आनंदी देवाची सेवा करणारे आनंदी असतात
“ज्या लोकांचा देव परमेश्वर [यहोवा, NW] आहे ते धन्य!”—स्तो. १४४:१५.
१. यहोवाचे साक्षीदार आनंदी का असतात? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
यहोवाचे साक्षीदार आनंदी लोक आहेत. सभांमध्ये, संमेलनांमध्ये, किंवा इतर ठिकाणी ते एकत्र येतात तेव्हा ते नेहमी एकमेकांशी आनंदाने बोलतात. पण ते इतके आनंदी का आहेत? याचं मुख्य कारण म्हणजे ते त्यांच्या ‘आनंदी देवाला,’ यहोवाला जवळून ओळखतात. ते सर्व त्याची उपासना करतात आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. (१ तीम. १:११; स्तो. १६:११) यहोवा हा आनंदाचा स्रोत असल्यामुळे त्याची इच्छा आहे की आपण आनंदी राहावं आणि यासाठी तो आपल्याला बऱ्याच गोष्टी पुरवतो.—अनु. १२:७; उप. ३:१२, १३.
२, ३. (क) आनंदी असण्याचा काय अर्थ होतो? (ख) कोणत्या कारणांमुळे आनंदी राहणं आपल्याला कठीण जाऊ शकतं?
२ तुमच्याबद्दल काय? तुम्ही आनंदी आहात का? आनंदी असणं म्हणजे जीवनात समाधानी असणं, मनापासून प्रसन्न वाटणं किंवा खूप खूश असणं. बायबल सांगतं की यहोवा ज्या लोकांना आशीर्वादित करतो ते खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकतात. पण आजच्या जगात नेहमी आनंदी राहणं सोपं नाही. असं का म्हणता येईल?
३ आपण जीवनात कठीण प्रसंगांचा सामना करतो तेव्हा आनंदी राहणं १ तीम. ६:१५; मत्त. ११:२८-३०) डोंगरावरील उपदेशात येशूने अशा काही गुणांचा उल्लेख केला ज्यांमुळे आपण आनंदी बनू शकतो. या गुणांमुळे आपल्याला सैतानाच्या दुष्ट जगात अनेक समस्यांचा सामना करत असतानाही आनंद टिकवून ठेवायला मदत मिळेल.
कठीण जाऊ शकतं. जसं की, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो, कुटुंबातील एखाद्याला बहिष्कृत केलं जातं, किंवा मग घटस्फोट होतो तेव्हा. तसंच जेव्हा नोकरी जाते किंवा घरात सारखा वाद होत असल्यामुळे शांती टिकून राहात नाही तेव्हाही आनंदी राहणं सोपं नाही. कामावरचे सोबती किंवा वर्गसोबती आपली टिंगल करतात किंवा यहोवाची सेवा करत असल्यामुळे आपला छळ होतो आणि आपल्याला तुरुंगात टाकलं जातं तेव्हाही आनंदी राहणं सोपं नाही. आपली तब्येत खालावू शकते, आपल्याला एखादा जीवघेणा आजार होऊ शकतो, किंवा आपल्याला नैराश्य येऊ शकतं. या सर्व परिस्थितींत आपला आनंद टिकवून ठेवणं मुळीच सोपं नाही. पण नेहमी लक्षात असू द्या की आनंदी आणि “एकमेव सामर्थ्यशाली अधिपती” येशू ख्रिस्त याला लोकांचं सांत्वन करायला आणि त्यांना आनंद द्यायला मनापासून आवडायचं. (यहोवाशिवाय आनंदी राहणं अशक्य
४, ५. आनंदी बनण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
४ डोंगरावरील उपदेशात येशूने सर्वात आधी उल्लेख केलेली गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याने म्हटलं: “जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात ते सुखी आहेत, कारण स्वर्गाचं राज्य अशाच लोकांचं आहे.” (मत्त. ५:३) आपण आपली आध्यात्मिक गरज ओळखतो हे आपण कसं दाखवू शकतो? देवाला ओळखण्याचा प्रयत्न करण्याद्वारे आणि मार्गदर्शन व मदत यांसाठी त्याच्यावर अवलंबून राहण्याद्वारे आपण हे दाखवू शकतो. तसंच, बायबलचा अभ्यास आणि त्याच्या आज्ञांचं पालन करण्याद्वारे व त्याच्या उपासनेला जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान देण्याद्वारेही आपण दाखवून देतो की आपण आपली आध्यात्मिक गरज ओळखतो. या गोष्टी केल्यामुळे आपण आनंदी बनू. तसंच, देवाने दिलेली अभिवचनं लवकरच पूर्ण होतील यावरचा आपला भरवसा वाढेल. आणि बायबलमधून मिळणारी “आपली आनंददायक आशा” आपल्याला प्रोत्साहनही देईल.—तीत २:१३.
५ जीवनातील कोणत्याही प्रसंगात आपल्याला आनंद टिकवून ठेवायचा असेल, तर यहोवासोबतचा आपला नातेसंबंध घनिष्ठ करत राहण्याची गरज आहे. प्रेषित पौलने म्हटलं: “प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा. पुन्हा एकदा सांगतो, आनंदी राहा!” (फिलिप्पै. ४:४) यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यासाठी आपल्याला त्याच्याबद्दल ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. बायबल सांगतं: “ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करतो, तो मनुष्य धन्य होय.” ते आपल्याला हेदेखील सांगतं: “जे त्याला धरून राहतात त्यांस ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय.”—नीति. ३:१३, १८.
६. आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला आणखी काय करणं गरजेचं आहे?
६ पण आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टी लागू करणं खूप गरजेचं आहे. असं करण्याच्या महत्त्वावर जोर देत येशूने म्हटलं: “तुम्हाला जर या गोष्टी कळत असतील, तर त्यांचं पालन केल्याने तुम्ही सुखी व्हाल.” (योहा. १३:१७; याकोब १:२५ वाचा.) आपली आध्यात्मिक गरज पूर्ण करण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी असं करणं खूप गरजेचं आहे. हे खरं आहे की आपला आनंद हिरावून घेतील असे बरेच प्रसंग आपल्या जीवनात येतात. असं असतानाही आपण आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतो? येशूने डोंगरावरील उपदेशात पुढे काय सांगितलं त्याबद्दल आता आपण चर्चा करू या.
आपल्याला आनंदी बनवणारे गुण
७. शोक करणारे लोक कोणत्या अर्थाने आनंदी असतात?
७ “जे शोक करतात ते सुखी आहेत, कारण त्यांचं सांत्वन केलं जाईल.” (मत्त. ५:४) पण कदाचित आपण असा विचार करू, ‘शोक करणारा आनंदी कसा राहू शकतो?’ या वचनात येशू सर्वसामान्यपणे शोक करणाऱ्या लोकांबद्दल बोलत नव्हता. आज बरेच दुष्ट लोक शोक करतात किंवा निराश होतात. या “शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ” असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. (२ तीम. ३:१) पण असे लोक फक्त स्वतःचाच विचार करतात. ते यहोवाबद्दल विचार करत नसल्यामुळे त्याच्यासोबत या लोकांचा नातेसंबंध निर्माण होत नाही आणि यामुळे ते आनंदी बनू शकत नाही. वरील वचनात येशू अशा लोकांबद्दल बोलत होता जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात. जगातील लोक देवाचं ऐकत नाही आणि त्याच्या इच्छेनुसार जीवन जगत नाही हे पाहून या लोकांना दुःख होतं आणि ते शोक करतात. यासोबतच त्यांना आपल्या पापी वृत्तीची जाणीव असते आणि जगात अगदी घृणास्पद गोष्टी घडताना ते पाहतात तेव्हाही ते शोक करतात. यहोवा अशा लोकांच्या प्रामाणिक याचनांकडे लक्ष देतो. तो बायबलद्वारे त्यांचं सांत्वन करतो आणि त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा देतो.—यहेज्केल ५:११; ९:४ वाचा.
८. सौम्य वृत्तीचे असल्यामुळे आनंदी राहायला कशी मदत होते?
८ “जे सौम्य वृत्तीचे ते सुखी आहेत, कारण त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.” (मत्त. ५:५) सौम्य वृत्ती बाळगल्याने आपण आनंदी कसे बनू शकतो? आज बरेच लोक उद्धट आणि रागीट स्वभावाचे आहेत आणि यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. पण असे लोक जेव्हा सत्य शिकतात, तेव्हा ते स्वतःत बदल करून “नवीन व्यक्तिमत्त्व” परिधान करतात. मग ते, “करुणा, दयाळूपणा, प्रेमळपणा, नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता” असे गुण विकसित करतात. (कलस्सै. ३:९-१२) यामुळे त्यांच्या जीवनात शांती टिकून राहते, इतरांसोबत चांगले संबंध टिकून राहतात आणि ते आनंदी बनतात. अशा लोकांबद्दल देवाचं वचन सांगतं की “त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.”—स्तो. ३७:८-१०, २९.
९. (क) सौम्य वृत्तीच्या लोकांना “पृथ्वीचा वारसा मिळेल” या येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो? (ख) “नीतिमत्त्वासाठी भुकेले व तान्हेले” असलेले लोक आनंदी का राहू शकतात?
९ सौम्य वृत्तीच्या लोकांना “पृथ्वीचा वारसा मिळेल” या येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो? अभिषिक्त जण जेव्हा पृथ्वीवर राजे आणि याजक या नात्याने राज्य करतील तेव्हा त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल. (प्रकटी. २०:६) पृथ्वीवर जीवनाची आशा बाळगणाऱ्या लाखो लोकांना पृथ्वीवर सदासर्वकाळ राहण्याची संधी मिळेल तेव्हा त्यांना एका अर्थी तिचा वारसा मिळेल. ते परिपूर्ण असतील आणि शांती व आनंद अनुभवतील. या लोकांबद्दल येशूने म्हटलं: “जे नीतिमत्त्वासाठी भुकेले व तान्हेले ते सुखी आहेत.” (मत्त. ५:६) यहोवा पृथ्वीवरून सर्व दुष्टता काढून टाकेल तेव्हा या लोकांची नीतिमत्त्वासाठी असलेली भूक व तहान भागेल. (२ पेत्र ३:१३) नवीन जगात नीतिमान लोक नेहमी आनंदी राहतील आणि आज दुष्ट लोक करत असलेल्या वाईट कृत्यांमुळे ते कधीच शोक करणार नाही.—स्तो. ३७:१७.
१०. दयाळू असण्याचा काय अर्थ होतो?
१० “जे दयाळू ते सुखी आहेत, कारण त्यांच्यावर दया केली जाईल.” (मत्त. ५:७) दयाळू असणं म्हणजे कृपाळू असणं आणि करुणा दाखवणं. दुसऱ्या शब्दांत एखाद्याला त्रासात पाहून वाईट वाटणं. पण दया ही फक्त एक भावना नाही. बायबल आपल्याला शिकवतं की दया दाखवण्यात इतरांना मदत करण्यासाठी काही पावलं उचलणंही सामील आहे.
११. चांगल्या शोमरोन्याच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?
११ लूक १०:३०-३७ वाचा. दयाळू असण्याचा काय अर्थ होतो, हे येशूने सांगितलेल्या चांगल्या शोमरोन्याच्या उदाहरणातून स्पष्टपणे दिसून येतं. दुखापत झालेल्या व्यक्तीला पाहून त्या शोमरोन्याला दया आली आणि यामुळे तो त्याला मदत करायला प्रेरित झाला. हे उदाहरण सांगितल्यावर येशूने म्हटलं: “तर मग जा, आणि तूही असंच कर.” म्हणून आपण स्वतःला पुढील प्रश्नं विचारले पाहिजेत: ‘चांगल्या शोमरोन्याने जे केलं तसंच मीदेखील करत आहे का? इतर लोक दुःखी असतात तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी मी काही करू शकतो का? उदाहरणार्थ, मी मंडळीतल्या वृद्ध बंधुभगिनींना, मृत्यूमुळे जोडीदाराला गमावलं आहे अशांना, किंवा ज्यांचे आईवडील सत्यात नाहीत अशा मुलांना मी मदत करू शकतो का? तसंच, मी “निराश झालेल्यांचे सांत्वन” करू शकतो का?’—१ थेस्सलनी. ५:१४; याको. १:२७.
१२. इतरांना दया दाखवल्यामुळे आपण आनंदी कसे राहू शकतो?
१२ दयाळू असल्यामुळे आपण आनंदी कसे राहतो? आपण इतरांशी दयेने वागतो तेव्हा आपण त्यांना काहीतरी देत असतो. आणि येशूने म्हटलं होतं की दिल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. याचं आणखी एक कारण म्हणजे दया दाखवल्यामुळे आपण यहोवाचं मन आनंदित करत आहोत ही जाणीवही आपल्याला आनंद देते. (प्रे. कार्ये २०:३५; इब्री लोकांना १३:१६ वाचा.) दावीद राजाने दया दाखवणाऱ्या व्यक्तीबद्दल असं म्हटलं: “परमेश्वर त्याचे रक्षण करेल व त्याचा प्राण वाचवेल; भूतलावर तो सुखी होईल.” (स्तो. ४१:१, २) आपण इतरांशी दयेने आणि करुणेने वागलो तर आपल्यालाही यहोवाची दया मिळेल आणि त्यामुळे आपण नेहमी आनंदी राहू शकतो.—याको. २:१३.
“ज्यांचं मन शुद्ध ते सुखी”
१३, १४. “मन शुद्ध” असणं का महत्त्वाचं आहे?
१३ येशूने म्हटलं: “ज्यांचं मन शुद्ध ते सुखी आहेत, कारण ते देवाला पाहतील.” (मत्त. ५:८) मनाने शुद्ध असण्याचा अर्थ आपल्या इच्छा आणि आपले विचार शुद्ध ठेवणं. यहोवाने आपली उपासना स्वीकारावी अशी आपली इच्छा असेल तर मनाने शुद्ध असणं खूप गरजेचं आहे.—२ करिंथकर ४:२ वाचा; १ तीम. १:५.
१४ मनाने शुद्ध असणारे लोक यहोवासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध जोडू शकतात. यहोवाने म्हटलं: “जे आपले झगे धुतात ते सुखी आहेत.” (प्रकटी. २२:१४) या वचनाचा काय अर्थ होतो? अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी या वचनाचा असा अर्थ होतो की यहोवा त्यांना शुद्ध समजतो. तो त्यांना स्वर्गात अमर जीवन देणार आहे आणि ते सदासर्वकाळ आनंदी राहतील. पृथ्वीवर जगण्याची आशा ठेवणाऱ्या लोकांसाठी या वचनाचा असा अर्थ होतो की यहोवा त्यांना नीतिमान समजतो. आणि यामुळे यहोवा त्यांना त्याचे मित्र बनण्याची संधी देतो. बायबल सांगतं की, “त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.”—प्रकटी. ७:९, १३, १४.
१५, १६. मनाने शुद्ध असणारे लोक देवाला कसं पाहू शकतात?
१५ यहोवाने म्हटलं होतं: “माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” (निर्ग. ३३:२०) असं असेल तर मग मनाने शुद्ध असणारे लोक देवाला कसं पाहू शकतात? या वचनात, “पाहिल्यास” या शब्दासाठी मूळ ग्रीक भाषेत जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ कल्पना करणं, समजून घेणं आणि ओळख करून घेणं असा होतो. म्हणून ‘देवाला पाहणं’ याचा अर्थ, त्याचं व्यक्तिमत्त्व जाणून घेणं आणि त्याच्या गुणांबद्दल आदर बाळगणं असा होतो. (इफिस. १:१८) येशूने हुबेहूब आपल्या पित्याच्या गुणांचं अनुकरण केलं. म्हणूनच तो म्हणू शकला: “ज्याने मला पाहिलं आहे, त्याने पित्यालाही पाहिलं आहे.”—योहा. १४:७-९.
१६ यासोबतच आपण आपल्या जीवनात जेव्हा देवाची मदत अनुभवतो तेव्हाही आपण देवाला पाहत असतो. (ईयो. ४२:५) मनाने शुद्ध आणि विश्वासू राहणाऱ्यांना यहोवाने जी अभिवचनं दिली आहेत त्यावर आपलं लक्ष केंद्रित करूनही आपण देवाला पाहू शकतो. अभिषिक्त जणांचं पुनरुत्थान होऊन ते स्वर्गात जातील तेव्हा ते प्रत्यक्षात यहोवाला पाहतील.—१ योहा. ३:२.
समस्या असूनही आपण आनंदी राहू शकतो
१७. शांती टिकवून ठेवणारे आनंदी का असतात?
१७ येशूने पुढे म्हटलं: “जे शांती राखण्याचा प्रयत्न करतात ते सुखी आहेत.” (मत्त. ५:९) इतरांसोबत शांती टिकवून ठेवण्यासाठी जेव्हा आपण पुढाकार घेतो तेव्हा आपण आनंदी राहू शकतो. याकोबने म्हटलं: “नीतिमत्त्वाचे बी शांतिपूर्ण परिस्थितीत पेरले जाते आणि शांतीसाठी झटणाऱ्यांना त्याचे फळ मिळते.” (याको. ३:१८) यामुळे जर मंडळीतल्या किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीसोबत जुळवून घ्यायला तुम्हाला कठीण जात असेल, तर यहोवाला कळकळून प्रार्थना करा आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी मदत मागा. यहोवा तुम्हाला पवित्र आत्मा देईल. यामुळे तुम्ही ख्रिस्ती गुण दाखवू शकाल आणि तुम्ही आनंदी व्हाल. शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण पुढाकार घेणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल येशूने म्हटलं: “तर मग, तू आपलं अर्पण वेदीजवळ आणत असताना, तुझ्या भावाला तुझ्याविरुद्ध काही तक्रार आहे हे तुला आठवलं, तर तुझं ते अर्पण तिथेच वेदीसमोर ठेवून निघून जा. आधी आपल्या भावाशी समेट कर आणि मग परत येऊन आपलं अर्पण दे.”—मत्त. ५:२३, २४.
१८, १९. ख्रिश्चनांचा छळ करण्यात येतो तरी ते आनंदी का असतात?
१८ “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमचा अपमान व छळ करतात आणि तुमच्यावर सर्व प्रकारचे खोटे आरोप लावतात तेव्हा तुम्ही सुखी आहात.” येशूला नेमकं काय म्हणायचं होतं? त्याने पुढे म्हटलं: “हर्ष करा आणि अतिशय आनंदित व्हा, कारण स्वर्गात तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल; तुमच्या अगोदर होऊन गेलेल्या संदेष्ट्यांचाही त्यांनी असाच छळ केला होता.” (मत्त. ५:११, १२) प्रेषितांना जेव्हा मारण्यात आलं आणि प्रचार न करण्यास सांगण्यात आलं, तेव्हा ते “आनंद करत न्यायसभेतून बाहेर गेले.” त्यांना झालेली शिक्षा नक्कीच आनंददायक नव्हती. पण त्यांना “येशूच्या नावासाठी अनादर करण्याच्या लायकीचे समजण्यात आले,” यामुळे ते आनंदी होते.—प्रे. कार्ये ५:४१.
१९ आज यहोवाच्या लोकांचा येशूच्या नावासाठी छळ होतो तेव्हा तेही आनंदाने तो छळ सहन करतात. (याकोब १:२-४ वाचा.) प्रेषितांसारखं आपल्यालाही छळ आणि यातना सहन करणं आवडत नाही. पण आपण यहोवाला विश्वासू राहिलो तर तो आपल्याला सहन करण्याचं धैर्य देईल. बंधू हेनरिक डॉरनिक आणि त्यांच्या भावाच्या उदाहरणाचा विचार करा. ऑगस्ट १९४४ मध्ये अधिकाऱ्यांनी त्यांना यातना शिबिरात पाठवलं. त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी म्हटलं: “त्यांना काही करायला लावणं अशक्य आहे. त्यांच्या विश्वासामुळे मरणही आलं तरी त्यांना आनंदच होईल.” बंधू डॉरनिक म्हणतात: “मला माझ्या विश्वासासाठी मरण्याची इच्छा नक्कीच नव्हती; पण यहोवाला एकनिष्ठ असल्यामुळे माझ्यावर दुःख आलं तेव्हा मी ते धीराने आणि स्वाभिमानाने सहन केलं, याचा मला आनंद वाटतो.” त्यांनी पुढे म्हटलं: “कळकळून केलेल्या प्रार्थनांमुळे मी यहोवाच्या आणखी जवळ आलो आणि त्याने मला नेहमी मदत केली.”
२०. आनंदी देवाची सेवा करण्यात आपल्याला आनंद का मिळतो?
२० आपला ‘आनंदी देव’ यहोवा जर आपल्याला पाहून आनंदी असेल, तर मग आपला छळ झाला, कुटुंबातून विरोध आला, आपण आजारी पडलो किंवा वृद्ध झालो, तरीही आपण आनंदी राहू शकतो. (१ तीम. १:११) “जो कधीही खोटे बोलू शकत नाही” अशा देवाने आपल्याला बरीच अभिवचनं दिली आहेत, यामुळेही आपण आनंदी राहू शकतो. (तीत १:२) यहोवा ही अभिवचनं पूर्ण करेल तेव्हा आपल्याला आजच्या समस्या आठवणारही नाहीत. नंदनवनात आपलं जीवन किती आनंददायी आणि सुंदर असेल याची आपण आज पूर्णपणे कल्पनाही करू शकत नाही. त्या वेळी यहोवाचे सर्व उपासक “उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तो. ३७:११.