तणाव कसा कमी कराल?
कोणत्या कारणांमुळे तणाव येतो?
एका प्रसिद्ध आरोग्य संस्थेचं म्हणणं आहे की “बऱ्याच लोकांमध्ये तणावाचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसून येत आहे. आज लोकांच्या जीवनात सतत बदल घडत आहेत आणि पुढे काय होईल हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही.” जीवनात होणाऱ्या कोणत्या काही बदलांमुळे आणि अनिश्चित गोष्टींमुळे तणाव येऊ शकतो याबद्दल आता आपण पाहू या.
-
घटस्फोट
-
प्रिय व्यक्तीचा मृत्यू
-
गंभीर आजार
-
भयंकर अपघात
-
गुन्हेगारी
-
धकाधकीचं जीवन
-
नैसर्गिक किंवा मानवांमुळे निर्माण झालेल्या विपत्ती
-
शाळेत किंवा कामावर येणारा दबाव
-
नोकरीबद्दल आणि आर्थिक सुरक्षेबद्दल चिंता