खरा विश्वास—म्हणजे काय?
बायबलचा दृष्टिकोन
खरा विश्वास—म्हणजे काय?
“विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.
विश्वास म्हणजे काय? काहीजण म्हणतात की, विश्वास म्हणजे देवाच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा नसतानाही देवावर श्रद्धा असणे. एच. एल. मेन्केन यांनी विश्वासाचे वर्णन, “एखादी अशक्य कोटीतली गोष्ट शक्य होईल अशी चुकीची समज बाळगणे” असे केले. बायबलमध्ये खऱ्या विश्वासाचे असेच वर्णन केले आहे का? विश्वास नेमका काय आहे याबद्दल स्पष्ट समज असणे फार महत्त्वाचे आहे, नसल्यास, वरती शास्त्रवचनात सांगितल्याप्रमाणे ‘विश्वासावाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे.’
बायबल म्हणते: “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा” आहे. (इब्री लोकांस ११:१) याचाच अर्थ, आपला विश्वास निराधार नव्हे तर अचूक ज्ञानावर आधारित असला पाहिजे; अचूक ज्ञान म्हणजेच अशी वस्तुस्थिती जिच्या आधारावर आपल्याला योग्य निर्णय घेता येऊ शकतो. त्यासाठी फक्त भरवसा करणे पुरेसे नाही तर त्याला तसे ठोस कारणही असावे लागते.
उदाहरणार्थ: कदाचित तुमचा एखादा मित्र असेल ज्याच्याविषयी तुम्ही असे म्हणू शकता: “मला त्याच्यावर पूर्ण भरवसा आहे. तो आपले वचन पूर्ण करेल याची मला खात्री आहे. मी कधी संकटात सापडलो तर तो नक्की माझ्या मदतीला धावून येईल.” हे तुम्ही अशा व्यक्तीबद्दल मुळीच म्हणणार नाही जिच्यासोबत तुमची अलीकडेच ओळख झाली आहे. पण ज्या व्यक्तीने वारंवार आपली विश्वासयोग्यता सिद्ध केली आहे तिच्याबद्दलच तुम्ही खात्री देऊ शकाल. धार्मिक विश्वासाबद्दलही असेच असले पाहिजे. आपल्या धार्मिक विश्वासाने आपल्याला भक्कम, विश्वासयोग्य पुराव्यावर आधारलेली आशा आणि खातरी दिली पाहिजे.
विश्वास की अंधविश्वास?
आजकाल ज्याला विश्वास म्हणतात तो खरे पाहता विश्वास नसून अंधविश्वास असतो; म्हणजेच, कशावरही योग्य कारणाविना किंवा आधाराविना डोळे झाकून विश्वास ठेवणे. भोळपणाने किंवा चंचल भावनांच्या आहारी जाऊन ठेवण्यात येणाऱ्या विश्वासाला अंधविश्वास म्हणता येईल. त्याला कोणताही खात्रीशीर, भक्कम आधार नसतो.
अंधविश्वासामुळे एखादी व्यक्ती अविचाराने कोणतेही नीतिसूत्रे १४:१५) प्रेषित पौलाने लिहिले: “सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा.” (१ थेस्सलनीकाकर ५:२१) बायबल अंधविश्वासाला कोणत्याही प्रकारे थारा देत नाही. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी काही ठोस पुरावा आहे का याचे परीक्षण करावे असे बायबल सांगते.
निष्कर्ष काढू शकते जे बायबलच्या एकवाक्यतेत नसतील. म्हणूनच, निराधार विश्वासाबद्दल बायबल असे म्हणते: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” (खरा विश्वास आणि अंधविश्वास यांच्यामधला फरक जाणता येणे फार महत्त्वाचे आहे. कारण एखादी व्यक्ती धार्मिक असेलही पण तिच्या विश्वासाला आधार असेलच असे नाही. पौलाने लिहिले: “सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनीकाकर ३:२) मात्र काहींच्या ठायी बायबलवर आधारलेला विश्वास आहे आणि त्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो.
खरा विश्वास मनुष्याला देवाशी जोडतो
विश्वासाची तुलना एका साखळीशी करता येते. खात्री आणि भरवशाच्या कड्यांनी बनलेली ही साखळी मनुष्याला आणि देवाला एकत्र आणते. पण, अशाप्रकारचा विश्वास जन्मतःच आपल्यामध्ये नसतो; तो निर्माण करावा लागतो. तर मग, खरा विश्वास कसा निर्माण करता येईल? बायबल म्हणते: “ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते.”—रोमकर १०:१७.
यास्तव, आपण देवाविषयी आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्या शिकवणींविषयी जाणून घेतले पाहिजे. हे ज्ञान सहज मिळविणे शक्य नाही, त्याकरता प्रयत्नांची जोड हवी. (नीतिसूत्रे २:१-९) बायबल किती विश्वासयोग्य आहे याची खात्री पटवून घ्यायची असेल, तर बायबल काय म्हणते ते पाहण्याचा प्रयत्न करणे जरूरीचे आहे.
परंतु, खरा विश्वास म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे किंवा एखादी गोष्ट खरी आहे असे मानणे एवढेच नाही. तर त्यामध्ये अंतःकरणही सामील होते; कारण अंतःकरण हेच प्रेरणास्थान आहे. रोमकर १०:१० म्हणते की ‘अंतःकरणाने विश्वास ठेवला जातो.’ याचा काय अर्थ होतो? बायबलमध्ये लिहिलेल्या देवाच्या वचनांवर मनन करत राहिल्यामुळे व त्याची कदर सतत वाढवल्यामुळे आपल्या अंतःकरणात बायबलचा संदेश खोलवर रूजतो. देवाच्या अभिवचनांप्रमाणे काम करत राहण्याची चालना आपल्याला मिळत राहिल्याने आणि त्याच्या आशीर्वादांचा पुरावा दिसत राहिल्याने आपला विश्वास अधिक बळकट होत जातो.—१ थेस्सलनीकाकर १:३.
खरा विश्वास किती अनमोल आहे! नाही का? देवावर भरवसा ठेवून, आपल्याला मार्गदर्शित करण्याच्या त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल खात्री बाळगून आपण संकटाचा सामना करतो तेव्हा आपला फायदाच होतो. शिवाय, देवाच्या पुत्राने अर्थात येशू ख्रिस्ताने, विश्वासाचा एक दीर्घकालीन फायदा दाखवला; तो म्हणाला: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (तिरपे वळण आमचे.) (योहान ३:१६) होय, सार्वकालिक जीवन—विश्वास बाळगणाऱ्यांसाठी राखून ठेवलेले केवढे हे अद्भुत बक्षीस!
देव आपल्या सेवकांना प्रतिफळ देईल या अभिवचनावर विश्वास ठेवल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन लाभतो. इब्री लोकांस ११:६ नुसार, खरा विश्वास म्हणजे “[देवाचा] शोध झटून करणाऱ्यांना” तो प्रतिफळ देतो असे मानणे. यावरून स्पष्ट होते की, खरा विश्वास हा भोळसटपणा नाही. त्याचप्रमाणे, फक्त देव आहे असे मानणेसुद्धा खरा विश्वास नाही. खरा विश्वास म्हणजे, देवाचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो हे स्वीकारणे. तुम्हाला खरोखर, प्रामाणिकपणे देवाला जाणून घ्यायचे आहे का? तर मग, त्याचे वचन अर्थात बायबल यातून अचूक ज्ञान मिळवा आणि याची खात्री बाळगा की तुमच्या विश्वासाचे जरूर प्रतिफळ मिळेल.—कलस्सैकर १:९, १०.
[२० पानांवरील चित्राचे श्रेय]
Drawings of Albrecht Dürer/Dover Publications, Inc.