कदापि विसरू नये असा प्रसंग
कदापि विसरू नये असा प्रसंग
आपल्याला मिळणारी “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देवाकडून अर्थात आपल्या स्वर्गीय पित्याकडून मिळते. —याकोब १:१७.
पण पापी, अपरिपूर्ण स्थितीत जखडलेल्या मानवजातीला देवाने एक सर्वोत्कृष्ट देणगी दिली आहे. ती म्हणजे, या पतीत अवस्थेतून मानवजातीची सुटका करण्याकरता देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्रामार्फत अर्थात येशू ख्रिस्तामार्फत एक खास तरतूद केली आहे. आपला मुक्तिदाता येशू याच्या मृत्यूमुळेच भविष्यात, याच पृथ्वीवर एका विश्वव्यापी बागेत सार्वकालिक जीवन जगण्याची संधी आपल्याला मिळेल. त्यासाठीच, लूक २२:१९ मध्ये आपल्याला येशूच्या मृत्यू दिनाचे संस्मरण करण्याची आज्ञा देण्यात आली आहे.
या आज्ञेनुसार यहोवाचे साक्षीदार येशूच्या मृत्यू दिनाचे संस्मरण करतील. आणि त्यासाठी ते तुमचेही हार्दिक स्वागत करतात. हा वार्षिक सोहळा बायबलच्या चांद्र दिनदर्शिकेनुसार निसान १४ या तारखेशी जुळणाऱ्या तारखेला अर्थात रविवार, एप्रिल ८, २००१ रोजी, सूर्यास्तानंतर साजरा केला जाईल. हा खास प्रसंग आपण विसरून जाऊ नये म्हणून कॅलेंडरवर या तारखेची नोंद करून ठेवा. हा सोहळा कुठे आणि किती वाजता साजरा केला जाईल याची निश्चित माहिती तुमच्या परिसरात राहणारे यहोवाच्या साक्षीदार तुम्हाला देतील.