जगाच्या बाबतीत सुज्ञतापूर्वक वाटचाल करणे
जगाच्या बाबतीत सुज्ञतापूर्वक वाटचाल करणे
“बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा.”—कलस्सैकर ४:५.
१. सुरवातीच्या ख्रिश्चनांना कशाचा सामना करावा लागला, आणि कलस्सैच्या मंडळीला पौलाने कोणता सल्ला दिला?
रोमी जगातील शहरात राहत असलेल्या सुरवातीच्या ख्रिश्चनांना मूर्तीपूजा, अनैतिक सुखविलास आणि मूर्तीपूजक विधी व रितीरिवाजांचा कायम सामना करावा लागत असे. आशिया मायनर मधील मध्य-पश्चिमेकडील कलस्सै शहरात राहत असणाऱ्यांना, माता-देवतेची उपासना आणि फ्रेजियन्सच्या रहिवाशांचा जादूटोणा, ग्रीकमधील उपरी लोकांचे मूर्तीपूजक तत्त्वज्ञान आणि यहुदी क्षेत्रातील यहुदीवाद यांचा त्यांना सामना करावा लागला. प्रेषित पौलाने ख्रिस्ती मंडळीला सल्ला दिला की अशा “बाहेरच्या लोकांबरोबर” “सुज्ञतेने वागा.”—कलस्सैकर ४:५.
२. यहोवाच्या साक्षीदारांनी आज बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने का वागले पाहिजे?
२ आज, यहोवाच्या साक्षीदारांना अशाचप्रकारच्या व अधिक चुकीच्या प्रघातांचा सामना करावा लागतो. त्यांना देखील खऱ्या ख्रिस्ती मंडळीबाहेरच्या लोकांबरोबर वागण्यात सुज्ञता राखण्याची जरुरी आहे. अनेक लोक, यहोवाच्या साक्षीदारांना धार्मिक आणि राजकारणातील व्यवस्था व तसेच त्यांचा माध्यमाद्वारे विरोध करतात. काही विरोधक, उघड आक्रमण, अनेकदा अस्पष्ट उल्लेख करुन, यहोवाच्या साक्षीदारांच्या वर्तणुकीवर कलंक लावण्याद्वारे आणि त्यांच्या विरुद्ध पूर्वग्रह उठवितात. जसे सुरवातीच्या ख्रिश्चनांकडे ते फाजील उत्साही आहेत अशा दृष्टिने पाहिले जात होते हे न्याय्य नव्हते आणि आज यहोवाचे साक्षीदार हा धोकादायक “पंथ” आहे अशाप्रकारे पूर्वग्रहावरून त्यांची चेष्टा केली जाते व त्यांच्याबद्दल गैरसमज आहे.—प्रे. कृत्ये २४:१४; १ पेत्र ४:४.
कलुषितपणावर मात करणे
३, ४. (अ) खऱ्या ख्रिश्चनांवर जग कधीही प्रीती का करणार नाही, परंतु आम्ही काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे? (ब) नाझी छळछावण्यात बंदिस्त असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांबद्दल एका लेखिकेने काय लिहिले?
३ खरे ख्रिश्चन जगाने त्यांच्यावर प्रीती करावी याची अपेक्षा करीत नाहीत. प्रेषित योहानाच्या मते, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) तरीसुद्धा, ख्रिश्चनांनी यहोवा आणि त्याची शुद्ध भक्ती करण्यास एखाद्यावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यास पवित्र शास्त्र उत्तेजन देते. हे आम्ही थेट साक्ष देण्याकरवी आणि आमच्या चांगल्या वर्तनाद्वारे देखील करु शकतो. प्रेषित पेत्राने लिहिले: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरूद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.”—१ पेत्र २:१२.
४ लेखिका सिल्विया सॅल्वीसेन त्यांच्या फॉरगिव्ह—बट डू नॉट फरगेट पुस्तकात, नाझी छळ छावण्यातील तिच्या सहकर्मी साक्षीदार असलेल्या स्त्रियांविषयी लिहितात: “कॅटी आणि मार्गारेट तसेच इतर अनेक यहोवाच्या साक्षीदारांनी मला खूप मदत केली, केवळ त्यांच्या विश्वासाबद्दलच नाही तर व्यावहारिक बाबतीतही देखील मदत केली. ते आमच्या जखमांवर बांधण्यासाठी आम्हास प्रथम स्वच्छ कपड्यांचे तुकडे आणून देत . . . थोडक्यात, आमच्यासाठी शुभचिंतक इच्छिणाऱ्या लोकांमध्ये व त्यांच्या कार्याद्वारे मैत्रीची भावना त्यांनी व्यक्त केली अशा लोकांमध्ये आम्ही स्वतःला पाहिले.” “बाहेरच्या लोकांकडून” ही किती चांगली साक्ष!
५, ६. (अ) सध्याच्या काळात ख्रिस्त कोणते कार्य पूर्ण करीत आहे आणि आम्ही काय विसरू नये? (ब) जगाच्या लोकांसंबंधी आमची मनोवृती कशी असली पाहिजे, आणि का?
५ बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागण्याद्वारे आम्ही कलुषितपणा काढुन टाकण्यासाठी अधिक काही करु शकतो. हे खरे आहे की आम्ही अशा काळात जगत आहोत की आमचा राज्य करीत असलेला राजा, ख्रिस्त येशू राष्ट्रातील लोकांना “मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करीत आहे. (मत्तय २५:३२) परंतु ख्रिस्त हा न्यायाधीश आहे हे विसरता कामा नये; “मेंढरे कोण आहे व “शेरडे” कोण आहे याचा निर्णय तो घेईल.—योहान ५:२२.
६ यामुळे जे यहोवाच्या संस्थेचा भाग नाहीत त्यांच्याबद्दल आमच्या मनोवृत्तीवर प्रभाव टाकला पाहिजे. आम्ही त्यांचा विचार जगीक लोक आहेत; असा करु, परंतु ते मानवजातीच्या जगातील भाग आहेत त्यांच्यावर “देवाने प्रीती केली . . . एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) लोकांना शेरडे आहेत असा स्वतः फाजील निर्णय घेण्यापेक्षा ते भावी मेंढरे आहेत असा विचार करणे अधिक चांगले आहे. पूर्वी हिंसाचारी मार्गाने सत्याचा विरोध करणारे आता समर्पित साक्षीदार आहेत. थेट साक्षीकार्याला प्रतिसाद देण्याच्या आधीच यातील अनेकांना दयाळूपणाच्या कृत्याने प्रथम जिंकता आले. उदाहरणार्थ, १५ पृष्ठावरील चित्र पाहा.
आवेशी, अतिक्रमण करणारे नाही
७. पोपने कोणती टीका केली परंतु आम्ही कोणता प्रश्न विचारु शकतो?
७ पोप जॉन पॉल २ यांनी सामान्यपणे पंथांची टीका केली, खासपणे यहोवाच्या साक्षीदारांविषयी त्यांनी म्हटले: “हा खरोखर हल्लेखोरपणाचा आवेश आहे ज्यामुळे काही नवीन अनुयायांचा शोध घरोघरी जाण्याद्वारे करतात किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्त्याच्या बाजूला थांबवणे हा प्रेषितीय व मिशनरी कळकळीचा बनावटपणा आहे.” असे विचारले जाऊ शकते, जर आमची “प्रेषितीय बनावट आणि मिशनरी कळकळ आहे,” तर मग खरा सुवार्तिक आवेश कोठे सापडू शकतो? निश्चितच कॅथोलिकात नाही, किंवा प्रॉटेस्टंट व सनातन मतवाद्यांच्या चर्चेसमध्येही सापडत नाही.
८. कोणत्या परिणामांची आशा बाळगून आम्ही आमचे घरोघरचे साक्षीकार्य कसे केले पाहिजे?
८ तरीसुद्धा, आमच्या साक्षीकार्यावर असलेल्या अतिक्रमणाच्या खोट्या दोषारोपाचे खंडन करण्यासाठी, लोकांना बोलताना आम्ही कायम दयाळू, आदरनीय आणि सभ्य असले पाहिजे. शिष्य याकोबाने लिहिले: “तुम्हांमध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी.” (याकोब ३:१३) प्रेषित पौल आम्हाला आर्जवतो “भांडखोर नसावे.” (तीत ३:२, न्यू.व.) उदाहरणार्थ, आम्ही ज्या व्यक्तीला साक्ष देत आहोत त्याच्या विश्वासाचे उघडपणे खंडन करण्याऐवजी, त्याच्या किंवा तिच्या मतांविषयी प्रामाणिकपणे आस्था का दाखवू नये? नंतर पवित्र शास्त्रात असलेल्या सुवार्तेविषयी त्या व्यक्तिला सांगा. सकारात्मक पवित्रा घेतल्यामुळे आणि दुसऱ्या विश्वासाच्या लोकांना आदर दाखविल्यामुळे आम्ही त्यांना ऐकण्यासाठी चांगली मनोवृत्ती ठेवण्यास मदत करु व कदाचित यामुळे ते पवित्र शास्त्र संदेशाचे महत्त्व ओळखतील. याचा परिणाम असा होऊ शकेल की काही लोक “देवाची महिमा” करतील.—१ पेत्र २:१२.
९. (अ) कलस्सैकर ४:५ मध्ये (ब) कलस्सैकर ४:६ मध्ये पौलाने दिलेला सल्ला आम्ही कसा लागू करावा?
९ प्रेषित पौलाने सल्ला दिला: “बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या.” (कलस्सैकर ४:५) या सल्ल्याच्या उत्तरार्धाच्या भागाबद्दल जे. बी. लाईटफूट यांनी लिहिले: “देवाविषयी अधिक सांगण्यासाठी व करण्यासाठी सुसंधी गमावू नका.” (तिरपे अक्षर आमचे.) होय, सुवेळी आम्ही आमच्या शब्दासह व कार्यासह तयार असले पाहिजे. अशा सुज्ञानात भेट देण्यासाठी दिवसातील सुवेळ निवडण्याचा देखील समावेश होतो. लोक आमच्या संदेशाची गुणग्राहकता बाळगत नाहीत त्यामुळे की, आम्ही अयोग्य वेळी त्यांना भेट दिली आहे यामुळे ते नाकारतात? पौलाने हेही लिहिले: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.” (कलस्सैकर ४:६) यासाठी शेजाऱ्यांविषयी आधीच विचार करण्याची आणि खऱ्या प्रेमाची जरूरी आहे. राज्य संदेशास आपण सर्वदा कृपायुक्ततेने सादर करु या.
आदरयुक्त आणि “प्रत्येक चांगल्या कामासाठी सिद्ध असावे”
१०. (अ)प्रेषित पौलाने क्रेतमध्ये राहात असलेल्या ख्रिश्चनांना कोणता सल्ला दिला? (ब) पौलाचा सल्ला अनुकरणात आणण्यात यहोवाचे साक्षीदार उदाहरणीय कसे आहेत?
१० पवित्र शास्त्रीय तत्त्वाविषयी आम्ही हातमिळवणी करु शकत नाही. दुसऱ्या बाजूला पाहता, ख्रिस्ती तटस्थता समाविष्ट नसलेल्या प्रश्नांविषयी आम्ही निष्फळ वादविवाद करु नये. प्रेषित पौलाने लिहिले: “त्यांनी [क्रेतमधील ख्रिश्चन] सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे; कोणाची निंदा करु नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे.” (तीत ३:१, २) पवित्र शास्त्राचे विद्वान ई. एफ. स्कॉट यांनी या उताऱ्याविषयी लिहिले: “ख्रिश्चनांना अधिकाऱ्यांच्याच केवळ अधीन राहावे लागत नव्हते तर, प्रत्येक चांगल्या कामासाठी त्यांनी तत्पर राहायचे होते. याचा अर्थ . . . लोकसेवेला वाहून घेतलेल्यांमधील दाखविणारे असे ख्रिश्चनांनी असले पाहिजे. अग्नी, पीडा, विविध प्रकारची आपत्ती सतत उद्भवत असते तेव्हा सर्व चांगल्या नागरिकांनी त्यांच्या शेजाऱ्यांना मदत करण्याचे इच्छिले पाहिजे.” संपूर्ण जगभरात अचानक उद्भवणाऱ्या संकटाचे अनेक प्रसंग आहेत व मुक्ततेचे कार्य करण्यासाठी असलेल्या लोकांमध्ये यहोवाचे साक्षीदार प्रथम आहेत. त्यांनी केवळ त्यांच्या बांधवांनाच नव्हे तर बाहेरच्या लोकांनाही मदत केली आहे.
११, १२. (अ) अधिकाऱ्यांच्यासंबंधी ख्रिश्चनांनी कसे वर्तन ठेवले पाहिजे? (ब) राज्य सभागृह बांधावयाचे असताना अधिकाऱ्यांना अधीनता दाखवण्यात कशाचा समावेश होतो?
११ पौलाने तीताला लिहिलेल्या पत्रातील हाच उतारा अधिकाऱ्यांच्याविषयी आदरनीय वृत्ती ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. तरुण ख्रिश्चन त्यांच्या तटस्थपणाच्या भूमिकेमुळे न्यायाधीशाच्या समोर येतात तेव्हा बाहेरच्या लोकांसोबत सुज्ञतेने वागले पाहिजे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्या बाह्यस्वरुप, आचरणामुळे व ज्याप्रकारे ते अशा अधिकाऱ्यांबरोबर बोलतात, त्याद्वारे ते यहोवाच्या लोकांच्या ख्यातीला लाभ किंवा हानी देखील करु शकतात. त्यांनी “ज्याचा सन्मान करावयाचा त्याचा सन्मान करा, . . . ज्याला जे द्यावयाचे त्याला ते” दिले पाहिजे. याद्वारे त्यांचे समर्थन ते भीडस्तपणाने करु शकतील.—रोमकर १३:१-७; १ पेत्र २:१७; ३:१५.
१२ “अधिकाऱ्यां”मध्ये स्थानिक सरकारातील अधिकाऱ्यांचाही समावेश होतो. आता अधिकाधिक राज्य सभागृह बांधले जात आहेत, यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर व्यवहार ठेवणे अपरिहार्य आहे. अनेकदा, वडिलांना कलुषितपणाचा सामना करावा लागतो. परंतु असे दिसून आले आहे की मंडळीच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांसोबत चांगला नातेसंबंध ठेवल्यामुळे आणि नगर विकास योजनेला सहकार्य दिल्यामुळे, हा कलुषितपणा दूर केला जाऊ शकतो. ज्या लोकांना यहोवाच्या साक्षीदारांविषयी व त्यांच्या संदेशाविषयी आधी फार कमी किंवा काहीच माहीती नव्हती त्यांना उत्तम साक्ष दिली गेली.
‘शक्य तर सर्व माणसांबरोबर शांतीने राहा’
१३, १४. रोममधील ख्रिश्चनांना पौलाने कोणता सल्ला दिला, आणि बाहेरच्या लोकांबरोबर असलेल्या आमच्या संबंधाच्या बाबतीत आम्ही तो कसा लागू करावा?
१३ मूर्तीपूजक रोममध्ये राहात असलेल्या ख्रिश्चनांना पौलाने खालील सल्ला दिला: “वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करु नका. सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हांकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभू [यहोवा, न्यू.व.] म्हणतो. उलटपक्षी, ‘तुझा शत्रु भुकेला असल्यास त्याला खावयास दे; तान्हेला असल्यास त्याला प्यावयास दे; कारण असे केल्याने तू आपल्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील.’ वाइटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाइटाला जिंक.”—रोमकर १२:१७-२१.
१४ बाहेरच्या लोकांबरोबर असलेल्या आमच्या संबंधात, आम्हा खऱ्या ख्रिश्चनांना विरोधकांचा अपरिहार्यपणे सामना करावा लागतो. वरील उताऱ्यात पौल दाखवतो की दयाळू वर्तनाने विरोधाला मात करण्याचा सुज्ञतापूर्वक प्रयत्न केला पाहिजे. अग्नितील कोळशाप्रमाणे, दयाळूपणा शत्रूत्त्व वितळवू शकतो आणि विरोधकाला यहोवाच्या लोकांबद्दल दयाळू वृत्ती दाखवण्यासाठी, कदाचित सुवार्तेसाठी आस्था निर्माण करण्यासाठी जिंकता येऊ शकते. असे झाल्यास, वाईटाला बऱ्याने जिंकता येते.
१५. ख्रिश्चनांनी विशेषपणे कोणत्या प्रसंगी बाहेरच्या लोकांबरोबर काळजीपूर्वक सुज्ञतेने वागले पाहिजे?
१५ बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतापूर्वक वागण्यात, वैवाहिक सोबत्याने अद्याप सत्याचा स्वीकार केला नाही अशा घरात हे विशेषपणे महत्त्वाचे आहे. पवित्र शास्त्राच्या तत्त्वांचे पालन केल्याने चांगले पती, चांगल्या पत्नी, चांगले पिता, चांगल्या माता आणि मुले आज्ञाधारक आणि शाळेत कसोसीने अभ्यास करणारी निर्माण केली जातात. एका विश्वासू जनावर पवित्र शास्त्राचा किती चांगला प्रभाव झालेला आहे हे अविश्वासू जनाने पाहिले पाहिजे. अशाप्रकारे, कुटुंबातील समर्पित सदस्यांच्या, ‘वर्तनाने . . . वचनावाचून’ काहींना मिळवून घेता येते.—१ पेत्र ३:१, २.
‘सर्वांचे बरे करावे’
१६, १७. (अ) कोणत्या यज्ञाने देव संतुष्ट होतो? (ब) आम्ही इतरांच्या, आमच्या बांधवांच्या व तसेच बाहेरील लोकांच्या ‘बऱ्यासाठी कसे कार्य’ करू शकतो?
१६ आमच्या शेजाऱ्यांच्या अधिक बऱ्यासाठी चांगले काम करणे म्हणजे आम्ही त्याच्याप्रत राज्याचा संदेश नेणे व यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताबरोबर त्यांनी समेट करावा म्हणून त्याला शिकवणे होय. (रोमकर ५:८-११) यास्तव प्रेषित पौल आम्हाला सांगतो: “त्याचे नाव पत्करणाऱ्या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ आपण’ त्याच्याद्वारे [ख्रिस्त] देवाला नित्य अर्पण करावा.’” (इब्रीयांस १३:१५) पौल आणखी भर टाकतो: “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” (इब्रीयांस १३:१६) आमच्या जाहीर साक्षीकार्याच्या व्यतिरिक्त, “चांगले करण्यास” आम्ही विसरु नये. हा, ज्यामुळे देव संतुष्ट होतो त्या आमच्या यज्ञांचा आवश्यक असणारा भाग तयार करतो.
१७ स्वाभाविकपणे, आम्ही आमच्या आध्यात्मिक भावांबद्दल ज्यांना कदाचित भावनात्मक, आध्यात्मिक, शारीरिक किंवा भौतिक गरज असेल त्यांच्यासाठी चांगले ते करतो. पौलाने हे लिहिले तेव्हा त्याने हे सुचविले: “मग जसा प्रसंग आपल्याला मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०; याकोब २:१५, १६) तथापि आम्ही हे शब्द विसरता कामा नये, “सर्वांचे . . . बरे करावे.” नातेवाईकांच्या बाबतीत, शेजाऱ्यांच्या बाबतीत किंवा कामातील सहकर्मीयांच्या बाबतीत दयाळुपणाचे कृत्य आम्हाविरुद्ध असलेल्या पूर्वग्रहास तोडून टाकू शकते आणि सत्याकडे त्या व्यक्तीचे हृदय अधिक स्वीकारयोग्य बनवू शकते.
१८. (अ) आम्ही कोणते धोके टाळले पाहिजे? (ब) जाहीर साक्षीकार्यास पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमच्या ख्रिस्ती चांगुलपणाचा कसा वापर केला पाहिजे?
१८ हे करण्यासाठी बाहेरच्या लोकांसोबत अधिक निकट मैत्री राखण्याची आम्हाला जरुरी नाही. असे सहकारी धोकेदायक असण्याची शक्यता असते. (१ करिंथकर १५:३३) आणि जगाबरोबर मैत्री करण्याचा निश्चय करू नये. (याकोब ४:४) परंतु आमचा ख्रिस्ती चांगुलपणा आमच्या प्रचारकार्यास पाठबळ पुरवो. काही देशात लोकांच्या घरी जाऊन बोलणे अधिकच मुश्कीलीचे बनत चालले आहे. काही अपार्टमेंट इमारतीला काही योजनांमुळे सुरक्षित ठेवले जाते त्यामुळे तेथील रहिवाशांबरोबर बोलण्यापासून आम्हाला वंचित ठेवले जाते. काही विकसनशील देशात दूरध्वनी प्रचारकार्यासाठी एक साधन आहे. अनेक देशात रस्त्यावरचे साक्षीकार्य केले जाऊ शकते. तथापि, सर्वच देशात आम्ही आनंददायक, सभ्य, दयाळू व इतरांच्या उपयोगी पडल्याने पूर्वग्रह तोडून टाकण्यास व चांगली साक्ष देण्यासाठी सुसंध्या उघडल्या जातात.
विरोधकांना शांत करणे
१९. (अ) आम्ही लोकांना खूष करीत नसल्यामुळे, कशाची अपेक्षा करावी? (ब) आम्ही दानीएलाच्या उदाहरणाचे आणि पेत्राच्या सल्ल्याचे अनुकरण कसे केले पाहिजे?
१९ यहोवाचे साक्षीदार मनुष्यांना खुष करणारे किंवा मनुष्यांचे भय बाळगणारेही नाहीत. (नीतीसूत्रे २९:२५; इफिसकर ६:६) कर भरणे, चांगले नागरिक असणे, या त्यांच्या उदाहरणशील प्रयत्नांच्या व्यतिरिक्त देखील विरोधक त्यांच्याविषयी द्वेषयुक्त लबाड्या पसरवितात आणि उपेक्षेने बोलतात याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे. (१ पेत्र ३:१६) हे माहीत असल्यामुळे ते दानीएलाचे अनुकरण करतात, त्याला त्याच्या शत्रुंनी म्हटले: “दानीएलाविरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही; मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्याविरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल.” (दानीएल ६:५) लोकांना खूष करण्यासाठी आम्ही पवित्र शास्त्रीय तत्त्वांची हातमिळवणी करणार नाही. दुसरीकडे पाहता, आम्ही हुत्तात्मिक होऊ पाहत नाही. आम्ही शांतीने राहण्याचा प्रयत्न करू आणि प्रेषितीय सल्ला ऐकू: “कारण देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे.”—१ पेत्र २:१५.
२०. (अ) आमची कशाबद्दल खात्री झाली आहे आणि येशू कोणते उत्तेजन आम्हाला देतो? (ब) बाहेरच्या लोकांबरोबर आम्ही सूज्ञतापूर्वक कसे वागत राहू शकतो?
२० जगापासून आमचे वेगळेपण पवित्र शास्त्राच्या सुसंगत आहे याची आम्हाला पूर्ण खात्री झाली आहे. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांचा इतिहास याला बळ पुरवितो. येशूच्या शब्दांनी आम्हाला उत्साह मिळतो: “जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; कारण मी जगाला जिंकले आहे.” (योहान १६:३३) आम्ही भीत नाही. “तुम्ही चांगल्याची आशा बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण? परंतु नीतिमत्त्वामुळे तुम्हांला दुःख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. ‘त्यांच्या भयाने भिऊ नका व घाबरु नका’, तर ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणून आपल्या अंतःकरणात ‘पवित्र माना’; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१३-१५) अशाप्रकारे कार्य केल्याने, बाहेरच्या लोकांबरोबर आम्ही सुज्ञतेने वागत राहू.
पुनरावलोकन
▫ बाहेरच्या लोकांबरोबर यहोवाच्या साक्षीदारांनी सूज्ञतापूर्वक वागण्याची आवश्यकता का आहे?
▫ जगाने त्यांच्यावर प्रीती करावी याची आशा खऱ्या ख्रिश्चनांनी कधीही का करु नये, परंतु त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे?
▫ जगाच्या लोकांसंबंधाने आमची मनोवृत्ती कशी असावी, आणि का?
▫ आम्ही आमच्या बांधवांचेच केवळ नव्हे तर बाहेरील लोकांचे देखील बरे केले का केले पाहिजे?
▫ आमच्या जाहीर साक्षीकार्यात, बाहेरच्या लोकांबरोबर सूज्ञतापूर्वक वागण्यामुळे कशी मदत मिळू शकते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्रं]
फ्रान्समधील खरे ख्रिश्चन प्रलयानंतर त्यांच्या शेजाऱ्यांना मदत करीत आहेत
[१७ पानांवरील चित्रं]
कलुषितपणा काढून टाकण्यासाठी ख्रिस्ती दयाळूपणाचे कृत्य अधिक काही करु शकते
[२० पानांवरील चित्रं]
ख्रिश्चनांनी “प्रत्येक चांगल्या कामासाठी सिद्ध असावे”