“मला काय झालंय हे शेवटी मला कळालं!”
“मला काय झालंय हे शेवटी मला कळालं!”
टेहळणी बुरूज, डिसेंबर १, २००० अंकातील जीवन कथा वाचल्यावर टोकियोतील एका मनुष्याने हे उद्गार काढले. त्या लेखाचे शीर्षक होते, “उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही” आणि त्यामध्ये पूर्वी मिशनरी असलेल्या एका बांधवाचा अनुभव दिला होता. या बांधवाला मेनिक-डिप्रेसिव्ह सायकॉसिस असे वैद्यकीय नाव असलेला मनोविकार आहे.
या मासिकाच्या प्रकाशकांना टोकियोतील या मनुष्याने एका पत्रात असे लिहिले: “यातील लक्षणे अगदी माझ्या आजारासारखीच होती. म्हणून मी मानसोपचार इस्पितळात गेलो आणि तेथे मला कळाले की, मलाही मेनिक डिप्रेशन आहे. माझी तपासणी ज्या डॉक्टरांनी केली त्यांना अगदी आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘हा आजार असलेल्या लोकांना आपण आजारी आहोत असं मुळीच वाटत नसतं.’ हा आजार आणखी बळावण्याआधी मला त्याचे निदान करता आले.”
टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या दोन्ही मासिकांचा प्रत्येक अंक वाचल्याने जगभरातील कोट्यवधी लोकांना विविध मार्गाने फायदा होतो. यातील लेख त्यांना ज्ञानवर्धक आणि समाधान देणारे वाटतात. टेहळणी बुरूज मासिक सध्या १४० भाषांमध्ये छापले जाते आणि सावध राहा! ८३ भाषांमध्ये प्रकाशित केले जाते. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिके नियमितपणे वाचायला तुम्हाला देखील आवडतील.