व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘या पुस्तकातली माहिती माझ्या हृदयात जणू झिरपली’

‘या पुस्तकातली माहिती माझ्या हृदयात जणू झिरपली’

‘या पुस्तकातली माहिती माझ्या हृदयात जणू झिरपली’

तुम्ही देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध कसा जोडू शकता? यहोवा जवळ या, (इंग्रजी) या पुस्तकाद्वारे अनेकांना मदत मिळत आहे. उदाहरणार्थ, २५ वर्षांपासून यहोवाची साक्षीदार असलेल्या एका स्त्रीने म्हटले: “हे पुस्तक सर्वोत्कृष्ट आहे.” ती पुढे म्हणते: “या पुस्तकातली माहिती जणू काय माझ्या हृदयाच्या कड्याकपारीत झिरपली आणि पूर्वी मी कधी अनुभवला नव्हता असा एकप्रकारचा आवेश मला यहोवाविषयी वाटू लागला. त्यामुळे मी यहोवाच्या, माझ्या पतीच्या आणि मंडळीच्या जवळ आले आहे.”

यहोवा जवळ या, हे पुस्तक तुम्हाला देखील साहाय्य करू शकते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे: “बायबलमध्ये प्रकट केलेले देवाचे गुण आणि त्याचे मार्ग, अभ्यास करण्याकरता महत्त्वपूर्ण विषय आहेत. यहोवा त्याचा प्रत्येक गुण कशाप्रकारे प्रदर्शित करतो, येशू ख्रिस्ताने हुबेहूब ते गुण कसे प्रदर्शित केले आणि आपणही ते कसे विकसित करू शकतो हे समजल्यावर आपण देवाच्या जवळ येऊ शकतो.”

यहोवा जवळ या, या पुस्तकाविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेले कूपन भरा आणि या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पाठवा. (g०३ ३/२२)

यहोवा जवळ या, या पुस्तकाची संबंधित माहिती कृपया मला पाठवा.

□ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया माझ्याशी संपर्क साधा.