व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वांकरता उत्तम आरोग्य—साध्य करण्याजोगे ध्येय?

सर्वांकरता उत्तम आरोग्य—साध्य करण्याजोगे ध्येय?

सर्वांकरता उत्तम आरोग्य—साध्य करण्याजोगे ध्येय?

तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सर्वांचे आरोग्य चांगले असावे अशी तुमची इच्छा आहे का? निश्‍चितच असेल. पण खरे तर आपल्यापैकी अधिकांश लोकांना अधूनमधून केवळ किरकोळ स्वरूपाची दुखणी सहन करावी लागतात; लाखो लोकांना तर क्लेशदायक आजारपण आयुष्यभर पुरते.

तथापि, रोगराईला आळा घालण्याकरता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. संयुक्‍त राष्ट्रांमार्फत कार्य करणाऱ्‍या जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्युएचओ) उदाहरण घ्या. १९७८ साली डब्ल्युएचओ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत १३४ देशांतून व संयुक्‍त राष्ट्रांच्या ६७ संस्थांतून आलेल्या प्रतिनिधींनी कबूल केले, की केवळ आजारपणापासून सुटका म्हणजे आरोग्य नव्हे. त्यांनी असे प्रतिपादित केले, की आरोग्य म्हणजे “शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने पूर्ण सुदृढता.” इतकेच काय, तर या प्रतिनिधींनी आरोग्याला “मूलभूत मानवी हक्क” म्हणून घोषित करण्याचे धाडसी पाऊल उचलले! अशारितीने डब्ल्युएचओने “जगातील सर्व लोकांना समाधानकारक प्रमाणात आरोग्य मिळवून देण्याचे” ध्येय स्वीकारले आहे.

हे ध्येय अतिशय कौतुकास्पद, नव्हे, उदात्त आहे. पण ते खरोखर कधी साध्य करता येईल का? मानवांनी आजमावलेल्या सर्व क्षेत्रांपैकी, वैद्यकीय क्षेत्राने सर्वसामान्य लोकांची सर्वाधिक प्रशंसा व भरवसा कमवला आहे. द युरोपियन या ब्रिटिश दैनिकानुसार, पाश्‍चिमात्य देशांतील लोकांना “प्रत्येक दुखण्यावर एक गोळी या ‘जादुई उपचाराच्या’ पारंपरिक वैद्यकीय संकल्पनेची सवय झाली आहे.” दुसऱ्‍या शब्दांत, प्रत्येक दुखण्यासाठी एक साधे सोपे औषध असावे अशी आपण अपेक्षा करतो. पण वैद्यकीय व्यवसाय ही मोठी अपेक्षा खरेच पूर्ण करू शकेल का? (g०१ ६/८)