व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ते ‘शेवटपर्यंत टिकून राहिले’

ते ‘शेवटपर्यंत टिकून राहिले’

ते ‘शेवटपर्यंत टिकून राहिले’

यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयातील नवीन सदस्यांना दाखवल्या जाणाऱ्‍या १९९३ सालाच्या एका व्हिडिओत बंधू लायमन अलेक्झॅन्डर स्विंगल यांनी यहोवाची सेवा करण्याविषयी आपल्या भावना अशाप्रकारे व्यक्‍त केल्या: “मरणाच्या अगदी शेवटच्या घटकेपर्यंत सक्रियपणे सेवा करीत राहा!”

नव्याण्णव वर्षांचे बंधू स्विंगल, इतरांना दिलेल्या उत्तेजनाप्रमाणेच स्वतःही जगले. ते ‘शेवटपर्यंत टिकून राहिले.’ (मत्तय २४:१३) बुधवार, मार्च ७ रोजी त्यांची तब्येत बरी नसतानासुद्धा ते यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या एका सभेला उपस्थित राहिले. ते देखील या मंडळाचे सदस्य होते. त्यानंतरच्या मंगळवारी त्यांची तब्येत आणखीनच खालावली आणि मार्च १४ रोजी पहाटे ४:२६ वाजता डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले.

लायमन स्विंगल यांनी न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात १९३० सालच्या एप्रिल ५ पासून आपल्या सेवेची सुरवात केली होती. जवळजवळ ७१ वर्षे त्यांनी तेथे सेवा केली. बंधू स्विंगल यांना पहिल्यांदा बाईंडिंग विभागात मग प्रेसरूममध्ये काम देण्यात आले. छपाईसाठी लागणारी शाई बनवण्याच्या विभागातही त्यांनी काम केले. खरे तर, बंधू स्विंगल यांनी २५ वर्षे शाई बनवण्याच्या विभागात काम केले. या व्यतिरिक्‍त त्यांनी मुख्यालयातील लेखन विभागाचे सदस्य म्हणूनही २० वर्षे सेवा केली. शेवटली १७ वर्षे ते ट्रेझररच्या कार्यालयात काम करत होते.

बंधू स्विंगल देवाच्या राज्याचे धाडसी प्रचारक होते. ब्रुकलिनमध्ये नवीन असताना, त्यांचा रुममेट आर्थर वोर्स्ली याच्याबरोबर ते साक्षीदारांच्या मालकीची नाव घेऊन हडसन नदीवर जायचे. पुष्कळ शनिवार-रविवारच्या दिवशी ते ध्वनिप्रक्षेपण साधनाचा उपयोग करून किनाऱ्‍यालगत राहणाऱ्‍या लोकांना राज्य संदेश ऐकवायचे.

नोव्हेंबर ६, १९१० रोजी नेब्रॅस्का येथील लिनकॉनमध्ये बंधू स्विंगल यांचा जन्म झाला होता. पण काही दिवसांतच त्यांचे कुटुंब उटा येथील सॉल्ट लेक सिटीत राहायला आले. त्यांचे आईवडील १९१३ साली बायबल विद्यार्थी बनले. पूर्वी यहोवाच्या साक्षीदारांना याच नावाने ओळखले जायचे. स्विंगल कुटुंबाला, साक्षीदारांच्या ब्रुकलिन मुख्यालयातून येणाऱ्‍या पाहुणे वक्‍त्‌यांना आदरातिथ्य दाखवायला खूप आवडायचे. या आध्यात्मिक बांधवांच्या सहवासामुळे लायमनच्या मनावर आध्यात्मिक गोष्टींची चांगलीच छाप पडली. त्यांनी १९२३ साली वयाच्या १२ वर्षी देवाला स्वतःचे जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला होता.

बंधू लायमन यांनी ब्रुकलिनमध्ये २६ पेक्षा अधिक वर्षे सेवा केल्यानंतर क्रिस्टल झरचर हिच्याबरोबर जून ८, १९५६ रोजी विवाह केला. क्रिस्टलच्या येण्यामुळे बंधू लायमनचे जीवन अधिकच समृद्ध झाले. त्यांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. १९९८ मध्ये क्रिस्टलचा मृत्यू होईपर्यंत ते दोघे एकत्र मिळून क्षेत्र सेवेला जात असत. क्रिस्टलचा मृत्यू व्हायच्या तीन वर्षांआधी, तिला पक्षघाताचा झटका आला की तिने बिछानाच पकडला. परंतु बंधू लायमनने आपल्या पत्नीची इतकी चांगली काळजी घेतली की त्यामुळे त्यांना ओळखणाऱ्‍या सर्वांना प्रेरणा मिळाली. आपल्या पत्नीला व्हीलचेअरवर बसवून रस्त्यावर घेऊन जाणाऱ्‍या बंधू लायमनला पाहून अनेकांना भरून यायचे. मग रस्त्यावर त्यांची पत्नी, क्रिस्टल येणाऱ्‍या जाणाऱ्‍या लोकांना टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! मासिके सादर करायची.

बंधू स्विंगल मनमोकळे तर होतेच; परंतु, ज्या कोणाशी त्यांचा परिचय व्हायचा ते सर्व त्यांना प्रेम करायचे. बंधू स्विंगल यांना आपल्या आईवडिलांप्रमाणेच, येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या स्वर्गीय राज्यात राज्य करण्याची बायबल आधारित आशा होती. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे, की त्यांची ही आशा आता पूर्ण झाली आहे.—१ थेस्सलनीकाकर ४:१५-१८; प्रकटीकरण १४:१३.

[३१ पानांवरील चित्र]

बंधू स्विंगल यांनी शाई बनवण्याच्या विभागात जवळजवळ २५ वर्षे सेवा केली

[३१ पानांवरील चित्र]

एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे लायमन व क्रिस्टल