बायबलची समज प्राप्त करण्यासाठी साहाय्य
बायबलची समज प्राप्त करण्यासाठी साहाय्य
बायबल एक अनोखे पुस्तक आहे. बायबलच्या लेखकांचा दावा आहे की, हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना देवाकडून प्रेरणा मिळाली; आणि त्यांचा हा दावा खरा आहे याला बायबलमधील मजकुरात भरमसाट पुरावा मिळतो. (२ तीमथ्य ३:१६) जीवनाची सुरवात कशी झाली, जीवनाचा उद्देश काय आहे आणि मनुष्यजातीचे भविष्य काय आहे हे देखील बायबलमध्ये सांगितले आहे. म्हणूनच, हे पुस्तक परीक्षण करण्याजोगे आहे!
तुम्ही कधी बायबल वाचायचा प्रयत्न केला आहे का? आणि तुम्हाला ते कठीण वाटले आहे का? प्रश्नांची उत्तरे नेमकी कोठे शोधायची हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तुमच्याप्रमाणेच अनेकांनाही असेच वाटते. पहिल्या शतकातही असाच एक मनुष्य होता. तो जेरूसलेमहून आपल्या मायदेशी इथियोपियाला रथात बसून चालला होता. इथिओपियाचा हा अधिकारी बायबलमधील यशयाच्या भविष्यसूचक पुस्तकातून (हे पुस्तक सातशेहून अधिक वर्षांआधी लिहिण्यात आले होते) मोठ्याने वाचत चालला होता.
अचानक, त्याच्या रथासोबत धावणाऱ्या एका मनुष्याने त्याला हाक मारली. तो होता येशूचा शिष्य, फिलिप्प; फिलिप्पाने त्या इथियोपियन मनुष्याला विचारले: “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” इथियोपियन मनुष्याने म्हटले: “कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार?” मग त्याने फिलिप्पाला रथामध्ये आपल्याजवळ येऊन बसायला बोलावले. तेव्हा, फिलिप्पाने त्याला त्या विशिष्ट उताऱ्याचा अर्थ समजावून सांगितला व “येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.”—प्रेषितांची कृत्ये ८:३०-३५.
अनेक वर्षांआधी घडलेल्या या घटनेत फिलिप्पाने ज्याप्रकारे त्या इथियोपियन इब्री लोकांस ६:१) मग, तुमची प्रगती होईल तसतसे, प्रेषित पौलाने ज्याला “जड अन्न” म्हटले अर्थात गहन सत्ये तुम्हाला समजतील. (इब्री लोकांस ५:१४) तुम्हाला नेमका बायबलचा अभ्यास करायचा असला तरी, इतर प्रकाशनांच्या साहाय्याने—बायबल अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या साधनांच्या आधारे—वेगवेगळ्या विषयांवर बायबलमधील उतारे शोधून काढायला व समजायला तुम्हाला मदत मिळेल.
मनुष्याला देवाचे वचन समजण्यास मदत केली त्याचप्रमाणे यहोवाचे साक्षीदार आज लोकांना बायबल समजण्यास मदत करतात. तुम्हालाही ते आनंदाने मदत करतील. सहसा, बायबलचा पद्धतशीर अभ्यास करणे, अर्थात शास्त्रवचनांतील मूलभूत शिकवणुकींपासून सुरवात करणे सर्वात चांगले. (अभ्यासाची वेळ आणि ठिकाण तुमच्या सोयीनुसार निवडले जाऊ शकते. काहीजण तर फोनवरूनही अभ्यास करतात. हा अभ्यास, सामूहिकरित्या घेतला जात नाही; तर ती एक खाजगी व्यवस्था आहे आणि तुमची परिस्थिती, पार्श्वभूमी व शिक्षण लक्षात घेऊन त्यानुसार हा अभ्यास चालवला जातो. अशा बायबल अभ्यासाकरता तुम्हाला काही मोबदला द्यायची गरज नाही. (मत्तय १०:८) शिवाय परीक्षा नसल्यामुळे तुम्हाला घाबरायचेही कारण नाही. तुम्ही जे प्रश्न विचाराल त्यांची उत्तरे तुम्हाला दिली जातील आणि देवाशी घनिष्ट नातेसंबंध कसा जोडायचा हे तुम्हाला शिकायला मिळेल. पण, तुम्ही बायबलचा अभ्यास का केला पाहिजे? बायबलचा अभ्यास केल्याने कोणत्या कारणांमुळे आपल्याला जीवनात अधिक आनंद मिळू शकतो हे पडताळून पाहा.