व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वैज्ञानिक काय सांगू शकत नाहीत

वैज्ञानिक काय सांगू शकत नाहीत

असं म्हणता येईल, की या अफाट विश्‍वात ज्या गोष्टी आपण पाहू शकतो, त्यांच्या जवळजवळ प्रत्येक पैलूचा अभ्यास वैज्ञानिकांनी केला आहे. तरीसुद्धा असे काही महत्त्वाचे प्रश्‍न आहेत ज्यांची उत्तरं त्यांच्याकडे नाही.

विश्‍वाची आणि जीवनाची सुरुवात कशी झाली याबद्दल वैज्ञानिकांना ठामपणे सांगता आलं आहे का? याचं थेट उत्तर नाही असं आहे. काही जण असं म्हणतात, की विश्‍वोत्पत्ती शास्त्राचा अभ्यास करणारे वैज्ञानिक विश्‍वाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल सांगू शकतात. पण डार्टमाऊथ कॉलेजमधले खगोलशास्त्राचे प्राध्यापक मार्सेलो ग्लेझर a असं म्हणतात, की “विश्‍वाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल आजपर्यंत काहीच स्पष्टीकरण आपण दिलेलं नाही.”

तसंच, जीवनाच्या उत्पत्तीबद्दल सायन्स न्यूज  मॅगझीनमधल्या एका लेखात असं म्हटलं आहे: “पृथ्वीवर जीवनाची सुरुवात नेमकी कशी झाली याचं अचूक उत्तर देणं, कदाचित अशक्य आहे. कारण पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात नेमकं काय-काय घडलं याबद्दलचे बहुतेक भूशास्त्रीय पुरावे केव्हाच नष्ट झाले आहेत.” या विधानांवरून कळतं, की या विश्‍वाची आणि जीवनाची सुरुवात कशी झाली याचं उत्तर विज्ञान आजपर्यंत देऊ शकलेलं नाही.

त्यामुळे तुम्हाला कदाचित असा प्रश्‍न पडेल, की ‘जर पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची रचना करण्यात आली आहे, तर तिचा रचानाकार कोण आहे?’ तुम्हाला कदाचित असेही प्रश्‍न पडले असतील, की ‘जर खरंच एक बुद्धिमान आणि प्रेमळ निर्माणकर्ता आहे, तर तो मानवांचं दुःख पाहूनसुद्धा काही करत का नाही? किंवा एकमेकांपेक्षा अगदीच उलट असणाऱ्‍या पद्धतींनी तो मानवांना आपली उपासना का करू देतो? आणि त्याचे उपासक वाईट कामं करतात तेव्हा तो ते का खपवून घेतो?’

साहजिकच, विज्ञानाकडे या प्रश्‍नांची उत्तरं नाहीत. पण याचा अर्थ या प्रश्‍नांची तर्काला पटणारी उत्तरंच नाहीत असा होत नाही. उलट बऱ्‍याच लोकांना बायबलमध्ये या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरं मिळाली आहेत.

बायबलचं परीक्षण केल्यावर काही वैज्ञानिक निर्माणकर्त्याला का मानू लागले आहेत, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर jw.org/mr या वेबसाईटला भेट द्या. आणि त्यात जीवनाच्या सुरुवातीबद्दल मतं ही व्हिडिओ मालिका शोधा.

a मार्सेलो ग्लेझर अज्ञेयवादी, म्हणजे देवाचं अस्तित्व मानणं आणि ते सिद्ध करणं अशक्य आहे या मताचे आहेत.