बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
चिंतांचा सामना करण्यासाठी आपल्याला बायबलमधून मदत मिळू शकते का?
तुम्ही काय म्हणाल?
हो
नाही
कदाचित
बायबलमध्ये काय सांगितलं आहे?
“आपल्या सर्व चिंता त्याच्यावर [देवावर] टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.” (१ पेत्र ५:७) चिंतांपासून मुक्त होण्यासाठी देव आपली मदत करेल अशी खात्री बायबल आपल्याला देतं.
बायबलमधून आपण आणखीन काय शिकू शकतो?
प्रार्थना करण्याद्वारे तुम्हाला “देवाची शांती” मिळेल आणि यामुळे चिंतांचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत होईल.—फिलिप्पैकर ४:६, ७.
देवाच्या वचनाचं वाचन केल्यामुळेसुद्धा आपल्याला तणावातून बाहेर यायला मदत होते.—मत्तय ११:२८-३०.
पण कधी अशी वेळ येईल का जेव्हा चिंताच नसणार?
काही लोक विश्वास करतात की . . . चिंता आणि तणाव या मानवांच्या जीवनाचा एक भाग आहे. तर इतर काहींचं मत आहे, की मृत्यूनंतरच्या जीवनात आपण सर्व चिंतापासून मुक्त होतो. तुम्हाला काय वाटतं?
बायबलमध्ये काय सांगितलं आहे?
देवाने वचन दिलं आहे, की तो अशा सर्व गोष्टी काढून टाकेल ज्यांमुळे आपल्याला चिंता वाटते. बायबलमध्ये म्हटलं आहे: “मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल.”—प्रकटीकरण २१:४.
बायबलमधून आपण आणखीन काय शिकू शकतो?
देवाच्या राज्यात लोक शांती आणि सुख अनुभवतील. —यशया ३२:१८.
आज आपल्याला विनाकारण ज्या चिंतांचा आणि तणावांचा सामना करावा लागतो त्या नसणार.—यशया ६५:१७.