व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तिच्या आठवणीत राहिलेलं गीत

तिच्या आठवणीत राहिलेलं गीत

तिच्या आठवणीत राहिलेलं गीत

“‘महान यहोवा त्याच्या गौरवात सिंहासनावर विराजमान’ हे भक्‍तिगीत आम्ही शाळेत असताना गायचो. तेव्हा मला नेहमी प्रश्‍न पडायचा, ‘हा यहोवा कोण आहे?’”

ग्वेन गूच यांच्या वरील विचारांशी एका वाचकाने मात्र सहमती दर्शवली; ग्वेन गूच एक यहोवाच्या साक्षीदार आहेत आणि त्यांची जीवनकथा टेहळणी बुरूजमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. * अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधल्या सीएटल येथील व्हीरा म्हणतात की, “मलासुद्धा माध्यमिक शाळेत असताना अगदी हाच अनुभव आला होता.”

एक विशिष्ट गाणं ऐकल्यावर व्हीराला देखील ग्वेनसारखाच प्रश्‍न पडला होता की, हा यहोवा कोण असावा. व्हीरा यांना त्याचं उत्तर १९४९ सालीच मिळालं; त्यांच्या भावानं त्यांना सांगितलं की यहोवा हे बायबलमध्ये दिलेलं देवाचं व्यक्‍तिगत नाव आहे.

व्हीरा यांना यहोवाची साक्षीदार बनून जवळजवळ ५० वर्षे झाली आहेत. पण शाळेतलं ते गीत अजूनही त्यांच्या आठवणीत आहे. त्या म्हणतात की, “कित्येक वर्षं मी ते गीत कुठून घेतलं असावं ते शोधायचा प्रयत्न करत होते.” शेवटी, एका म्युझिक स्टोअरच्या साहाय्यानं त्यांना यश मिळालं. हे गाणं १८२५ साली फ्रान्झ स्क्युबर्ट यांनी लिहिलं होतं. त्या गाण्याचे बोल खरोखर यहोवाची स्तुती करतात. उदाहरणार्थ, त्याचे काही बोल पुढीलप्रमाणे आहेत:

“महान तू प्रभू यहोवा! धरणी नि आकाश वर्णिती तुझिया सामर्थ्या. . . . रानातील पिसाट वारा, प्रवाहाची बुलंद गर्जना, वदती ती सकळ तुझिया सामर्थ्या . . . गुणगुणती रानं-वनं, डोलती सोनेरी कणसं; शानदार थाट सुगंधी सुमनांचा, ताऱ्‍यांनी सजिले निळ्याशार आभाळा, वदती ती सकळ तुझिया सामर्थ्या . . . शब्द झंझावती गर्जनेचा, धरतीवरी लखलखाट विजांचा, स्पंदने हृदयाची देती महिमा यहोवा . . . आमुच्या सनातन देवा. असे परम, कृपा नि दया दाविण्या . . . असशी महान तू प्रभू यहोवा!”

व्हीरा म्हणतात: “या गीताचे बोल लोकांना दाखवून मी त्यांना सांगते की पाहा, १८०० च्या शतकातसुद्धा लोकांना देवाचं नाव माहीत होतं आणि ते त्याची स्तुती करत होते.” खरं म्हणजे, अगदी प्राचीन काळापासून स्त्री-पुरुषांनी गीतांमधून यहोवाची स्तुती केली आहे. आणि ही स्तुती सदासर्वदा केली जाईल कारण स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याची स्तुती करायला असंख्य कारणं आहेत.

[तळटीपा]

^ मार्च १, १९९८ चे टेहळणी बुरूज पाहा.

[१३ पानांवरील चित्र]

व्हीरा