला सूचित करतो. या उदाहरणावरून येशूने दाखवून दिलं की सत्याचा शोध घेणाऱ्यांसाठी त्याचं मूल्य खूप जास्त असेल. (काही जण सत्य का आणि कशा प्रकारे विकतात?
४. येशूच्या काळात काही लोकांनी सत्याच्या मार्गावर चालण्याचं का सोडून दिलं?
४ येशूच्या काळात सत्य स्वीकारणाऱ्या काही लोकांनी नंतर ते सोडून दिलं. उदाहरणार्थ, येशूने एक चमत्कार करून एका मोठ्या लोकसमुदायाला अन्न पुरवल्यानंतर ते लोक येशूच्या मागेमागे गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूला गेले. पण मग येशूने त्यांना असं काही सांगितलं ज्यामुळे त्यांना धक्का बसला. तो म्हणाला: “जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या पुत्राचं मांस खात नाही आणि त्याचं रक्त पीत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन मिळणार नाही.” येशूच्या शब्दांचा अर्थ काय होतो हे त्याला विचारण्याऐवजी त्यांनी म्हटलं: “किती धक्कादायक आहे हे! कोण ऐकून घेऊ शकतो अशा गोष्टी?” यामुळे “त्याच्या शिष्यांपैकी बऱ्याच जणांनी त्याच्यामागे चालण्याचे सोडून दिले आणि पूर्वी ते ज्या गोष्टी करत होते, त्यांकडे परत गेले.”—योहा. ६:५३-६६.
५, ६. (क) आपल्या काळात काही लोक सत्यातून बाहेर का गेले आहेत? (ख) एक व्यक्ती कशामुळे सत्यातून हळूहळू बाहेर जाऊ शकते?
५ आजदेखील काही लोकांनी सत्य सोडून दिलं आहे. असं का? बायबल वचनांची सुधारित समज मिळाल्यामुळे काही लोक अडखळले किंवा एखाद्या जबाबदार बांधवाच्या बोलण्यामुळे किंवा कार्यामुळे ते अडखळले. इतर काहींना बायबलमधून दिलेला सल्ला आवडला नाही, किंवा मंडळीत एखाद्या बांधवासोबत त्यांचे मोठे मतभेद झाले. इतर काही जणांना धर्मत्यागी लोकांच्या शिकवणी आवडल्या किंवा साक्षीदारांबद्दल खोट्या अफवा पसरवणाऱ्या लोकांचं म्हणणं त्यांना पटलं. ही फक्त काही कारणं आहेत ज्यामुळे काही लोक स्वतःहून मंडळीपासून आणि यहोवापासून दूर गेले आहेत. (इब्री ३:१२-१४) या लोकांनी पेत्रसारखंच येशूवर भरवसा ठेवला असता तर किती बरं झालं असतं! आपण पाहिलं की येशूचे शब्द ऐकून लोकसमुदायातील बऱ्याच लोकांना धक्का बसला. येशूने जेव्हा प्रेषितांना विचारलं की त्यांनाही त्याला सोडून जायचं आहे का, तेव्हा पेत्रने उत्तर दिलं: “प्रभू आम्ही कोणाकडे जाणार? सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत.”—योहा. ६:६७-६९.
६ काही जण सत्यातून हळूहळू बाहेर गेले आहेत, आणि कधीकधी तर हे त्यांच्या लक्षातही आलेलं नाही. हळूहळू सत्यातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीची तुलना एका अशा नावेसोबत केली जाऊ शकते जी किनाऱ्यापासून हळूहळू वाहवत जाते. बायबल आपल्याला इशारा देतं की आपण कधीही “वाहवत जाऊ” नये. (इब्री २:१) जी व्यक्ती सत्यातून हळूहळू बाहेर जाते तिची सहसा तसं करण्याची इच्छा नसते. पण ती व्यक्ती तिचं यहोवासोबतचं नातं कमजोर होऊ देते आणि कालांतराने ती ते नातं गमावून बसते. आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
सत्य विकण्याचं आपण कसं टाळू शकतो?
७. आपल्या हातून सत्य विकलं जाऊ नये यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होईल?
७ सत्यात चालत राहण्यासाठी आपण, यहोवा सांगत असलेली प्रत्येक गोष्ट ऐकून त्यानुसार चाललं पाहिजे. सत्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे आणि आपल्या प्रत्येक कार्यांत आपण बायबलची तत्त्वं लागू केली पाहिजेत. दावीद राजाने प्रार्थनेत यहोवाला वचन दिलं की, “मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन.” (स्तो. ८६:११) सत्यात चालत राहण्याचा दावीदने पक्का निर्धार केला होता आणि आपणही तेच केलं पाहिजे. आपण असं केलं नाही, तर कदाचित आपण सत्य स्वीकारण्यासाठी ज्या गोष्टींचा त्याग केला त्यांबद्दल परत विचार करू लागू. यामुळे त्या गोष्टी परत मिळवण्याची इच्छा आपल्या मनात येऊ शकते. पण आपण बायबलची मोजकी सत्यं स्वीकारून इतर सत्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. याऐवजी आपण सत्यात “पूर्णपणे” चाललं पाहिजे. (योहा. १६:१३) सत्य शिकून ते लागू करण्यासाठी आपण जे त्याग केले त्यांमधल्या पाच गोष्टींवर आपण मागच्या लेखात चर्चा केली. त्या गोष्टींकडे परत न जाण्यासाठी आपण काय करू शकतो यावर आता आपण चर्चा करू.—मत्त. ६:१९.
८. वेळेचा योग्य उपयोग न केल्यामुळे एक ख्रिस्ती सत्यापासून वाहवत कसा जाऊ शकतो? उदाहरण द्या.
८ वेळ. सत्यापासून आपण वाहवत जाऊ नये म्हणून आपण आपल्या वेळेचा नेहमी चांगला उपयोग केला पाहिजे. आपण सावध नसलो तर मनोरंजनात, छंद जोपासण्यात, इंटरनेट वापरण्यात किंवा टिव्ही पाहण्यात आपला खूप वेळा वाया जाऊ शकतो. या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या नाहीत. पण कदाचित असं होऊ शकतं की आपण आधी जो वेळ बायबलचा अभ्यास करण्यात आणि सेवेत देत होतो, तो वेळ आता आपण या गोष्टी करण्यात देत आहोत. अॅना * नावाच्या बहिणीच्या बाबतीत हेच घडलं. लहानपणापासूनच तिला घोडे खूप आवडायचे आणि शक्य तेव्हा ती घोडेस्वारी करायची. पण यात तिचा भरपूर वेळ जात आहे हे लक्षात आल्यावर तिच्या मनात दोषीपणाची भावना आली. मग तिने बदल करायचं ठरवलं. तिला कोरी वेल्स नावाच्या बहिणीच्या उदाहरणावरूनही बरंच काही शिकता आलं. ही बहीण घोडेस्वारीचे खेळ दाखवायची. * आता अॅना तिचा जास्त वेळ यहोवाच्या सेवेत आणि सत्यात असलेल्या तिच्या मित्रपरिवारासोबत घालवते. तिला देवाच्या जवळ असल्यासारखं वाटतं आणि तिने तिचा वेळ सुज्ञपणे वापरला त्याबद्दल तिला आनंद वाटतो.
९. आपल्या जीवनात भौतिक गोष्टी कशा प्रकारे सर्वात महत्त्वाच्या बनू शकतात?
९ भौतिक गोष्टी. सत्यात चालत राहण्यासाठी आपण भौतिक गोष्टींना आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान देऊन चालणार नाही. आपण सत्य शिकलो तेव्हा आपल्याला जाणीव झाली की यहोवाची सेवा करणं हे भौतिक गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. यामुळे आपण भौतिक गोष्टींचा त्याग करायलाही तयार होतो. पण काही काळानंतर इतरांना नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना पाहून किंवा इतर गोष्टींचा आनंद घेताना पाहून कदाचित आपल्याला त्यांचा हेवा वाटू शकतो. आपल्यालाही या गोष्टी मिळाल्या पाहिजेत असं कदाचित आपल्या मनात येऊ शकतं. यामुळे आपल्याजवळ जे आहे त्यात आपण समाधानी राहणार नाही आणि म्हणून यहोवाच्या सेवेपेक्षा भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी आपण खटपट करू लागू. पहिल्या शतकातील देमासच्या बाबतीतही हेच घडलं. त्याला “सध्याच्या जगाच्या व्यवस्थेची ओढ” लागली. त्याची इच्छा इतकी बळावली की त्याने प्रेषित पौलसोबत सेवा करण्याची नेमणूक सोडून दिली. (२ तीम. ४:१०) देमासचं कदाचित यहोवाच्या सेवेपेक्षा भौतिक गोष्टींवर जास्त प्रेम होतं. किंवा, कदाचित त्याला पौलसोबत सेवा करण्यासाठी त्याग करण्याची इच्छा नव्हती. आपण त्याच्या उदाहरणातून कोणता धडा शिकतो? सत्यात येण्याआधी कदाचित आपलं भौतिक गोष्टींवर खूप प्रेम असेल. आज आपण सावध नसलो, तर ते प्रेम परत आपल्या मनात वाढू शकतं आणि यामुळे कालांतराने सत्याप्रती आपलं प्रेम नाहीसं होईल.
१०. आपण कोणत्या प्रभावापासून सावध असलं पाहिजे?
१० इतरांसोबत आपले नातेसंबंध. यहोवाची उपासना न करणाऱ्या लोकांना आपण कधीही आपल्या विचारांवर प्रभाव पाडू देऊ नये. सत्यात टिकून राहण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आपण सत्य शिकलो तेव्हा सत्यात नसलेल्या आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत आपले संबंध कदाचित बदलले असतील. काही लोकांनी कदाचित आपल्या विश्वासांचा आदर केला असेल, तर इतर काहींनी त्याबद्दल आपला विरोध केला असेल. (१ पेत्र ४:४) आपण आपल्या परीने कुटुंबातील सदस्यांसोबत चांगलं नातं ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि त्यांच्यासोबत प्रेमानेही वागतो. पण त्यांना खुश करण्यासाठी आपण यहोवाच्या स्तरांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि १ करिंथकर १५:३३ या वचनातून आपण शिकतो की यहोवावर प्रेम करणारे लोकच आपले जवळचे मित्र असले पाहिजेत.
११. आपण अशुद्ध विचार आणि कार्यं कसे टाळू शकतो?
११ अशुद्ध विचार आणि कार्यं. सत्यात चालत राहण्यासाठी आपण यहोवाच्या नजरेत पवित्र किंवा शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. (यश. ३५:८; १ पेत्र १:१४-१६ वाचा.) आपण सत्य शिकलो तेव्हा बायबलच्या स्तरांनुसार जगण्यासाठी जीवनात आपण बरेच बदल केले. काही लोकांना तर यासाठी जीवनात मोठमोठे बदल करावे लागले. असं असलं तरी आपण आजही सावध असलं पाहिजे. अनैतिक जीवनशैलीला आपल्या जीवनात कोणतीच जागा नसली पाहिजे. अनैतिक कार्य करण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? आपण पवित्र असावं यासाठी यहोवाने आपल्याला काय दिलं आहे याचा विचार करा. त्याने आपल्या प्रिय पुत्राचं, येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्यासाठी दिलं आहे. (१ पेत्र १:१८, १९) यहोवाच्या नजरेत नेहमी शुद्ध राहण्यासाठी आपण येशूने दिलेलं खंडणी बलिदान किती मौल्यवान आहे, यावर मनन करत राहिलं पाहिजे.
१२, १३. (क) सणांबद्दल आणि काही विशिष्ट दिवसांबद्दल आपण यहोवासारखा दृष्टिकोन का ठेवला पाहिजे? (ख) आता आपण कशावर चर्चा करणार आहोत?
१२ देवाला न आवडणाऱ्या प्रथा. कुटुंबाचे सदस्य, कामावरचे सोबती आणि शाळासोबती कदाचित आपल्यावर सण किंवा काही दिवस साजरे करायला दबाव टाकू शकतात. पण यहोवाला या गोष्टी आवडत नसल्यामुळे त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? यहोवाच्या नजरेत अशा प्रकारचे सण साजरे करणं का चुकीचं आहे हे आपल्या मनात स्पष्ट असलं पाहिजे. यासाठी आपण आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करू शकतो आणि या सणांचा किंवा दिवसांचा उगम कुठून झाला आहे हे पाहू शकतो. आपण हे सण साजरे का करू नये याच्या शास्त्रवचनीय पुराव्यांवर विचार केल्यामुळे, “प्रभूच्या दृष्टीत” आपण चांगल्या गोष्टी करत आहोत याची आपल्याला खातरी मिळेल. (इफिस. ५:१०) आपला यहोवावर आणि त्याच्या वचनावर पूर्ण भरवसा असला, तर आपण इतर लोक काय विचार करतील याची चिंता करणार नाही.—नीति. २९:२५.
१३ सत्यात सदासर्वकाळ चालत राहण्याची आपली इच्छा आहे. सत्यात चालत राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का करण्यासाठी आपण काय करू शकतो? आपल्याला कोणत्या तीन गोष्टींमुळे मदत मिळू शकते हे आता आपण पाहू या.
सत्यात चालत राहण्याचा निर्धार आणखी पक्का करा
१४. (क) बायबलचा अभ्यास करत राहिल्यामुळे आपला सत्यात टिकून राहण्याचा निर्धार पक्का कसा होऊ शकतो? (ख) आपल्याला सुज्ञतेची, शिक्षणाची आणि समंजसपणाची गरज का आहे?
१४ पहिली गोष्ट म्हणजे, आपण बायबलचा अभ्यास आणि शिकलेल्या गोष्टींवर मनन करत राहिलं पाहिजे. आपण यासाठी नियमितपणे वेळ काढला पाहिजे. आपण जितकं जास्त अभ्यास करू, नीतिसूत्रे २३:२३ आपल्याला सत्य “विकत घे” असं सांगतं. पण त्यासोबतच ते आपल्याला “सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा”ही विकत घ्यायला सांगतं. बायबलची सत्यं फक्त जाणून घेणंच पुरेसं नाही, तर आपण ती आपल्या जीवनात लागूदेखील केली पाहिजेत. समंजसपणा असल्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहेत आणि आपण जे शिकत आहोत त्यावरून यहोवाची इच्छा समजून घ्यायला मदत होते. सुज्ञता असल्यामुळे माहीत असलेल्या गोष्टी लागू करायला आपल्याला प्रेरणा मिळते. कधीकधी आपल्याला ज्या गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे त्या दाखवून सत्य आपल्याला जणू शिक्षण किंवा सल्ला देतं. असे सल्ले आपण लगेच लागू केले पाहिजेत. बायबल सांगतं की हे सल्ले चांदीपेक्षाही जास्त मौल्यवान आहेत.—नीति. ८:१०.
तितकंच सत्याबद्दल आपलं प्रेम वाढेल. यामुळे सत्याला कधीच न सोडण्याचा आपला निर्धार पक्का होईल.१५. सत्य आपल्याला एखाद्या कमरपट्ट्यासारखं सुरक्षित कसं ठेवतं?
१५ दुसरी गोष्ट म्हणजे, आपण दररोजच्या जीवनात शिकलेल्या गोष्टी लागू करण्याचा निर्धार केला पाहिजे. बायबलमध्ये सत्याची तुलना एका सैनिकाच्या कमरपट्ट्याशी करण्यात आली आहे. (इफिस. ६:१४) बायबल काळात कमरपट्ट्यामुळे सैनिकाला युद्धात आधार आणि संरक्षण मिळायचं. पण जर तो पट्टा घट्ट बांधलेला नसला तर त्याचा काहीच उपयोग नव्हता. सत्य आपल्याला एका पट्ट्यासारखं कसं सुरक्षित ठेवतं? आपण जर बायबलची सत्यं एखाद्या पट्ट्यासारखी मनाशी घट्ट बांधून ठेवली, तर यामुळे मनात चुकीचे विचार येणार नाहीत आणि योग्य निर्णय घ्यायलाही आपल्याला मदत मिळेल. आपल्या जीवनात एखादी गंभीर समस्या उद्भवली किंवा आपल्याला चुकीचं काम करण्याचा मोह झाला, तर बायबलमधील सत्य आपल्याला योग्य ते करण्यासाठी मदत करू शकतात. एक सैनिक आपल्या कमरपट्ट्याशिवाय युद्धात कधीच जात नव्हता, तसंच आपणही सत्याला कधीच सोडू नये. जीवनातील प्रत्येक पैलूत आपण बायबलची सत्यं लागू केली पाहिजेत. बायबल काळातील सैनिक आपल्या कमरपट्ट्यावर तलवारही लटकवायचा. आपणही लाक्षणिक अर्थाने ते कसं करू शकतो हे पाहू या.
१६. इतरांना सत्य शिकवल्यामुळे आपल्याला सत्यात चालत राहायला कशी मदत होते?
१६ तिसरी गोष्ट म्हणजे, आपण इतरांना बायबलची सत्यं शिकवण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. बायबलची तुलना एका तलवारीशी करण्यात आली आहे. एक कुशल सैनिक जसं तलवार घट्ट धरून ठेवतो, तसंच आपणही देवाच्या वचनाला घट्ट धरून ठेवलं पाहिजे. (इफिस. ६:१७) आपल्यापैकी प्रत्येक जण “सत्याच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग करणारा” बनू शकतो. (२ तीम. २:१५) आपण बायबलची सत्यं इतरांना शिकवतो तेव्हा सत्यावर असलेलं आपलं प्रेमही आणखी वाढतं. आणि यामुळे सत्यात चालत राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो.
१७. तुमच्यासाठी सत्य का मौल्यवान आहे?
१७ आपल्याला मिळालेलं सत्य यहोवाकडून आपल्यासाठी एक भेट आहे. यामुळे आपल्या स्वर्गीय पित्यासोबत एक जवळचा नातेसंबंध जोडणं आपल्याला शक्य होतं. सत्य आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. यहोवाने आजपर्यंत आपल्याला बरंच काही शिकवलं आहे, पण ही फक्त एक सुरुवात आहे! यहोवा आपल्याला सदासर्वकाळ शिकवत राहण्याचं वचन देतो. त्यामुळे एखाद्या मौल्यवान मोत्यासारखं आपण सत्य जपलं पाहिजे. नेहमी सत्य विकत घ्या, पण ते कधीही विकू नका. असं करत राहिल्यामुळे आपण दावीदसारखं यहोवाला दिलेलं वचन पाळत असू. त्याने म्हटलं: “मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन.”—स्तो. ८६:११.
^ परि. 8 नाव बदलण्यात आलं आहे.
^ परि. 8 JW ब्रॉडकास्टिंगमध्ये ‘इंटरव्यू और अनुभव > सच्चाई ज़िंदगी सँवार देती है’ यात पाहा.