गरज एका नवीन जगाची!
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलं: “आज आपण अशा जगात राहत आहोत जिथे सगळीकडे समस्याच समस्या आहेत.” हे किती खरं आहे ना!
आपल्याला रोजच वाईट बातम्या ऐकायला मिळतात. जसं की:
रोगराई आणि महामाऱ्या
नैसर्गिक आपत्ती
गरिबी आणि उपासमार
प्रदूषण आणि पृथ्वीचं वाढतं तापमान
गुन्हेगारी, हिंसा आणि भ्रष्टाचार
युद्धं
खरंच, एका नवीन जगाची आपल्याला खूप गरज आहे. एक असं जग जिथे:
चांगलं आरोग्य असेल
जीवन सुरक्षित असेल
भरपूर अन्न असेल
वातावरण चांगलं असेल
सगळ्यांना एकसारखं वागवलं जाईल
सगळीकडे शांतीच शांती असेल
पण हे नवीन जग नेमकं आहे काय?
या जुन्या जगाचं काय होईल?
आपल्याला नवीन जगात राहायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे?
या आणि अशा इतर प्रश्नांची बायबलमध्ये काय उत्तरं दिली आहेत, ते या टेहळणी बुरूज मासिकात सांगितलं आहे.