व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

युगानुयुगांपासून सर्वांचा आवडता कांदा

युगानुयुगांपासून सर्वांचा आवडता कांदा

युगानुयुगांपासून सर्वांचा आवडता कांदा

मेक्सिको येथील सावध राहा! लेखकाकडून

ज्या स्वयंपाक घरात कांदा नाही ते स्वयंपाकघर कसले? ही बहुपयोगी भाजी जवळजवळ सगळ्याच गोष्टींसाठी वापरली जाते—कढण, कोशंबीर, जेवणातील मुख्य पदार्थ, औषधे यांत तिचा उपयोग केला जातो. कांदा आपल्याला रडवतो देखील.

कांदा हा, गोल्डन अनियन, ब्राईड्‌स अनियन आणि ऑर्नमेंटल गार्लिक यासारख्या सुंदर पुष्परोपांच्या कुळात आहे; कांद्याची फुले देखील देखणी असतात. परंतु जगातील प्रत्येक स्वयंपाकघरात वापरला जाणारा कांदा, मांसल आवरणाचा जमिनीखाली वाढणारा कंद आहे.

मानवाने लागवड करायला सुरुवात केलेल्या भाज्यांपैकी कांदा एक जुनी भाजी आहे. कांद्याचा वापर किती जुना आहे हे पाहण्यासाठी आपण बायबलमधील त्याचा उल्लेख पाहू शकतो; सा.यु.पू. १५१३ वर्षाच्या सुमारास, इजिप्तच्या दास्यत्वात असताना आपण खाल्लेल्या कांद्याची खूप आठवण येत होती असे इस्राएल लोक म्हणत होते.—गणना ११:५.

पण कांद्याच्या कोणत्या चवीमुळे, त्याला विविध संस्कृतीच्या लोकांमध्ये इतकी ख्याती मिळाली आहे? कांद्यातील सल्फर घटकांमुळे त्याचा विशिष्ट वास आणि तिखटपणा असतो. आणि कांद्यातल्या सल्फायनिक आम्लामुळे तयार होणाऱ्‍या पदार्थामुळे डोळ्यांतून पाणी येते.

केवळ स्वादिष्ट अन्‍नपदार्थच नव्हे!

कांदा आपल्या आरोग्यासाठीसुद्धा एक वरदान आहे. कांद्यात, कॅल्शियम, फॉस्फरस आणि क जीवनसत्त्वासारखे पोषक पदार्थ आहेत. परंतु कांद्यातील औषधी गुणधर्मांमुळे त्याची प्राचीनकाळापासून किंमत केली जाते. वेगवेगळ्या आजारांवर औषध म्हणून कांद्याचा वापर होत असला तरी, सर्दी, स्वरयंत्राचा दाह, रोहिणीभित्तीचा विकार, हृदयविकार, मधुमेह आणि दमा यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. कांद्याला अनेक विशेषणे दिली आहेत; जसे की तो, पूरोधक आहे, कोलोस्ट्रोलरोधक आहे, दाहरोधक आहे, कांद्यामुळे रक्‍तवाहिन्यात रक्‍ताच्या गाठी होत नाहीत, शिवाय, त्यात कर्करोगाचा विरोध करणारे घटक आहेत.

कांद्याच्या विविध जाती आहेत; पांढरा, पिवळा, तपकिरी, हिरवा, तांबडा आणि जांभळा. तुम्ही तो कच्चा, शिजवून, डबाबंद, लोणच्याच्या रुपात, वाळवलेला, पूड केलेला, चकत्या किंवा चौकोनांच्या रुपात खाऊ शकता. तेव्हा, कांदा ही भाजी, दोन अश्रू गाळायला लावणारी असली तरी चमत्कारिक नाही का? (g०४ ११/८)