बाल शोषणाचा लवकरच अंत!
बाल शोषणाचा लवकरच अंत!
“मानवी हक्कांच्या जागतिक घोषणेत, संयुक्त राष्ट्राने असे जाहीर केले की बालकांची विशेष काळजी घेण्याची व त्यांना मदत पुरवण्याची खास गरज आहे,” असे कन्व्हेन्शन ऑन द राइट्स ऑफ चाइल्ड (बालकांच्या हक्कांचा ठराव) याच्या प्रस्तावनेत म्हणण्यात आले होते. कुटुंबाच्या महत्त्वाविषयी ते पुढे म्हणते: “बालकाच्या किंवा बालिकेच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्याकरता त्यांची वाढ एका कुटुंबाच्या सान्निध्यात, आनंदाच्या, वात्सल्याच्या आणि समजूतदारपणाच्या वातावरणात झाली पाहिजे.” पण हा आदर्श वास्तविकतेपासून बराच दूर आहे.
मुलांकरता एका चांगल्या जगाबद्दल केवळ बोलणे पुरेसे नाही. नैतिक ऱ्हास सर्वत्र होत आहे आणि बऱ्याच लोकांच्या मते ही परिस्थिती अपेक्षितच आहे. कायद्याच्या अंमलबजावणीने सर्वत्र पसरलेली दुष्टाई आणि लोभी वृत्ती आटोक्यात आणता येत नाही. आईवडिलही आपल्या मुलांना प्रेम आणि संरक्षण देण्याऐवजी सहसा त्यांना मोकाट सोडून देतात. मग बाल वेश्याव्यवसाय संपुष्टात येण्याची खरीच आशा करता येते का?
सर्व मुलांना एक प्रेमळ कुटुंब आणि सुरक्षित भविष्य देण्यास ही नीतीभ्रष्ट व्यवस्था यशस्वी ठरली नाही, पण आपला निर्माणकर्ता लवकरच सर्व प्रकारच्या विकृत प्रवृत्ती, नीतिसूत्रे २:२१, २२.
अनैतिकता तसेच बाल वेश्याव्यवसायासही पूर्णतः नाहीसे करील. जगाला याचे आश्चर्य वाटेल पण लवकरच यहोवा देव आपल्या राज्यामार्फत मानवी कारभारांत हस्तक्षेप करेल. भ्रष्टाचार आणि शोषण करणाऱ्यांना देवाच्या न्यायदंडातून सुटका मिळणार नाही. फक्त जे लोक आपल्या सहमानवांवर प्रेम करतात तेच केवळ देवाच्या नवीन जगात प्रवेश करतील. “सरळ जनच देशांत वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील. दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल, अनाचाऱ्यांचे त्यांतून निर्मूलन होईल.”—मुले आणि प्रौढ, अशा सर्वांना अनैतिकता आणि लैंगिक शोषणाच्या भीतीविना जगता येईल तेव्हा किती मोठी सुटका मिळेल याची कल्पना करा! शोषण व हिंसाचारामुळे झालेले भावनिक व शारीरिक नुकसानही गतकाळातील इतिहास बनेल. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांना त्या भयानक आठवणी किंवा दुष्परिणाम पुन्हा कधीही सतावणार नाहीत. “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.”—यशया ६५:१७.
मग कोणताही बालक दुराचार किंवा लैंगिक शोषणाला बळी पडण्याकरता जन्म घेणार नाही. आनंद, वात्सल्य आणि समजूतदारपणा केवळ स्वप्न राहणार नाहीत. देवाच्या नव्या जगातील रहिवाशांबद्दल यशया ११:९ म्हणते: “[ते] उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत.”
खरोखर, गरिबी, ड्रग्सचा दुरुपयोग, अशांत कुटुंबे, आणि अनैतिकता नाहीशी होईल तेव्हा किती आनंददायक परिस्थिती असेल! शांती, धार्मिकता आणि सुरक्षिततेचे राज्य असेल. “माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानांत व सुखाश्रमात राहतील.”—यशया ३२:१८. (g०३ २/०८)
[९ पानांवरील चौकट/चित्रे]
आईवडिलांचे प्रेम कुटुंबाला विस्कळीत होण्यापासून रोखू शकते
● “माझ्या आईवडिलांनी मला शाळेत असतानाच एक हुन्नर शिकण्याद्वारे वेळेचा सदुपयोग करण्याचे प्रोत्साहन दिले. त्यांनी स्वतःच्या आवडीनिवडी माझ्यावर थोपल्या नाहीत पण मला जो अभ्यासक्रम हवा होता त्याकरता योग्य शाळा निवडण्याकरता त्यांनी मला अवश्य मदत केली.”—टाईस.
● “माझी बहीण आणि मी खरेदीला जायचो तेव्हा आईसुद्धा आमच्यासोबत यायची. विचारपूर्वक खर्च करण्यास आम्हाला मदत करण्यासोबतच तिने आम्हाला नेहमी सोज्ज्वळ व शालीन कपडे घ्यायला मदत केली.”—बियांका.
● “आम्ही पार्टीला जाणार असू तर तेथे आणखी कोणकोण येणार आहेत, कशाप्रकारचे संगीत असेल आणि पार्टी कितीला सुरू होऊन कितीला संपेल याविषयी माझे आईवडील नेहमी चौकशी करायचे. बहुतेक पार्ट्यांना आम्ही सर्व कुटुंब मिळूनच जायचो.”—प्रीसीला.
● “लहानपणी आणि किशोरवयात माझ्या आईवडिलांसोबत माझा उत्तम सुसंवाद होता. एका शाळकरी मैत्रिणीने हे पाहिले तेव्हा ती मला म्हणाली: ‘तू तुझ्या आईवडिलांशी कोणत्याही विषयावर अगदी मोकळेपणाने बोलू शकतेस, मला तुझा हेवा वाटतो. मला तर माझ्या आईशीही बोलायला लाज वाटते, आणि सहसा इतरांकडूनच मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळवावी लागतात.’”—सामारा.
● “किशोरवयात मी अगदी आनंदी होते. सर्वजण चांगलेच आहेत असे माझे मत होते आणि मी सतत हसत राहायचे. माझ्या मित्रमैत्रिणींसोबत मला अगदी मोकळे वाटायचे आणि त्यांच्यासोबत बऱ्याच गंमतीजमती मी करायचे. माझा स्वभावच असा आहे हे ओळखून माझ्या आईवडिलांनी कधीही मला बदलण्याचा प्रयत्न केला नाही. पण विरुद्धलिंगी व्यक्तींसोबत वागताना मी विचारपूर्वक आणि सभ्यतेने वागले पाहिजे हे समजून घेण्यास मात्र त्यांनी मला प्रेमळपणे मदत केली.”—टाईस.
● “इतर तरुणांप्रमाणेच मलासुद्धा विरुद्धलिंगी व्यक्तीचे आकर्षण होते. विशिष्ट वय होण्याआधी लग्नाचा विचार करायचा नाही हे माझ्या वडिलांनी मला स्पष्ट सांगितले होते. मला याबद्दल वाईट वाटले नाही. उलट माझ्या आईवडिलांना माझी काळजी आहे आणि भविष्यात कोणतेही नुकसान होण्यापासून ते माझा बचाव करू इच्छितात हे मी ओळखले.”—बियांका.
● “माझ्या आईवडिलांच्या उदाहरणामुळे लग्नाविषयी माझा सकारात्मक दृष्टिकोन होता. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि ते अत्यंत मोकळेपणाने एकमेकांजवळ आपले विचार व्यक्त करत होते. मला आठवते मी एका मुलासोबत मैत्री केली तेव्हा विशिष्ट परिस्थितीत कसे वागायचे याविषयी माझ्या आईने मला सल्ला दिला आणि यामुळे माझ्या विवाहावर कसा परिणाम होऊ शकतो हे देखील समजावून सांगितले.”—प्रीसीला.
[१० पानांवरील चित्र]
देवाच्या नव्या जगात, मुलांना पुन्हा कधीही दुर्व्यवहार सहन करावा लागणार नाही