उत्क्रांती की निर्मिती?
जखमा भरून काढण्याची शरीराची किमया
मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रक्रिया चालू असतात. यांमुळं आपण जिवंत राहतो. त्या प्रक्रियांपैकी एक म्हणजे, जखमा भरून काढण्याची प्रक्रिया. जखम झाल्याबरोबर ही प्रक्रिया सुरू होते.
विचार करा: अनेक पेशींच्या किचकट कार्यांमुळं शरीरात झालेली जखम भरून निघते.
-
जखम झाल्या ठिकाणी लगेच रक्त पेशी (प्लेटलेट्स) गोळा होऊन रक्त गोठवतात. यामुळं, इजा झालेल्या रक्तवाहिन्या वाहायचं थांबतात.
-
जखम झालेल्या ठिकाणी लगेच सूज येते. यामुळं, संसर्गापासून संरक्षण होतं आणि जखमेमुळं काही “कचरा” म्हणजे धूळकण वगैरे असेल तर तो शरीराच्या बाहेर काढला जातो.
-
काही दिवसांतच आपल्या शरीरातील खराब तंतू निघून त्यांच्या जागी नवीन तंतू येतात, जखम आकसायला लागते आणि इजा झालेल्या रक्तवाहिन्या बऱ्या होऊ लागतात.
-
इजा झालेल्या कातडीच्या हळूहळू खपल्या पडून त्या जागी नवीन कातडी येऊ लागते.
रक्त गोठवण्याची शरीराची प्रक्रिया पाहून संशोधक असं प्लास्टिक बनवायचा प्रयत्न करत आहेत जे जखमेप्रमाणेच आपोआप “भरून” निघेल. भरून निघणाऱ्या या मटिरियलमध्ये, एकदम बारीक अशा नळ्या असतील. हे मटिरियल काही कारणास्तव खराब झालंच म्हणजे ते चिरलं गेलं किंवा त्याला छिद्रं पडली तर या बारीक नळ्यांतून दोन प्रकारची रसायनं बाहेर येतील. ती एकमेकांत मिसळताना त्यांचं चिकट द्रव्य तयार होईल आणि ते पसरत-पसरत ते छिद्र किंवा चीर भरून काढेल. हे चिकट द्रव्य वाळल्यावर मटिरियलची मजबूती टिकून राहील. कृत्रिमप्रकारे भरून निघणारं हे प्लास्टिक तयार करण्याचं काम अजूनही चालू आहे. जखमा भरून काढण्याच्या निसर्गातील प्रक्रियेची त्यांनी ‘नक्कल’ करण्याचा प्रयत्न केला आहे, असं एका संशोधकानं कबूल केलं आहे.
तुम्हाला काय वाटतं? शरीराची जखम भरून काढण्याची प्रक्रिया उत्क्रांतीनं अस्तित्वात आली, की त्याची रचना करण्यात आली? (g15-E 12)