तुम्ही आपला भार नेहमी यहोवावर टाका
तुम्ही आपला भार नेहमी यहोवावर टाका
आज अनेक जणांना भारांमुळे चिरडल्यासारखे वाटते. आर्थिक हाल, क्लेशमय कौटुंबिक समस्या, आरोग्य समस्या, दडपशाही आणि जुलूमशाहीमुळे होणारे दुःख व व्यथा आणि पीडा देणाऱ्या इतर अनेक गोष्टी संबंधित लोकांच्या गळ्यांत जातं बांधल्यासारख्या आहेत. या बाहेरील दबावांशिवाय, स्वतःच्या अपरिपूर्णतांमुळे व्यक्तिगत निरुपयोगीपणाच्या भावना आणि अपयशामुळे देखील काही जण भाराक्रांत होतात. अनेकांचा लढ्यास तोंड न देण्याचा कल असतो. भार असह्य वाटतात तेव्हा तुम्ही त्यांना कशा प्रकारे तोंड देऊ शकता?
इस्राएलचा राजा दावीद यास एकदा दबाव जवळजवळ असह्य असल्यासारखा वाटला. स्तोत्र ५५ नुसार, दबाव आणि त्याच्या शत्रूंचे वैर यांमुळे निर्माण होणाऱ्या चिंतेने त्यास विचलित होण्यास भाग पाडले. त्यास अतिशय दुःखी व भयभीत वाटले. तो दुःखामुळे केवळ कण्हू शकत होता. (स्तोत्र ५५:२, ५, १७) तथापि, हे सर्व त्रास असतानाही त्याच्याशी सामना करण्याचा मार्ग त्यास गवसला. कसा? त्याने आपल्या देवाकडे पाठिंब्यासाठी पाहिले. दावीदाप्रमाणे ज्यांना वाटत असेल अशांसाठी त्याचा सल्ला होता: “तू आपला भार परमेश्वरावर [यहोवा, NW] टाक.”—स्तोत्र ५५:२२.
“तू आपला भार परमेश्वरावर [यहोवावर] टाक,” असे म्हणण्यामागे त्याचा कोणता अर्थ होता? प्रार्थनेद्वारे यहोवाकडे जाणे आणि आपली चिंता प्रकट करणे, केवळ असाच याचा अर्थ होतो का? किंवा अशा परिस्थितीतून मुक्त होण्यास मदत व्हावी म्हणून आपण स्वतः काही करू शकतो का? यहोवाकडे जाण्यास आपल्याला अगदी अपात्र वाटत असल्यास काय? दावीदाने ते शब्द लिहिले तेव्हा त्याला जे अनुभव स्पष्टपणे आठवले असतील त्यांतील काही अनुभवांना पाहिल्यास त्याला काय म्हणायचे होते ते आपण जाणून घेऊ शकतो.
यहोवाच्या शक्तीद्वारे कार्ये करा
गल्याथाने इस्राएल योद्ध्यांच्या मनांमध्ये कशा प्रकारे दहशत निर्माण केली होती, हे तुम्हाला आठवते का? या राक्षसी मनुष्याची उंची नऊ फूट असून त्याने त्यांना घाबरवून सोडले होते. (१ शमुवेल १७:४-११, २४) परंतु दावीद घाबरला नाही. का? कारण त्याने स्वतःच्या शक्तीच्या जोरावर गल्याथाला तोंड देण्याचा प्रयत्न केला नाही. इस्राएलाचा भावी राजा या नात्याने त्यास नियुक्त केले तेव्हापासून त्याने केलेल्या प्रत्येक कार्यात त्याला मार्गदर्शन देण्यासाठी आणि सामर्थ्य पुरविण्यासाठी त्याने देवाच्या आत्म्यास कार्य करण्यास अनुमती दिली. (१ शमुवेल १६:१३) म्हणूनच त्याने गल्याथास असे म्हटले: “इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस; त्या सेनाधीश परमेश्वराच्या [यहोवाच्या] नामाने मी तुजकडे आलो आहे. आज परमेश्वर [यहोवा] तुला माझ्या हाती देईल.” (१ शमुवेल १७:४५, ४६) दावीद गोफण फिरविण्यात प्रवीण होता, परंतु गल्याथाकडे भिरकवलेल्या गोट्याचा अचूक नेम लागण्यामागे आणि त्यास अधिक संहारक बनविण्यामागे यहोवाचा पवित्र आत्मा होता, याबद्दल आपण खात्री बाळगू शकतो.—१ शमुवेल १७:४८-५१.
देव त्यास पाठिंबा आणि सामर्थ्य देईल, या आत्मविश्वासाने दावीदाने या प्रचंड आव्हानाला तोंड दिले आणि तो विजयी झाला. त्याने देवाबरोबर चांगला आणि विश्वासहार्य नातेसंबंध विकसित केला होता. यहोवाने त्याची सुरवातीला ज्या मार्गाने सुटका केली होती १ शमुवेल १७:३४-३७) दावीदाप्रमाणे, यहोवासोबत अतूट व्यक्तिगत नातेसंबंध तुम्ही टिकवून ठेवू शकता आणि त्याची क्षमता व तुम्हास प्रत्येक परिस्थितींमध्ये सामर्थ्य आणि शक्ती देण्याच्या त्याच्या स्वेच्छेवर तुम्ही पूर्णपणे आत्मविश्वास ठेवू शकता.—स्तोत्र ३४:७, ८.
त्यामुळे त्याला सामर्थ्य प्राप्त झाले होते, यात काही शंका नाही. (समस्या सोडविण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करा
तथापि, स्तोत्र ५५ स्पष्टपणे दाखविते त्याप्रमाणे यापुढे तीव्र दुःख, चिंता आणि भयाचे प्रसंग नसतील, असा याचा अर्थ होत नाही. उदाहरणार्थ, यहोवावरील निर्भय आत्मविश्वास प्रकट केल्यावर काही वर्षांनंतर, दावीदाला त्याच्या शत्रूंना तोंड देण्यास फार भीती वाटली. शौल राजाचे कृपाछत्र नाहीसे झाले आणि स्वतःचा जीव वाचविण्यासाठी त्यास पलायन करावे लागले. दावीदावर ज्या मानसिक अस्वस्थतेचा परिणाम झाला असेल त्याची आणि यहोवाचे उद्देश पूर्ण होण्याविषयी त्याच्या मनात जे प्रश्न उद्भवले असतील त्या प्रश्नांची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. इस्राएलाचा भावी राजा म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती, तरी देखील ओसाड प्रदेशातील भटक्याप्रमाणे आणि शिकार होणाऱ्या जंगली पशूप्रमाणे स्वतःस वाचविण्याचा प्रयत्न त्याला करावा लागला. गल्याथाचे मूळगाव गथ येथे त्याने आश्रय शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो पकडला गेला. त्याचा परिणाम? अहवाल सांगतो की, “त्याला फार धाक वाटला.”—१ शमुवेल २१:१०-१२.
परंतु मदतीसाठी यहोवाकडे पाहण्यात, त्याने त्याच्या भीतीला आणि दाट चिंतेला अटकाव करू दिला नाही. स्तोत्र ३४ नुसार (या अनुभवाचा परिणाम म्हणून लिहिलेले) दावीदाने म्हटले: “मी परमेश्वराला [यहोवाला] शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने [यहोवाने] तो ऐकला, आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले.”—स्तोत्र ३४:४, ६.
अर्थातच, यहोवाने त्याला पाठिंबा दिला. तथापि, यहोवाने त्याला सोडवावे म्हणून तो केवळ हातावर हात ठेवून बसला नाही या गोष्टीकडे लक्ष द्या. या कठीण अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी अशा परिस्थितींमध्ये सर्वंकष प्रयत्न करण्याची गरज त्याने ओळखली. त्याच्या सुटकेमागे यहोवाचा हात असल्याचे त्याने मान्य केले, परंतु त्याने स्वतः देखील कार्य केले, गथच्या राजाने त्यास ठार मारू नये म्हणून त्याने वेड्याचे सोंग केले. (१ शमुवेल २१:१४–२२:१) यहोवाने आपली सुटका करावी म्हणून थांबून राहण्याऐवजी, आपल्याला देखील भार सहन करण्यासाठी होता होईल तितके करण्याची गरज आहे.—याकोब १:५, ६; २:२६.
तुमच्या भारांमध्ये अधिक भर घालू नका
दावीदाने त्याच्या पुढील जीवनात आणखी एक दुःखदायक धडा शिकला. तो कोणता धडा होता? काहीवेळा आपण स्वतः आपल्या भारांमध्ये आणखी भर घालतो. पलिष्ट्यांवर विजय प्राप्त केल्यानंतर, दावीदाने कराराचा कोश जेरूसलेममध्ये नेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या समोर समस्या उभ्या राहिल्या. ऐतिहासिक अहवाल आपणास सांगतो: “यहूदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्याजवळच्या सगळ्या लोकांस घेऊन गेला; . . . त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून . . . बाहेर काढिला, अबीनादाबाचे पुत्र उज्जा व अह्यो हे दोघे ती नवी गाडी हाकीत होते.”—२ शमुवेल ६:२, ३.
कोशाच्या परिवहनाकरिता गाडीचा उपयोग केल्यामुळे यहोवाने त्याबद्दल दिलेल्या सर्व सूचनांचे उल्लंघन झाले. कोशाच्या बाजूंस खासपणे बनविण्यात आलेल्या कड्यांमध्ये घातलेल्या दांड्यांच्या साह्याने निर्गम २५:१३, १४; गणना ४:१५, १९; ७:७-९) या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे विपत्ती आली. बैलाने गाडी ओढत असताना ठोकर खाल्ल्यामुळे कदाचित लेवीय असणाऱ्या परंतु निश्चितपणे याजक नसणाऱ्या उज्जाने हात लांब करून कोश धरला आणि यहोवाचा अनादर केला त्यामुळे यहोवाने त्यास ठार मारले.—२ शमुवेल ६:६, ७.
प्राधिकृत कहाथी लेवी वाहकांनी त्यांच्या खांद्यांवर कोशास वाहून नेले पाहिजे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. या अति पवित्र वस्तूला स्पर्श करण्याची मुभा केवळ याजकांना होती, ही महत्त्वाची गोष्ट देखील सांगण्यात आली होती. (यासाठी दावीदाला राजा या नात्याने काही प्रमाणात जबाबदारी उचलावी लागली. त्याची प्रतिक्रिया हे दाखवून देते, की यहोवासोबत चांगला नातेसंबंध असणारे देखील काही वेळा परीक्षेच्या काळात वाईटपणे प्रतिक्रिया दाखवू शकतात. प्रथम दावीदाला क्रोध आला. नंतर मात्र त्याला धाक वाटला. (२ शमुवेल ६:८, ९) यहोवासोबतच्या त्याच्या विश्वासहार्य नातेसंबंधाची कठीण परीक्षा घेण्यात आली. हा असा प्रसंग होता, जेव्हा त्याने यहोवाच्या आज्ञांचे पालन केले नाही. त्यावेळी तो यहोवावर त्याचा भार टाकण्यास अपयशी ठरला असे दिसते. तशाच प्रकारची परिस्थिती काही वेळा आपल्या बाबतीत असू शकते का? यहोवाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल आपण त्याला कधी दोषी ठरवितो का?—नीतिसूत्रे १९:३.
अपराधीपणाच्या भारास तोंड देणे
त्यानंतर, यहोवाच्या नैतिक दर्जांच्या विरोधात गंभीर पाप करण्याद्वारे दावीदाने स्वतः आपल्यासाठी अपराधीपणाचा मोठा भार निर्माण केला. या प्रसंगी दावीदाने, युद्धामध्ये त्याच्या लोकांचे नेतृत्व करण्याच्या त्याच्या जबाबदारीचा त्याग केला. ते लढण्यासाठी गेले असता, तो जेरूसलेममध्ये राहिला. यामुळे फार मोठी समस्या उभी ठाकली.—२ शमुवेल ११:१.
दावीद राजाने सुंदर बथशेबेला स्नान करताना पाहिले. त्याने तिच्यासोबत अनैतिक संबंध स्थापले आणि ती गर्भवती राहिली. (२ शमुवेल ११:२-५) आपल्या या गैरवर्तनावर पडदा टाकण्यासाठी त्याने तिचा पती उरीया याची जेरूसलेमच्या युद्धभूमीवरून माघारी येण्यासाठी योजना केली. इस्राएल युद्धात गुंतलेले असताना उरीयाने त्याच्या पत्नीसोबत वैवाहिक संबंध ठेवण्यास नकार दिला. (२ शमुवेल ११:६-११) दावीदाने आता त्याचे पाप झाकण्यासाठी दुष्ट आणि धूर्त योजना आखली. उरीयाचा युद्धामध्ये मृत्यू होईल, अशा ठिकाणी त्याला ठेवण्यासाठी त्याने उरीयाच्या सोबत असणाऱ्या सैनिकांना सांगितले. केवढे दुष्ट आणि गंभीर पातक!—२ शमुवेल ११:१२-१७.
अर्थातच, कालांतराने दावीदाच्या पातकाचा झाडा घेण्यात आला आणि त्याचा गौप्यस्फोट झाला. (२ शमुवेल १२:७-१२) दावीदाला त्याने जे काही केले त्या गोष्टीतील अघोरीपणा कळला तेव्हा दुःख आणि अपराधीपणामुळे तो किती भाराक्रांत झाला असेल, याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. विशेषतः दावीद कदाचित भावनात्मक आणि संवेदनशील मनुष्य होता यामुळे तो त्याच्या स्वतःच्या अपयशाच्या जाणीवेमुळे जेरीस आला असावा. पूर्णपणे निरुपयोगी असल्यासारखे त्याला वाटले असेल!
तथापि, दावीद त्याचे पातक संदेष्टा नाथानास असे म्हणून लगेचच मान्य करतो: “मी परमेश्वराविरुद्ध [यहोवाविरुद्ध] पातक केले आहे.” (२ शमुवेल १२:१३) त्याला कसे वाटले व त्याने स्वतःस शुद्ध करण्यासाठी आणि क्षमा व्हावी म्हणून कशा प्रकारे यहोवाकडे विनंती केली, हे स्तोत्र ५१ आपल्याला सांगते. त्याने प्रार्थना केली: “मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.” (स्तोत्र ५१:२, ३) त्याने खरोखरच पश्चात्ताप केल्यामुळे तो यहोवासोबत दृढ आणि निकटचा नातेसंबंध पुनःस्थापित करू शकला. दावीद खेद आणि निरुपयोगीपणाच्या भावनांत अडकून राहिला नाही. त्याने स्वतःची चूक नम्रपणे कबूल करण्याद्वारे, खरा पश्चात्ताप दाखविण्याद्वारे आणि यहोवाच्या क्षमेसाठी मनःपूर्वक प्रार्थना करण्याद्वारे आपला भार यहोवावर टाकला. त्याला देवाची कृपापसंती पुन्हा प्राप्त झाली.—स्तोत्र ५१:७-१२, १५-१९.
विश्वासघातास तोंड देणे
दावीद ज्या घटनेमुळे स्तोत्र ५५ लिहिण्यास प्रवृत्त झाला तेथे आपण येतो. तो अतिशय मानसिक तणावाखाली होता. “माझ्या ठायी माझ्या हृदयाला यातना होत आहेत; मरणाचे भय माझ्यावर कोसळले आहे.” (स्तोत्र ५५:४) या यातनेचे कारण काय होते? दावीदाचा पुत्र अबशालोम याने दावीदाचे राज्यत्व हिरावून घेण्याची योजना केली होती. (२ शमुवेल १५:१-६) त्याच्या स्वतःच्या पुत्राकडून हा विश्वासघात त्याच्यासाठी असह्य होता; परंतु दावीदाचा अहीथोफेल नामक सर्वात विश्वस्त सल्लागार, दावीदाविरोधी कटात सामील झाल्यामुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाली. या अहीथोफेलाचे वर्णन दावीद स्तोत्र ५५:१२-१४ येथे करतो. हा कट आणि विश्वासघात यामुळे दावीदाला जेरूसलेममधून पलायन करावे लागले. (२ शमुवेल १५:१३, १४) यामुळे तो किती चिंताग्रस्त झाला असेल!
तरी देखील त्याने तीव्र भावना आणि दुःखास यहोवावरील त्याचा भरवसा आणि आत्मविश्वासाला डळमळू दिले नाही. बंडखोरांच्या योजना फोल ठराव्यात म्हणून त्याने यहोवाला प्रार्थना केली. (२ शमुवेल १५:३०, ३१) आपण पुन्हा एकदा पाहतो, की यहोवाने त्याच्यासाठी सर्वकाही करावे म्हणून दावीद केवळ हातावर हात ठेवून बसला नाही. त्याला संधी मिळताच त्याने त्याच्या विरोधात असणाऱ्या कटास लढा देण्याकरिता प्रयत्नांची शर्थ केली. त्याने आपला आणखी एक सल्लागार, हूशय यास जेरूसलेममध्ये परत पाठविले आणि त्याच्या विरोधात चालू असणाऱ्या कटात सामील होण्याचे नाटक करण्यास सांगितले; तथापि तो या कटास फोल ठरविण्यासाठी गेला होता. (२ शमुवेल १५:३२-३४) यहोवाच्या पाठिंब्यामुळे ही योजना यशस्वी झाली. दावीदाला स्वतःच्या संरक्षणार्थ सैन्यांचा नवा गट तयार करता यावा आणि त्यांना संघटित करता यावे म्हणून हूशयाला पुरेसा वेळ मिळाला.—२ शमुवेल १७:१४.
यहोवाची संरक्षणात्मक काळजी तसेच त्याचा धीर आणि क्षमा करण्याची त्याची स्वेच्छा यांची दावीदाने त्याच्या संपूर्ण जीवनात किती कदर केली असेल! (स्तोत्र ३४:१८, १९; ५१:१७) दावीद त्याच्या या पार्श्वभूमीसह आपल्या निराशेच्या काळांत मदतीसाठी यहोवाकडे जाण्याचे अर्थात, ‘आपला भार यहोवावर टाकण्याचे’ आत्मविश्वासाने उत्तेजन देतो.—पडताळा १ पेत्र ५:६, ७.
यहोवासोबत बळकट, विश्वासहार्य नातेसंबंधाची उभारणी करा व तो कायम ठेवा
कठीण परीक्षेच्या आणि संकटाच्या काळांत दावीदाला ज्या नातेसंबंधाने सामर्थ्य पुरविले, त्या प्रकारचा यहोवासोबतचा नातेसंबंध आपण कशा प्रकारे स्थापित करू शकतो? देवाचे वचन, बायबल याचे परिश्रमी विद्यार्थी होण्याद्वारे आपण अशा नातेसंबंधाची उभारणी करतो. त्याचे नियम, त्याची तत्त्वे आणि त्याचे व्यक्तित्त्व यांविषयी आपण त्याकडून शिकून घेतो. (स्तोत्र १९:७-११) आपण देवाच्या वचनावर जसजसे मनन करतो तसतसे आपण त्याच्या अधिक जवळ जातो आणि त्यावर पूर्णपणे भरवसा ठेवण्यास शिकतो. (स्तोत्र १४३:१-५) यहोवाद्वारे आणखी शिकण्यासाठी आपण सह-उपासकांसोबत संगती ठेवतो तसतसे आपण तो नातेसंबंध आणखी सखोल आणि मजबूत करतो. (स्तोत्र १२२:१-४) मनःपूर्वक प्रार्थनेद्वारे आपण यहोवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत करतो.—स्तोत्र ५५:१.
होय, दावीदाचा यहोवासोबतचा नातेसंबंध हवा तितका मजबूत नव्हता, तेव्हा त्याच्याही आपल्याप्रमाणे काही खिन्नता होत्या. (उपदेशक ७:७) परंतु काय होत आहे, हे यहोवा पाहतो आणि आपल्या हृदयात काय आहे हे त्याला ठाऊक आहे. (उपदेशक ४:१; ५:८) यहोवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत राहावा म्हणून आपल्याला कठीण परिश्रम करण्याची गरज आहे. त्यानंतर मग, कोणत्याही प्रकारचे भार आपणास वाहून न्यावे लागले तरी, दबाव कमी व्हावा किंवा आपल्या परिस्थितीला तोंड देण्यास सामर्थ्य मिळावे म्हणून आपण यहोवावर विसंबून राहू शकतो. (फिलिप्पैकर ४:६, ७, १३) यहोवाच्या निकट राहण्याची ही बाब आहे. दावीदाने असे केले, तेव्हा तो पूर्णपणे सुरक्षित होता.
त्यामुळे तुमच्या परिस्थिती कोणत्याही असल्या तरी तुम्ही आपला भार नेहमी यहोवावर टाका, असे दावीद म्हणतो. त्यानंतर मग आपल्याला या अभिवचनाच्या खरेपणाचा अनुभव येईल: “तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.”—स्तोत्र ५५:२२.