जगाचा अंत जवळ आहे का?
जगाचा अंत होईल असं लोकांनी अनेकदा म्हटलं होतं. पण तसं घडलं नाही. मग खरं काय आहे? जगाचा अंत होईल की नाही?
बायबल काय सांगतं?
जगाचा अंत कसा होईल?
तो केव्हा होईल?
त्यातून आपण वाचू शकतो का?
अंत झाल्यानंतरचं जग कसं असेल?
या प्रश्नांची बायबल काय उत्तरं देतं ते या मासिकात सांगितलं आहे. ती उत्तरं वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि दिलासाही मिळेल.
पृथ्वीसाठी आणि मानवांसाठी देवाने काय करायचं ठरवलं आहे याबद्दल तुम्हाला माहिती द्यायला यहोवाच्या साक्षीदारांना नक्कीच आवडेल.