व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

काही ख्रिश्‍चनांनी एके काळी “निषिद्ध मूर्तिपूजा” केली होती असे १ पेत्र ४:३ येथे म्हटले आहे. पण देवाने सर्वच प्रकारची मूर्तिपूजा निषिद्ध केली अर्थात मना केली किंवा निंद्य ठरवलेली नाही का?

होय, देवाच्या नजरेत सर्व प्रकारची मूर्तिपूजा निषिद्ध आहे. त्याची पसंती प्राप्त करणारे मूर्तिपूजा करत नाहीत.—१ करिंथकर ५:११; प्रकटीकरण २१:८.

परंतु, प्रेषित पेत्र दुसऱ्‍या एका दृष्टिकोनातून मूर्तिपूजेविषयी बोलत होता, असे दिसते. त्याचे एक कारण असे आहे की, अनेक प्राचीन राष्ट्रांमध्ये मूर्तिपूजा प्रचलित होती आणि त्यावर अधिकाऱ्‍यांचे कोणतेही कायदेशीर निर्बंध लावलेले नव्हते. अर्थात, त्या विशिष्ट देशातील कायद्याच्या दृष्टीने ती मूर्तिपूजा निषिद्ध नव्हती. काही प्रकारची मूर्तिपूजा तर राष्ट्रीय किंवा सरकारी धोरणाचा भाग देखील होती. त्याअर्थी, काहींनी ख्रिस्ती बनण्याआधी ‘कायदेशीर निर्बंध नसलेल्या मूर्तिपूजेत’ भाग घेतला होता. (न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन, १९५० आवृत्ती) या संदर्भात बॅबिलोनी राजा नबुखद्‌नेस्सर याने उभारलेल्या एका सुवर्ण मूर्तीचा उल्लेख करता येईल. पण यहोवाचे सेवक शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो यांनी त्या मूर्तीला साष्टांग दंडवत घालायला नकार दिला होता.—दानीएल ३:१-१२.

दुसऱ्‍या दृष्टिकोनातून पाहिल्यास, मूर्तिपूजेच्या अनेक प्रथा नैसर्गिक नियमाच्या किंवा प्रत्येकाजवळ असलेल्या विवेकामुळे प्राप्त होणाऱ्‍या नैतिक बुद्धीच्या अगदी विरोधात होत्या. (रोमकर २:१४, १५) प्रेषित पौलाने ‘निसर्गाच्या विपरीत’ आणि “अनुचित कर्म” यांविषयी लिहिले आणि या गोष्टी धार्मिक प्रथांचा एक भाग होत्या. (रोमकर १:२६, २७) निषिद्ध मूर्तिपूजेत भाग घेणारे स्त्री-पुरुष मानवी स्वभावाला प्राप्त झालेल्या निर्बंधांचे पालन करत नव्हते. त्यामुळे ख्रिश्‍चनांनी त्या भ्रष्ट चालीरीती सोडून दिल्या हे निश्‍चितच उचित होते.

आधी सांगितलेल्या मूर्तिपूजेच्या व्यतिरिक्‍त गैर-यहुद्यांमध्ये प्रचलित असलेल्या या मूर्तिपूजक प्रथा यहोवा देवाने मना केल्या होत्या. म्हणून त्या बेकायदेशीर होत्या. *कलस्सैकर ३:५-७.

[तळटीप]

^ पहिले पेत्र ४:३ येथील ग्रीक मजकूराचा शब्दशः अर्थ, “बेकायदेशीर मूर्तिपूजा” असा होतो. इंग्रजी बायबलमध्ये याचा अनुवाद “अवैध मूर्तिपूजा,” “निषिद्ध केलेली मूर्तींची उपासना” आणि “अनिर्बंध मूर्तिपूजा” अशा वेगवेगळ्या तऱ्‍हेने करण्यात आला आहे.