व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने तिचे अश्रू पुसून टाकले

देवाने तिचे अश्रू पुसून टाकले

राज्य घोषकांचा वृत्तान्त

देवाने तिचे अश्रू पुसून टाकले

यहोवाच्या नियमांच्या आणि तत्त्वांच्या एकवाक्यतेत जीवन जगणाऱ्‍या लोकांना अनेक आशीर्वाद प्राप्त होतात. आवश्‍यक असलेले बदल करणे नेहमीच सोपे नसले तरीही मदत आणि उत्तेजन मिळतेच. (स्तोत्र ८४:११) आग्नेय आशियातील पुढील अनुभवावरून हे स्पष्ट होते.

एका ठिकाणी सुटीवर गेलेली असताना फ्रान्सच्या एका साक्षीदार बहिणीने किम * नावाच्या एका दुकानाच्या मालकीणीला पृथ्वीसंबंधी यहोवाच्या उद्देशाविषयी सांगितले. तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाची एक प्रतही तिने तिला दिली. ते पुस्तक पाहत असताना, “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील” हे शब्द किमच्या नजरेस पडले. (प्रकटीकरण २१:४) किम आठवून सांगते, “ते शब्द मला स्पर्शून गेले. दुकानात मी लोकांशी बोलायचे, हसायचे, पण लोकांना काय माहीत की दररोज रात्री मी रडल्याशिवाय झोपत नव्हते?” तिच्या दुःखाविषयी तिने सांगितले: “मी १८ वर्षं एका माणसासोबत राहत होते पण तो माझ्याशी लग्न करायला तयार नव्हता; म्हणून मी खूप दुःखी होते. मला असं जगायचं नव्हतं, पण इतक्या वर्षांपासून त्याच्यासोबत राहिल्यामुळं त्याला सोडायला मला धैर्य होईना.”

काही दिवसांनी, किमने लिन नावाच्या एका यहोवाच्या साक्षीदार बहिणीसोबत अभ्यास करायला सुरवात केली. किम म्हणते, “मी जे काही शिकत होते ते मला माझ्या जीवनात लागू करायची खूप इच्छा होती. जसं की, मी पूर्वजांची भक्‍ती करायचं सोडून दिलं आणि यामुळे मला माझ्या कुटुंबाकडून खूप विरोध झाला. तरीही मी ठाम राहिले. शिवाय, कायदेशीर विवाह करून आम्ही दोघांनी एकत्र राहावे यासाठीही मी प्रयत्न केला, पण माझ्या साथीदाराने याला साफ नकार दिला. या अडचणीला तोंड देत असतानाही, फ्रान्समधील ती साक्षीदार बहीण मला बायबलची प्रकाशने पाठवत राहायची आणि लिनही मला खूप प्रोत्साहन देत असे. या बहिणींच्या सहनशीलतेमुळे आणि प्रेमळ आधारामुळे शेवटी मला माझ्या साथीदाराचे खरे रूप दिसू लागले. त्याला ५ ‘बायका’ आणि २५ मुले होती हे मला कळलं! मग मात्र त्याच्याशी संबंध तोडून टाकायला मला धैर्य झालं.

“मोठं, सुखसोयी असलेलं घर सोडून एका लहानशा अपार्टमेंटमध्ये राहायला मला जड जात होतं. त्यात, माझ्या साथीदाराकडून त्याच्यासोबत राहायचा मला सतत दबाव येत होता; मी नकार दिला तर माझ्यावर ॲसिड टाकून माझा चेहरा विद्रूप करून टाकेल, अशीही मला तो धमकी देऊ लागला. पण यहोवाच्या मदतीने मी योग्य तेच करू शकले.” किम प्रगती करत राहिली आणि शेवटी एप्रिल १९९८ मध्ये तिचा बाप्तिस्मा झाला. नंतर, तिच्या दोन बहिणी आणि तिचा किशोरवयीन मुलगा देखील यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागले.

किम म्हणते, “माझं जीवन आशाहीन आहे असं मला सारखं वाटायचं. पण आज, मी अगदी आनंदी आहे आणि आता रात्रीची मी रडत नाही. यहोवाने माझ्या डोळ्यांचे अश्रू केव्हाच पुसून टाकलेत.”

[तळटीप]

^ नावे बदलण्यात आली आहेत.