जागतिक सरकार संयुक्त राष्ट्र संघ हे त्याचे उत्तर आहे का?
जागतिक सरकार संयुक्त राष्ट्र संघ हे त्याचे उत्तर आहे का?
अलिकडच्या वर्षांमध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने जगात पुन्हा एकदा आत्मविश्वास आणि कौतुक मिळवले आहे. सामान्य लोकांत, “युएन” [संयुक्त राष्ट्र संघ] हा संक्षिप्त शब्द, शौर्याच्या कल्पनेची भावना उत्पन्न करतो: जगाच्या अशा भागांमध्ये जेथे दंगा नेहमी उसळतो त्या ठिकाणी शांती स्थापन करण्यासाठी निळ्या लोकरीच्या टोप्या घातलेले धिटाईने धावणारे सैन्य, आफ्रिकेच्या उपाशी आश्रितांसाठी अन्न आणणारे मुक्तता कर्मचारी, व नव्या जगाची व्यवस्था स्थापन करण्यासाठी निस्वार्थपणे काम करणारे समर्पित पुरूष आणि स्त्रिया.
इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्युनच्या अहवालानुसार, द वॉशिंग्टन पोस्टने हाती घेतलेल्या नऊ महिन्याच्या चौकशी मध्ये त्या शौर्याच्या कल्पनेच्या मागची वस्तुस्थिती, “प्रभावीपणाला दुर्बल बनवणारे आणि दुरूपयोग व न्यूनतेच्या अधीन असलेली प्रचंड, अनियंत्रित नोकरशाही” ही आहे. हजारो पानांचा दस्त-ऐवज व संयुक्त राष्ट्र संघाच्या सध्याच्या आणि माजी अधिकाऱ्यांच्या मुलाखतींच्या आधारावर, ह्या अभ्यासाने पुढील प्रमाणे चित्र रेखाटले.
आफ्रिकेला मदत: संयुक्त राष्ट्र संघाने युद्ध, उपासमार, गरीबी आणि रोगराई यामुळे नाशाप्रत गेलेल्या, आफ्रिकेला मदत करण्यासाठी करोडो रूपये ओतले आहेत. यामुळे असंख्य जीव वाचले गेले.
तरीही, अव्यवस्था, निष्काळजीपणा, व काही वेळा तर, भ्रष्टतेमुळे देखील हजारोंचे जीव आणि लाखो डॉलर गमावले गेले. संयुक्त राष्ट्र संघाने दुष्काळाने जर्जर झालेल्या व प्रत्येक दिवशी अनेक लोक मरण पावणाऱ्या सोमालिया येथे मुक्ततेची साधने पाठवली. परंतु ट्रिब्यून मध्ये ह्युमन राईट्स वॉचचे प्रमुख कार्यकारी अधिकारी, ऑर्ये नेर यांचा संदर्भ घेतला आहे जेथे ते म्हणाले: “संयुक्त राष्ट्र संघ आणि इतर विविध संघटना इतक्या वाईट रीतीने निष्काळजी व अकार्यक्षम झाले आहेत की सोमालियाचे दुःख कमी करण्यात मुळीच त्यांनी त्यांची भूमिका पार पाडली नाही.”
संयुक्त राष्ट्र संघाच्या काही अधिकाऱ्यांनी, अन्नाची मदत दुसरीकडे पाठवली असे दाखवले, मानव हितकारी साहाय्याचा अपहार केला, अप्रामाणिकतेने वस्तू किंवा सेवा मिळविल्या, काळा बाजार केला, नाण्यांच्या अदलाबदलाचा खोटा हिशोब तयार केला, असा दोष त्या अहवालाने लावला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या चौकशी करणाऱ्यांना, ह्या फसवेगिरीचा पुरावा, सात पेक्षा अधिक आफ्रिकी राष्ट्रांमध्ये सापडला.
शांती कायम ठेवणे: संयुक्त राष्ट्र संघाचा मुख्य उद्देश शांती कायम ठेवण्याचा असला तरीही, १९४५ ह्या त्याच्या स्थापनेच्या वर्षापासून, शंभरपेक्षा अधिक मोठे झगडे झालेत, व युद्धांमध्ये २ करोड लोक मारले गेले. तथापि, १९८७ पासून, संयुक्त राष्ट्र संघाने, इतिहासात पूर्वी कधीही केले नाही तितके, शांती कायम ठेवण्याच्या १३ उपक्रमास आरंभ केला आहे.
काही जण असाही वाद घालतील की ह्या उपक्रमांची किंमत, भयानक युद्धाच्या किंमतीपेक्षा बरी आहे पण, अनेक लोक अशी तक्रार करतात की गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. उदाहरणार्थ, शांती कायम ठेवण्याचे उपक्रम, ज्यांची किंमत हजारो डॉर्लर होते परंतु बोलणी करताना दोन्ही पक्ष हट्टास पेटल्यामुळे कठिण परिस्थिती निर्माण होते व ती दशकांसाठी रेंगाळत असतात. कॅम्बोडिया येथील शांती आणणारे संयुक्त राष्ट्र संघ मिशन सैन्याच्या तुकडीचे दूरदर्शन संच आणि व्हीसीआर यासाठी १० लाख डॉलर, शिवाय आणखी ६,००,००० डॉलर, मासिकांच्या आणि वृत्तपत्रकांच्या वर्गणीसाठी बाजूला काढून ठेवते.
सुधारणा: संयुक्त राष्ट्र संघामध्येच सुधारणा करण्याची मागणी केली जाते, परंतु खरोखरच कशाची सुधारणा केली पाहिजे याविषयी अनेकांच्या मतांमध्ये भिन्नता होते. विकास होत चाललेले राष्ट्र, निर्णय घेण्याच्या क्रियेची मोठी मागणी करतात व आर्थिक आणि सामाजिक कार्यक्रम विस्तृत करू इच्छितात. उद्योगप्रधान राष्ट्र, हे कार्यक्रम कमी करण्यास व भ्रष्ट अव्यवस्थेचा व घाणीचा अंत करू इच्छितात.
“वास्तविकतेत सुधारणा करायची म्हणजे तुम्हाला नोकरशाहीत अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या खरोखर अशक्य आहेत, जसे की: तुम्हाला जागा स्वच्छ करावी लागते. काही तरी अर्थपूर्ण करायचे म्हणजे तुम्हाला, ४५ वर्षांपासून घट्टपणे चिकटून राहिलेल्या गोष्टींना खरवडून काढले पाहिजे; आणि हे तर खूपच मोठे काम आहे.”
मानवजातीच्या राज्यकारभाराची व्यवस्था पाहण्यासाठी एक सरकारीय अधिकाराची गरज ख्रिश्चनांना भासत असली तरी, संयुक्त राष्ट्र संघ ते पूर्ण करील असा त्यांचा विश्वास नाही. उलटपक्षी, येशूने त्याच्या शिष्यांना ज्या सरकाराविषयी प्रार्थना करावयास शिकवले त्या, देवाच्या राज्याची ते वाट पाहत आहेत.—मत्तय ६:१०. (g93 9⁄22)