ख्रिस्ताच्या मनोवृत्तीचे अनुकरण करा
ख्रिस्ताच्या मनोवृत्तीचे अनुकरण करा
“धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे [ख्रिस्त येशूच्या मनोवृत्तीप्रमाणे] तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.”—रोमकर १५:५, ६.
१. एखाद्या व्यक्तीच्या मनोवृत्तीचा तिच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो?
जीवनात बरेच काही व्यक्तीच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीची निष्काळजी वृत्ती आहे की मेहनत करण्याची, आशावादी वृत्ती आहे की निराशावादी, भांडखोर वृत्ती आहे की मदत करण्याची, तक्रार करण्याची वृत्ती आहे की कृतज्ञपणाची हे त्या व्यक्तीच्या वागणुकीवरून स्पष्ट होते आणि त्यानुसारच तिला इतरांकडूनही वागणूक मिळते. चांगली मनोवृत्ती बाळगल्यास, अतिशय कठीण परिस्थितीतही व्यक्ती आनंदी राहू शकते. पण मनोवृत्तीच चुकीची असेल तर जीवनात सर्वकाही चांगले चालले असतानाही त्या व्यक्तीला काहीच चांगले दिसणार नाही.
२. कोणतीही व्यक्ती विशिष्ट प्रकारची मनोवृत्ती कशाप्रकारे आत्मसात करते?
२ कोणतीही व्यक्ती चांगली किंवा वाईट मनोवृत्ती बाळगायला शिकू शकते. आपण सर्वजण शिकतो. कॉलियर्स एन्सायक्लोपिडिया यात नुकत्याच जन्मलेल्या बालकाविषयी असे सांगितले आहे: “भाषा किंवा इतर कोणतेही कौशल्य ज्याप्रमाणे शिकावे लागते, आत्मसात करावे लागते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीची स्थायी प्रवृत्ती देखील तिने आत्मसात केलेली असते.” पण विशिष्ट मनोवृत्ती कशाप्रकारे आत्मसात केली जाते? यावर बऱ्याच गोष्टींचा प्रभाव पडतो, पण त्यातल्यात्यात वातावरण आणि सोबत या दोन घटकांचा व्यक्तीच्या मनोवृत्तीवर लक्षणीय प्रभाव पडतो. याआधी उल्लेख केलेल्या एनसायक्लोपिडियात असे म्हटले आहे: “ज्यांच्या सहवासात आपण सतत राहतो, त्यांची वृत्ती हळूहळू आपल्यात येते, जणू आपण ती आपल्या व्यक्तिमत्वात शोषून घेतो.” हजारो वर्षांपूर्वी बायबलमध्ये हे स्पष्ट करण्यात आले होते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०; १ करिंथकर १५:३३.
चांगल्या मनोवृत्तीचा आदर्श
३. मनोवृत्तीच्या बाबतीत कोणाचा उत्तम आदर्श आपल्यासमोर आहे आणि कशाप्रकारे आपण येशूचे अनुकरण करू शकतो?
३ इतर सर्व गोष्टींप्रमाणेच मनोवृत्तीच्या बाबतीतही येशू ख्रिस्तच सर्वोत्तम आदर्श आहे. येशूने म्हटले होते: “जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीहि करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.” (योहान १३:१५) येशूप्रमाणे होण्याकरता आधी त्याच्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. * प्रेषित पेत्राने असा सल्ला दिला होता: “ह्याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) तर आपल्याकडून शक्य आहे तितके येशूचे अनुकरण करणे हाच येशूविषयीचे ज्ञान घेण्याचा आपला उद्देश असला पाहिजे. आणि येशूचे अनुकरण करणे म्हणजेच त्याच्या मनोवृत्तीचे अनुकरण करणे.
४, ५. रोमकर १५:१-३ या वचनांत येशूच्या मनोवृत्तीच्या कोणत्या पैलूवर प्रकाश टाकण्यात आला आहे, आणि ख्रिस्ताचे अनुयायी त्याच्या या गुणाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतात?
४ ख्रिस्त येशूच्या मनोवृत्तीचे अनुकरण आपण कसे करू शकतो? रोमकरांना लिहिलेल्या पौलाच्या पत्रातील १५ व्या अध्यायात या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळू शकते. या अध्यायाच्या पहिल्या दोन तीन वचनात पौल येशूच्या एका खास गुणाविषयी आपल्याला सांगतो: “आपण जे सशक्त आहो त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार रोमकर १५:१-३.
वाहिला पाहिजे. आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. कारण ख्रिस्तानेहि स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही; तर ‘तुझी निंदा करणाऱ्याने केलेली निंदा माझ्यावर आली’, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले.”—५ येशूप्रमाणेच ख्रिश्चनांना देखील केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करण्याऐवजी इतरांच्या गरजा पूर्ण करण्यास, त्यांना मदत करण्यास नम्रपणे तयार राहायला सांगण्यात आले आहे. वरील वचनांत सांगितल्याप्रमाणे, दुसऱ्यांना मदत करण्यास नम्रपणे तयार असणे हे ‘सशक्तपणाचे’ लक्षण आहे. आध्यात्मिक दृष्टीने, येशू आजपर्यंत जिवंत राहिलेल्या कोणत्याही मनुष्यापेक्षा अधिक शक्तिशाली होता, पण त्याने आपल्याविषयी असे म्हटले: “मनुष्याचा पुत्र सेवा करुन घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मत्तय २०:२८) आपण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, त्यामुळे त्याच्याप्रमाणे आपण देखील ‘अशक्तांची’ सेवा करण्यास पुढाकार घेतला पाहिजे.
६. विरोध आणि निंदा करण्यात आली तेव्हा येशूने दाखवलेल्या प्रतिक्रियेचे आपण कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?
६ येशूच्या मनोवृत्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे विचार आणि कृती या नेहमी इतरांच्या उन्नतीकरता होत्या. दुसऱ्या लोकांची मनोवृत्ती कितीही वाईट असो, पण त्याचा परिणाम येशूने आपल्या चांगल्या मनोवृत्तीवर कधीही होऊ दिला नाही. तो निरंतर देवाची सेवा करत राहिला. याबाबतीतही आपण येशूचे अनुकरण केले पाहिजे. देवाची विश्वासूपणे सेवा करताना लोकांनी येशूची निंदा केली, त्याचा छळ केला, पण तेव्हा देखील त्याने कोणतीही तक्रार न करता हे सर्व सहन केले. ‘आपल्या शेजाऱ्याची उन्नती करण्याकरता त्याचे बरे करू पाहणाऱ्यांना’ या अविश्वासी आणि दुष्ट जगाकडून विरोध येईल हे त्याला माहीत होते.
७. येशू उतावीळ किंवा अधीर नव्हता हे कशावरून म्हणता येईल आणि याबाबतीत आपणही येशूचे अनुकरण का केले पाहिजे?
७ बऱ्याच इतर बाबतीतही येशूने योग्य मनोवृत्ती बाळगली. तो उतावीळ नव्हता; यहोवाच्या उद्देशांच्या पूर्णतेकरता त्याच्या नियुक्त वेळेकरता थांबण्यास तो तयार होता. (स्तोत्र ११०:१; मत्तय २४:३६; प्रेषितांची कृत्ये २:३२-३६; इब्री लोकांस ) आपल्या अनुयायांशीही येशू अतिशय सहनशीलतेने वागला. त्याने त्यांना म्हटले: “माझ्यापासून शिका.” तो “सौम्य” होता, आणि त्यामुळे त्याच्या शिकवणुकी उभारणीकारक आणि आनंददायक होत्या. तसेच, तो “लीन” होता; त्यामुळे त्याच्या वागण्याबोलण्यात दिखाऊपणा किंवा गर्विष्ठपणा नव्हता. ( १०:१२, १३मत्तय ११:२९) पौल आपल्याला देखील येशूच्या या गुणांचे अनुकरण करण्यास प्रोत्साहन देतो. तो म्हणतो: “जी चित्तवृत्ति ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीहि असो; तो देवाच्या स्वरूपाचा असूनहि देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.”—फिलिप्पैकर २:५-७.
८, ९. (अ) निःस्वार्थ मनोवृत्ती विकसित करणे सोपे का नाही? (ब) येशूच्या आदर्शाचे आपण तंतोतंत पालन करू शकलो नाही तरीसुद्धा आपण निराश का होऊ नये आणि या बाबतीत आपण पौलाकडून काय शिकू शकतो?
८ इतरांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे किंवा स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखाचा मी विचार करू इच्छितो असे म्हणणे सोपे आहे. पण जर आपण प्रामाणिकपणे परीक्षण केले तर बऱ्याचदा आपण अशा निःस्वार्थ मनोवृत्तीने वागत नाही असे कदाचित आपल्याला दिसून येईल. याचे पहिले कारण म्हणजे, आपल्या सर्वांमध्ये आदाम व हव्वेपासून आलेली उपजत स्वार्थी वृत्ती आहे; आणि दुसरे कारण म्हणजे आपण स्वार्थीपणाला बढावा देणाऱ्या जगात राहत आहोत. (इफिसकर ४:१७, १८) निःस्वार्थ मनोवृत्ती विकसित करण्यासाठी आपल्याला आपल्या उपजत अपरिपूर्ण स्वभावाच्या विरोधात जाऊन विचार करायला शिकावे लागेल. दृढ निर्धार आणि प्रयत्नांशिवाय हे शक्य नाही.
९ आपण जेव्हा स्वतःच्या अपरिपूर्ण स्वभावाचा विचार करतो आणि त्याच्या तुलनेत येशूच्या परिपूर्ण आदर्शाचा विचार करतो तेव्हा आपण निराश होण्याची शक्यता आहे. येशूच्या परिपूर्ण मनोवृत्तीचे अनुकरण करणे आपल्याला शक्यच नाही असे कदाचित आपल्याला वाटेल. पण पौलाच्या या दिलासा देणाऱ्या शब्दांकडे लक्ष द्या: “मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही; कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो; तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.” (रोमकर ७:१८, १९, २२, २३) पौलाला देवाची इच्छा पूर्ण करण्याची मनस्वी इच्छा असूनही अपरिपूर्णतेमुळे कधीकधी त्याच्या हातूनही चुका व्हायच्या. पण तरीसुद्धा यहोवाबद्दल व त्याच्या नियमांबद्दल पौलाच्या भावना, त्याची मनोवृत्ती अनुकरणीय होती. हेच आपल्या बाबतीतही खरे ठरू शकते.
चुकीची मनोवृत्ती सुधारणे
१०. पौलाने फिलिप्पैकरांना कशाप्रकारची चित्तवृत्ती ठेवण्याचे प्रोत्साहन दिले?
१० काहीजणांना त्यांची चुकीची मनोवृत्ती सुधारण्याची गरज पडू शकते का? हो. पहिल्या शतकातील काही खिश्चनांचे उदाहरण लक्षात घ्या. फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात, पौलाने त्यांना योग्य मनोवृत्ती बाळगण्यास सांगितले. त्याने लिहिले: “एवढ्यातच मी मिळविले, किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यांत घेतले ते मी आपल्या कह्यांत घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यांत घेतले असे मानीत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम. तर जेवढे आपण पोक्त आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी.” (तिरपे वळण आमचे.)—फिलिप्पैकर ३:१२-१५.
११, १२. यहोवा कोणत्या मार्गांनी आपल्याला योग्य मनोवृत्ती प्रगट करतो?
११ पौलाच्या शब्दांवरून हेच दिसून येते, की ज्याला ख्रिस्ती बनल्यानंतर प्रगती करण्याची गरज वाटत नाही अशा व्यक्तीची मनोवृत्ती निश्चितच चुकीची आहे. या व्यक्तीने ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात केलेली नाही. (इब्री लोकांस ४:११; २ पेत्र १:१०; ३:१४) पण मग ही व्यक्ती आपली चुकीची मनोवृत्ती सुधारूच शकत नाही असा याचा अर्थ होतो का? मुळीच नाही. आपली मनापासून इच्छा असेल, तर यहोवा आपल्याला आपली चुकीची मनोवृत्ती सुधारण्यास नक्कीच मदत करेल. म्हणूनच पौल पुढे फिलिप्पैकरांना असे म्हणतो: “तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ति ठेविली, तरी देव तेहि तुम्हाला प्रगट करील.”—फिलिप्पैकर ३:१५.
१२ पण यहोवाने आपली चुकीची मनोवृत्ती आपल्या लक्षात आणून द्यावी अशी आपली इच्छा असेल तर आपणही आपल्या बाजूने प्रयत्न केला पाहिजे. ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या ख्रिस्ती प्रकाशनांच्या साहाय्याने देवाच्या वचनाचा प्रार्थनापूर्वक अभ्यास केल्यामुळे “निराळी चित्तवृत्ति” असणाऱ्यांना आपल्या विचारसरणीत सुधारणा करून योग्य मनोवृत्ती आत्मसात करण्यास मदत होईल. (मत्तय २४:४५) तसेच ‘देवाच्या मंडळीकडे लक्ष देण्याकरता’ पवित्र आत्म्याने नेमलेले ख्रिस्ती वडील देखील आपल्याला आपली मनोवृत्ती सुधारण्यास अगदी आनंदाने साहाय्य करू शकतात. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) यहोवा देव आपल्या अपरिपूर्णतेची दखल घेतो आणि प्रेमळपणे आपल्याला साहाय्य पुरवतो याबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत! यहोवाने पुरवलेल्या मदतीचा आपण नेहमी फायदा करून घेतला पाहिजे.
उदाहरणांवरून धडा घेणे
१३. योग्य मनोवृत्तीबद्दल ईयोबाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?
१३ रोमकर पत्रातील १५ व्या अध्यायात, चुकीची मनोवृत्ती सुधारण्याकरता इतिहासातील उदाहरणे आपल्याला कशी सहायक ठरू शकतात याविषयी पौल सांगतो. तो लिहितो: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोमकर १५:४) जुन्या काळात यहोवाच्या विश्वासू सेवकांपैकी देखील काहींना त्यांच्या विचारसरणीत काही बाबतीत फेरबदल करण्याची गरज पडली होती. उदाहरणार्थ, ईयोबाची मनोवृत्ती तशी चांगलीच होती. त्याला आलेल्या वाईट अनुभवांकरता त्याने कधीही यहोवाला दोषी ठरवले नाही; तसेच त्याला सहन कराव्या लागलेल्या दुःखांमुळे यहोवावरचा त्याचा विश्वास किंचितही कमी झाला नाही. (ईयोब १:८, २१, २२) पण त्याच्यात एक दोष होता, स्वतःचा निर्दोषपणा शाबीत करण्यासाठी सबब देण्याची त्याची प्रवृत्ती होती. यहोवाने एलीहूच्या माध्यमाने ईयोबाला त्याच्या या प्रवृत्तीवर मात करण्यासाठी मार्गदर्शन दिले. एलीहूने आपला अपमान केला आहे असे समजण्याऐवजी ईयोबाने त्याचे मार्गदर्शन स्वीकारले. आपल्या मनोवृत्तीत खरोखरच बदल करण्याची गरज आहे हे ओळखून एलीहूने दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन केले.—ईयोब ४२:१-६.
१४. आपल्या मनोवृत्तीबद्दल कोणी सल्ला दिल्यास, आपण ईयोबाचे कसे अनुकरण करू शकतो?
१४ समजा, आपल्या वागण्याबोलण्यातून आपली चुकीची मनोवृत्ती असल्याचे दिसून येत आहे असे एखाद्या ख्रिस्ती बांधवाने आपल्या लक्षात आणून दिले, तर आपणही ईयोबाप्रमाणे त्याचा सल्ला स्वीकारू का? ईयोबाप्रमाणे आपणही कधीच ‘अनुचित कृत्य केल्याचा देवावर आरोप करू नये.’ (ईयोब १:२२) आपल्यावर अन्याय होत असेल तरीसुद्धा आपण कधीही तक्रार करू नये किंवा यहोवाला आपल्या कठीण परिस्थितीकरता जबाबदार ठरवू नये. तसेच सबब सांगण्याच्या प्रवृत्तीपासूनही आपण सांभाळून राहिले पाहिजे. आपण नेहमी हे आठवणीत ठेवले पाहिजे की यहोवाच्या सेवेत आपल्यावर कितीही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जावोत, शेवटी आपण “निरुपयोगी दास” आहोत.—लूक १७:१०.
१५. (अ) येशूच्या अनुयायांपैकी काहींनी कोणती चुकीची मनोवृत्ती प्रदर्शित केली? (ब) पेत्राने एक उत्तम मनोवृत्ती कशाप्रकारे दाखवली?
१५ पहिल्या शतकात येशूच्या शिकवणुकी ऐकणाऱ्या काहीजणांनी चुकीची मनोवृत्ती दाखवली. एकदा येशूने सांगितलेली एक गोष्ट बऱ्याच जणांना समजली नाही. तेव्हा “त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे योहान ६:६०, ६६-६८) पेत्राची किती चांगली मनोवृत्ती होती! कधीकधी बायबलच्या काही वचनांचे स्पष्टीकरण किंवा आपल्या समजुतीत सुधारणा केली जाते तेव्हा आपल्याला ते समजायला आणि स्वीकारायला कठीण वाटू शकते. पण अशा प्रसंगी पेत्राने दाखवलेल्या मनोवृत्तीनुसारच वागणे उत्तम ठरणार नाही का? फक्त काही गोष्टी सुरवातीला समजायला कठीण वाटतात म्हणून यहोवाची सेवा करण्याचे थांबवणे किंवा ‘सुवचनांच्या नमुन्याच्या’ म्हणजेच सत्याच्या विपरीत बोलणे हे आपल्याचकरता हानीकारक ठरू शकते.—२ तीमथ्य १:१३.
कोण ऐकून घेऊ शकतो?” साहजिकच त्यांचा विचार चुकीचा होता. आणि या चुकीच्या मनोवृत्तीमुळे त्यांनी येशूचे ऐकले नाही. या अहवालात पुढे असे म्हटले आहे, “ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत.” पण सगळ्यांचीच मनोवृत्ती चुकीची होती का? नाही. पुढे असे सांगितले आहे: “येशू बारा शिष्यांना म्हणाला, तुमचीहि निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.” (१६. येशूच्या दिवसांतील यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी कोणती घृणास्पद मनोवृत्ती दाखवली?
१६ पहिल्या शतकातील यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी देखील येशूची मनोवृत्ती आत्मसात केली नाही. उलट त्यांनी येशूचे काहीही न ऐकण्याचा जणू चंगच बांधला होता. लाजाराचे पुनरुत्थान झाले त्यावेळी त्यांची ही वृत्ती स्पष्ट दिसून आली. चांगल्या मनोवृत्तीची कोणतीही व्यक्ती हा चमत्कार पाहून येशूवर विश्वास ठेवण्यास तयार झाली असती. कारण लाजारचे पुनरुत्थान हे देवाने येशूला पाठवले असल्याचा स्पष्ट पुरावा होता. पण अहवालात सांगितले आहे, “मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, ‘आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करितो. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रहि हिरावून घेतील.’” मग या समस्येवर त्यांनी काय तोडगा काढला? “त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसात निश्चय केला.” येशूला मारून टाकण्याचा कट तर त्यांनी रचलाच, पण त्यासोबत येशूच्या चमत्कारिक शक्तीचा पुरावा देखील नष्ट करण्याचा त्यांनी निश्चय केला. म्हणजेच, त्यांनी “लाजारालाहि जिवे मारण्याचा निश्चय केला.” (योहान ११:४७, ४८, ५३; १२:९-११) या धार्मिक पुढाऱ्यांची खरोखर किती घृणास्पद मनोवृत्ती होती! अशी मनोवृत्ती आपल्यातही येऊ शकते का? हो, ज्या गोष्टींबद्दल आपण आनंद मानला पाहिजे त्यांबद्दल जर आपल्याला उलट राग येत असेल किंवा जर आपण कुरकूर करत असू तर त्या यहुद्यांसारखीच घृणास्पद मनोवृत्ती दाखवण्यासारखे हे होईल. आणि हे केवळ घृणास्पदच नव्हे तर धोकेदायकही ठरेल!
ख्रिस्ताची सकारात्मक मनोवृत्ती आत्मसात करा
१७. (अ) दानीएलाने कोणत्या परिस्थितीत निर्भय मनोवृत्ती दाखवली? (ब) येशूने कशाप्रकारे निर्भीडपणे कार्य केले?
१७ यहोवाचे सेवक नेहमी सकारात्मक मनोवृत्ती बाळगतात. दानीएलाचेच उदाहरण घ्या. त्याच्या शत्रूंनी कट रचून राजाला सोडून कोणत्याही देवाला प्रार्थना न करण्याचा हुकूम काढला तेव्हा दानीएलाने काय केले? या कायद्याचे पालन केल्यामुळे यहोवा देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर विपरीत परिणाम होईल हे दानीएलाला माहीत होते. त्याने ३० दिवस देवाला प्रार्थना करण्याचे थांबवले का? नाही, तो अगदी निर्भयतेने आपल्या सवयीप्रमाणे दिवसातून तीन वेळा यहोवाला प्रार्थना करतच राहिला. (दानीएल ६:६-१७) येशू देखील आपल्या शत्रूंना कधीही घाबरला नाही. एकदा शब्बाथाच्या दिवशी, वाळलेल्या हाताचा एक माणूस त्याच्याजवळ आला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या यहुदी लोकांना शब्बाथाच्या दिवशी कोणाला बरे केलेले आवडणार नाही हे येशूला माहीत होते. त्यांनी आपले मत व्यक्त करावे म्हणून येशूने त्यांना सरळ प्रश्न केला. पण ते काही बोलले नाहीत तेव्हा येशूने त्या माणसाचा हात बरा केला. (मार्क ३:१-६) आपण योग्य तेच करत आहोत हे माहीत असल्यामुळे, येशू कधीही देवाने त्याला दिलेले काम करण्यापासून मागे हटला नाही.
१८. काहीजण आपला विरोध का करतात, पण त्यांच्या विरोधात्मक मनोवृत्तीला आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे?
१८ यहोवाच्या साक्षीदारांना देखील आज याची जाणीव आहे की विरोधाला घाबरून चालणार नाही. हे येशूच्या मनोवृत्तीच्या
विरोधात वागण्यासारखे ठरेल. बरेचजण खरी माहिती नसल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांचा विरोध करतात. आणि काही लोक त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या संदेशाबद्दल द्वेष असल्यामुळे त्यांचा विरोध करतात. पण लोकांच्या विरोधाला, त्यांच्या द्वेषपूर्ण वागण्याला घाबरून आपण आपली सकारात्मक मनोवृत्ती बदलता कामा नये. आपल्या उपासनेवर इतरांच्या मर्जीचा परिणाम आपण कधीही होऊ देऊ नये.१९. येशू ख्रिस्तासारखी मनोवृत्ती आपण कशी दाखवू शकतो?
१९ नेहमीच सोपे नव्हते तरीसुद्धा, येशूने आपल्या अनुयायांबद्दल आणि देवाच्या तरतुदींबद्दल नेहमी सकारात्मक मनोवृत्ती दाखवली. (मत्तय २३:२, ३) याबाबतीतही आपण त्याचे अनुकरण केले पाहिजे. आपले बांधव अपरिपूर्ण आहेत हे खरे आहे, पण त्यांच्याप्रमाणे आपणही आहोत. आपल्या जागतिक बांधवांत आपल्याला जितके चांगले साथीदार आणि विश्वासू सोबती मिळतात तितके आणखी कोठे मिळू शकतात? यहोवाने त्याच्या लिखित वचनाची पूर्ण समज अद्याप आपल्याला दिलेली नाही हे खरे आहे, पण इतर कोणत्या धार्मिक गटाजवळ आपल्या इतके तरी ज्ञान आहे का? तेव्हा, येशू ख्रिस्ताप्रमाणेच आपण नेहमी योग्य मनोवृत्ती बाळगू या. यात यहोवाच्या नियुक्त वेळेकरता धीर धरण्याचा देखील समावेश आहे, आणि याच विषयावर पुढील लेखात चर्चा करण्यात आली आहे.
[तळटीप]
^ परि. 3 वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित केलेल्या सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या प्रकाशनात येशूच्या जीवनाबद्दल व त्याच्या सेवाकार्याबद्दल चर्चा करण्यात आली आहे.
तुम्ही समजावून सांगू शकता का?
• एखाद्या व्यक्तीच्या मनोवृत्तीमुळे तिच्या जीवनावर कसा प्रभाव पडू शकतो?
• येशूच्या मनोवृत्तीचे वर्णन करा.
• ईयोबाच्या मनोवृत्तीवरून आपण काय शिकू शकतो?
• आपला विरोध केला जातो तेव्हा आपण कशाप्रकारची मनोवृत्ती बाळगली पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[७ पानांवरील चित्रे]
योग्य मनोवृत्ती बाळगणारा ख्रिस्ती इतरांना मदत करण्यास सदैव तयार असतो
[९ पानांवरील चित्र]
देवाच्या वचनाचा प्रार्थनापूर्वक अभ्यास केल्याने ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात करण्यास मदत होते