टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) फेब्रुवारी २०१७
या अंकात ३ एप्रिल ते ३० एप्रिल २०१७ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
यहोवा उद्देश नक्कीच पूर्ण होईल!
पृथ्वीसाठी आणि मानवजातीसाठी देवाचा मूळ उद्देश काय होता? हा उद्देश आजपर्यंत का पूर्ण झाला नाही? आणि येशूने दिलेल्या खंडणी बलिदानामुळे हा उद्देश पूर्ण होण्यास कशी मदत होईल?
खंडणी बलिदान—पित्याकडून असलेलं एक “पूर्ण दान”
देवाने केलेल्या या खंडणीच्या तरतुदीमुळे भविष्यासाठी सुंदर आशा मिळते. तसंच, खंडणी बलिदानाचा संबंध अशा काही मुद्द्यांशी आहे, जे मुद्दे स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
जीवन कथा
देवाची अपार कृपा आम्ही अनेक मार्गांनी अनुभवली
डगलस आणि मेरी गेस्ट यांनी कॅनडामध्ये पायनियर सेवा करताना, तसंच ब्राझील आणि पोर्तुगालमध्ये मिशनरी सेवा करताना देवाची अपार कृपा अनुभवली.
यहोवा त्याच्या लोकांचं नेतृत्व करतो
प्राचीन काळात यहोवाने आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी मानवांचा उपयोग केला आहे. या लोकांद्वारे खरंतर यहोवाच त्याच्या लोकांचं नेतृत्व करत होता हे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो?
आज देवाच्या लोकांचं नेतृत्व कोण करत आहे?
येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना वचन दिलं की तो युगाच्या समाप्तीपर्यंत त्यांच्यासोबत राहील. मग आज तो पृथ्वीवर असलेल्या देवाच्या लोकांचं नेतृत्व कसं करत आहे?
वाचकांचे प्रश्न
प्रेषित पौलाने म्हटलं: यहोवा “तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही.” या वचनाचा असा अर्थ होतो का, की आपण कितपत सहन करू शकतो हे यहोवा आधीच पाहतो आणि त्यानुसार आपल्यावर कोणत्या परीक्षा याव्यात हे ठरवतो?
आपल्या संग्रहातून
“कोणताही रस्ता—कठीणही नाही आणि लांबही”
१९२० आणि १९३० च्या दशकात काही आवेशी पायनियरांचा राज्याची सुवार्ता ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागांत पोहचण्याचा निश्चय दृढ होता.