यंदा कोणता चित्रपट गर्दी खेचणार?
यंदा कोणता चित्रपट गर्दी खेचणार?
उन्हाळा आला की तुम्ही कशाचा विचार करू लागता? बरेच जण सहलींना, थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करू लागतात.
पण चित्रपट उद्योगात असणारे मात्र, कोट्यवधी लोकांनी बाहेर न जाता उन्हाळ्यातला फावला वेळ चित्रपटगृहांत घालवावा असा विचार करत असतात. एकट्या संयुक्त संस्थानांतच जवळजवळ ३५,००० चित्रपट गृहे असून, अलीकडील वर्षांत या देशातल्या बॉक्स ऑफिसवर होणारा ४० टक्के नफा उन्हाळ्याच्या महिन्यांतच झाला आहे. * मूव्हीलाईन मासिकाच्या हायडी पार्कर म्हणतात, “फुटकळ विक्रेत्यांना ख्रिस्मसमध्ये जसा नफा होतो तसा [चित्रपटवाल्यांना उन्हाळ्यात होतो].”
पण परिस्थिती नेहमीच अशी नव्हती. संयुक्त संस्थानांतील चित्रपटगृहांत उन्हाळ्यात फारसे प्रेक्षक येत नसत. त्यामुळे कधीकधी दिवसात कमी खेळ करण्याची किंवा कधीकधी तर या काळात चित्रपटगृह बंद करण्याची त्यांच्यावर वेळ यायची. पण १९७० च्या दशकात वातानूकुलित चित्रपटगृहे आल्यापासून कोट्यवधी लोक उन्हाळ्याचा उकाडा चुकवण्यासाठी या चित्रपटगृहांची वाट धरू लागले. मुलांनाही सुट्या असल्यामुळे हा खास प्रेक्षकवर्ग अर्थातच चित्रपट उद्योजकांच्या नजरेतून निसटला नाही. लवकरच उन्हाळ्यातल्या ब्लॉकबस्टर चित्रपटाची संकल्पना रुजली. * यामुळे चित्रपट निर्माण करण्याच्या व त्यांचे वितरण करण्याच्या पद्धतीत कशाप्रकारे आमूलाग्र बदल झाला याविषयी पाहू. (g०५ ५/८)
[तळटीपा]
^ संयुक्त संस्थानात, उन्हाळ्यातला चित्रपटाचा मोसम मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत चालतो.
^ सहसा “ब्लॉकबस्टर” ही संज्ञा ४५० कोटी रुपयांइतका किंवा त्यापेक्षा जास्त नफा मिळवणाऱ्या चित्रपटांविषयी वापरली जाते. पण कधीकधी हे लेबल कोणत्याही हिट झालेल्या चित्रपटाला लावण्यात येते, मग त्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कितीही नफा मिळालेला असो.