तुम्ही आध्यात्मिक हार्ट अटॅक टाळू शकता
तुम्ही आध्यात्मिक हार्ट अटॅक टाळू शकता
मैदानी खेळांत अतिशय प्रविण असणारा, जागतिक ख्यातीचा एक खेळाडू होता. वरवर पाहिल्यास तो अगदी सुदृढ व निरोगी दिसत होता, पण एके दिवशी सराव सत्रादरम्यान तो अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या खेळाडूचे नाव होते, सरज्ये ग्रिन्कॉफ. दोन वेळा ऑलम्पिक खेळांत सुवर्ण पदक पटकावलेल्या या आईस स्केटरची कारकीर्द पुरती सुरू होण्याआधीच—अवघ्या २८ वर्षांच्या वयात संपुष्टात आली. किती भयंकर शोकांतिका! कारण? हार्ट अटॅक. त्याचा मृत्यू अगदीच अनपेक्षित होता असे म्हटले जाते कारण त्याला हृदयविकार झाला असावा असे सूचित करणारी कोणतीच लक्षणे नव्हती. पण वैद्यकीय परीक्षकांना दिसून आले की त्याचे हृदय विस्तारले होते आणि त्याच्या हृदयरक्तवाहिन्या जवळजवळ पूर्णपणे आकुंचित झाल्या होत्या.
बरेच हृदयविकाराचे झटके अकस्मात आल्याचे भासत असले तरीसुद्धा, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे असे क्वचितच घडते. खरे पाहता, दम लागणे, लठ्ठपणा आणि छातीत दुखणे यांसारख्या वरकरणी लक्षणांकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे, हृदयविकाराच्या झटक्यात व्यक्तीचा मृत्यू झाला नाही तरीसुद्धा बरेच रुग्ण आपल्या उर्वरित आयुष्यात अगदी सामान्य कामे करण्यासही असमर्थ होऊ शकतात.
बहुतेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे याबाबतीत एकमत आहे की हार्ट अटॅक टाळायचा असेल, तर आहार व जीवनशैलीवर सतत नियंत्रण करणे व नियमित वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे. * ही काळजी घेण्यासोबतच, आवश्यक ते बदल करण्यास तयार असण्याची मनोवृत्ती देखील हार्ट अटॅकचे दुःखद परिणाम टाळण्यास बराच हातभार लावू शकते.
तथापि, जिच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे अशी आपल्या हृदयाची एक दुसरी बाजू देखील आहे. बायबल बजावते, “ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर, कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात.” (नीतिसूत्रे ४:२३, पं.र.भा.) अर्थात हे वचन विशेषतः मनुष्याच्या लाक्षणिक हृदयाकडे संकेत करत आहे. शारीरिक हृदयाचे रक्षण करण्यासाठी सतत जागरुक राहणे गरजेचे आहेच; पण ज्या रोगांमुळे शेवटी आध्यात्मिक मृत्यू होऊ शकतो अशा रोगांपासून आपल्या लाक्षणिक हृदयाचे रक्षण करायचे असल्यास याविषयी सतत सावध राहणे कितीतरी अधिक पटीने महत्त्वाचे आहे.
आध्यात्मिक हार्ट अटॅकचे पृथक्करण
शारीरिक हृदयरोगाप्रमाणेच आध्यात्मिक दृष्टीने हार्ट अटॅक टाळण्याचा सर्वात खात्रीलायक मार्ग म्हणजे त्याच्या कारणांचा अभ्यास करणे आणि मग त्यांवर उपाय करण्यासाठी पावले उचलणे. आता आपण शारीरिक आणि लाक्षणिक हृदयविकारांना कारणीभूत ठरणाऱ्या काही मूलभूत गोष्टींवर विचार करूया.
आहार. चमचमीत, मसालेदार पदार्थ जिभेला रुचकर लागत असले तरीसुद्धा त्यांमुळे आपल्या आरोग्याला मात्र फार कमी फायदा होतो किंवा काहीही फायदा होत नाही. त्याचप्रकारे मानसिकरित्या निकस अन्न अगदी सहज उपलब्ध असून ते इंद्रियांना सुखावणारे आहे पण माणसाच्या आध्यात्मिक आरोग्याला ते हानीकारक ठरते. प्रसार माध्यमांनी अतिशय परिणामकारक विक्रीतंत्रांचा उपयोग करून निषिद्ध सेक्स, ड्रग्स, हिंसाचार आणि अलौकिकवाद यांविषयी भरपूर साहित्य उपलब्ध करून दिले आहे. असा आहार ग्रहण करणे लाक्षणिक हृदयाकरता अतिशय घातक ठरू शकते. म्हणूनच देवाचे वचन बजावून सांगते: “जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत; आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१६, १७.
पण जिभेचे चोचले पुरवण्याची सवय असलेल्या व्यक्तीला फळे व हिरव्या भाज्या यांसारखे आरोग्यदायक खाद्यपदार्थ नको असतात. त्याचप्रकारे जगिक गोष्टी आपल्या मनात व हृदयात भरण्याची सवय झालेल्या व्यक्तीला सहसा सकस व जड आध्यात्मिक अन्न हवेहवेसे वाटणार नाही. काही काळ कदाचित तो देवाच्या वचनातील ‘दुधाने’ काम भागवेल. (इब्री लोकांस ५:१३) पण दीर्घ पल्ल्यात, ख्रिस्ती मंडळीतील व सेवाकार्यातील मूलभूत आध्यात्मिक जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता लागणारी आध्यात्मिक परिपक्वता तो विकसित करू शकणार नाही. (मत्तय २४:१४; २८:१९; इब्री लोकांस १०:२४, २५) या परिस्थितीत असणाऱ्या काही जणांनी स्वतःला आध्यात्मिकरित्या इतके कमकुवत होऊ दिले की शेवटी ते अक्रियाशील साक्षीदार बनले!
आणखी एक धोका म्हणजे वरकरणी आभास फसवा असू शकतो. एखादी व्यक्ती कदाचित यांत्रिकपणे आपल्या सर्व ख्रिस्ती जबाबदाऱ्या पूर्ण करत असेल पण आतल्याआत याच व्यक्तीचे लाक्षणिक हृदय दिवसेंदिवस कमजोर होत असण्याची शक्यता आहे. कदाचित ही व्यक्ती कोणाच्याही नकळत भौतिकवादी विचारधारा आत्मसात करत असेल किंवा अनैतिकता, हिंसा किंवा अलौकिकवाद यांवर आधारित असलेल्या मनोरंजनाच्या साहित्याचा आस्वाद घेत असेल. या गोष्टींचा त्या व्यक्तीच्या आध्यात्मिकतेवर फारसा फरक पडत नाही असे कदाचित वरवर भासत असेल; पण ज्याप्रकारे निकस आहारामुळे रक्तवाहिन्या कठीण होतात आणि शारीरिक हृदयाला नुकसान पोहंचते त्याचप्रकारे अशा अयोग्य आध्यात्मिक आहारामुळे लाक्षणिक हृदय देखील निकामी होऊ शकते. म्हणूनच येशूने आपल्या हृदयात अनुचित वासनांना थारा न देण्याविषयी बजावले होते. त्याने म्हटले: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२८) होय, निकस आध्यात्मिक आहारामुळे आध्यात्मिक हार्ट अटॅक येऊ शकतो. पण आणखी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
२ तीमथ्य २:१५) किंवा एखादा काही ख्रिस्ती सभांना उपस्थित राहात असेल पण या सभांची तयारी करण्याचा व त्यांत सहभाग घेण्याचा मात्र तो फारसा प्रयत्न करत नसेल. अशा व्यक्तीच्या डोळ्यापुढे कोणतीही आध्यात्मिक ध्येये नसतात, किंवा त्याच्याठायी आध्यात्मिक गोष्टींची भूक किंवा त्यांबद्दल उत्सुकता नसते. आध्यात्मिक व्यायामाच्या अभावामुळे एकेकाळी त्याच्या मनात असलेला विश्वास हळूहळू कमकुवत होऊन शेवटी नाहीसा होतो. (याकोब २:२६) प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना लिहिलेल्या पत्रात या धोक्याची सूचना दिली; त्यांच्यापैकीही काहीजण अशाच अक्रियाशील आध्यात्मिक जीवनशैलीला बळी पडले होते. आध्यात्मिकरित्या त्यांची मने कठीण होण्याच्या धोक्याविषयी त्याने इब्री ख्रिश्चनांना कशाप्रकारे सावध केले याकडे लक्ष द्या. “बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेहि असू नये [“निर्माण होऊ नये,” NW] म्हणून जपा. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतु हा की, पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये.”—इब्री लोकांस ३:१२, १३.
व्यायाम. बैठ्या जीवनशैलीमुळे शारीरिक हार्ट अटॅकची शक्यता वाढते हे सर्वज्ञात आहे. त्याचप्रकारे आध्यात्मिक अर्थाने बैठ्या जीवनशैलीमुळे देखील गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखादा ख्रिस्ती सेवाकार्यात थोडाबहुत सहभाग घेत असेल पण हे तो कदाचित आपल्या सोयीनुसार करत असेल. अर्थात, “सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला . . . कामकरी,” बनण्याकरता मेहनत घेण्याची त्याची तयारी नसेल. (ताणतणाव. शारीरिक हार्ट अटॅक येण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे अवास्तव ताणतणाव. त्याचप्रकारे ताणतणाव किंवा “जीवनाच्या चिंता” आध्यात्मिक हृदयाकरताही मरणप्राय ठरू शकतात, यांमुळे एक व्यक्ती देवाची सेवा करण्याचे पूर्णपणे सोडून देण्याचीही शक्यता आहे. यासंदर्भात येशूने दिलेला इशारा अगदी समर्पक आहे: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल.” (लूक २१:३४, ३५) तसेच, एखाद्या गुप्त पापाविषयी जर बराच काळ आपण मनातल्या मनात कुढत राहिलो तर यामुळेही आपल्या लाक्षणिक हृदयावर ताण येऊ शकतो. अशा या घातक तणावामुळे निर्माण होणारे दुःख किती घातक ठरू शकते हे राजा दाविदाने स्वतः अनुभवले होते; त्याने म्हटले: “माझ्या पापामुळे माझ्या अस्थीत स्वस्थता नाही; कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत; जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत.”—स्तोत्र ३८:३, ४.
फाजील आत्मविश्वास. हार्ट अटॅक आलेल्या बऱ्याच जणांना अटॅक येण्यापूर्वी आपल्या आरोग्याविषयी पूर्ण खात्री होती. तपासणी करण्याविषयी किंवा वैद्यकीय चाचण्या १ करिंथकर १०:१२; नीतिसूत्रे २८:१४.
घेण्याविषयी उल्लेख केल्यास कदाचित ते टाळाटाळ करत असतील किंवा याची काही गरज नाही असे म्हणून हा विषय हसण्यावारी नेत असतील. त्याचप्रकारे काहीजणांना असा ग्रह असतो की ते बऱ्याच काळापासून ख्रिस्ती असल्यामुळे त्यांना काही होऊ शकत नाही. कदाचित प्रत्यक्ष धोका संभवेपर्यंत ते स्वतःची आध्यात्मिक तपासणी करण्याविषयी किंवा आत्मपरीक्षण करण्याविषयी टाळाटाळ करत असतील. अशाप्रकारे फाजील आत्मविश्वास बाळगण्यासंबंधी प्रेषित पौलाने दिलेला उत्तम सल्ला नेहमी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते, त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” आपण मुळात अपरिपूर्ण आहोत हे कबूल करून वेळोवेळी स्वतःचे आध्यात्मिक परीक्षण करण्यातच सुज्ञता आहे.—धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका
बायबलमध्ये, लाक्षणिक हृदयाच्या स्थितीला दिलेले महत्त्व काही उगाच देण्यात आलेले नाही. यिर्मया १७:९, १० येथे आपण वाचतो: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखितो.” पण आपले हृदय चाळण्याव्यतिरिक्त, यहोवा आपल्याला आत्मपरीक्षण करण्याकरता प्रेमळपणे साहाय्य देखील पुरवतो.
‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने आपल्याला समयोचित फेरसूचना दिल्या जातात. (मत्तय २४:४५) उदाहरणार्थ, आपली फसवणूक करण्यासाठी आपले लाक्षणिक हृदय खासकरून आपल्याला जगिक कल्पनांच्या विश्वात रमण्यास प्रवृत्त करण्याची शक्यता आहे. या अवास्तविक कल्पना, दिवास्वप्न, निरुद्योगी मनाचे मांडे असतात. अशा कल्पना खासकरून अशुद्ध विचार जागृत करत असल्यास त्या मनात घोळवणे अतिशय हानीकारक ठरू शकते. म्हणून, अशा विचारांना आपण मुळीच थारा देऊ नये. येशूप्रमाणे जर आपल्यालाही स्वैराचाराचा वीट असेल तर आपण अशा जगिक दिवास्वप्नांत रमण्यापासून आपल्या हृदयाचे रक्षण करू.—इब्री लोकांस १:८, ९.
तसेच, आपल्याला ख्रिस्ती मंडळीतील प्रेमळ वडिलांची मदत उपलब्ध आहे. इतरजणांनी साहाय्य केल्यास ते निश्चितच मोलाचे ठरेल पण लाक्षणिक हृदयाची काळजी घेण्याची जबाबदारी ज्याची त्याची आहे. ‘सर्व गोष्टींची पारख करण्याची’ आणि ‘आपण विश्वासात आहो किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करण्याची’ जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे.—१ थेस्सलनीकाकर ५:२१; २ करिंथकर १३:५.
हृदयाचे रक्षण करा
“माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल,” हे बायबलमधील तत्त्व आपल्या लाक्षणिक हृदयाच्या आरोग्यासंदर्भातही समर्पक आहे. (गलतीकर ६:७) एखादी व्यक्ती अध्यात्मिक हृदयरोगाला बळी पडते तेव्हा हे अचानक घडले असेच सहसा भासते; पण मुळात यामागे, बऱ्याच काळापासून गुप्तपणे अपायकारक गोष्टी आचरण्याची पार्श्वभूमी असते; उदाहरणार्थ, अश्लील चित्रे पाहणे, भौतिक गोष्टी मिळवण्याची फाजील ऊर्मी असणे किंवा प्रतिष्ठा व सत्ता मिळवण्याचा ध्यास घेणे.
तेव्हा, हृदयाचे रक्षण करण्यासाठी आपल्या आध्यात्मिक आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. देवाच्या वचनातील विचार ग्रहण करण्याद्वारे आपल्या मनाला व हृदयाला सकस पोषण पुरवा. आजच्या जगात मुबलक असलेले आणि दैहिक वासनांना अतिशय मोहक वाटणारे, पण जे लाक्षणिक हृदयाला दिवसेंदिवस असंवेदनशील बनवतात असे मानसिकरित्या निकस खाद्यपदार्थ प्रकर्षाने टाळा. स्तोत्रकर्ता अतिशय सुयोग्य आणि वैद्यकीयरित्या अचूक रूपक वापरून आपल्याला असा इशारा देतो: “त्यांचे हृदय मेदासारखे असंवेदनशील बनले आहे.”—स्तोत्र ११९:७०, NW.
जर आपण गुप्तपणे काही चुकीचे आचरण करत असू, तर ही गुप्त पातके समूळ काढून टाकण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला पाहिजे; अन्यथा ती आपल्या लाक्षणिक रक्तवाहिन्यांत अडथळा निर्माण करतील. जर जगिक गोष्टी आपल्याला आकर्षक वाटू लागल्या असतील किंवा मौजमजा, करमणूक यासंदर्भात जगात किती काही अनुभवण्यासारखे आहे असे वाटू लागल्यास आपण प्रेषित पौलाने दिलेल्या सुज्ञ सल्ल्यावर मनन केले पाहिजे. त्याने लिहिले: “बंधुजनहो, मी १ करिंथकर ७:२९-३१) आणि जर भौतिक धनसंपत्तीची आपल्याला ओढ वाटू लागली असेल तर ईयोबाच्या शब्दांकडे लक्ष द्या: “जर मी सुवर्णावर भरंवसा ठेविला असता, तुजवर माझी भिस्त आहे असे सुवर्णास म्हटले असते, तर हाहि न्यायाधीशापुढे नेण्याजोगा गुन्हा झाला असता; अशाने ऊर्ध्वलोकीच्या देवाशी मी दगा केला असे झाले असते.”—ईयोब ३१:२४, २८; स्तोत्र ६२:१०; १ तीमथ्य ६:९, १०.
हेच म्हणतो की, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, ह्यासाठी की, . . . जे ह्या जगाचा उपयोग करितात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे; कारण ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे.” (बायबलवर आधारित असलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे किती गंभीर आहे यासंदर्भात बायबल अशी ताकीद देते: “पुष्कळदा वाग्दंड झाला असूनहि जो आपली मान ताठ करितो, त्याचा अचानक चुरडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही.” (नीतिसूत्रे २९:१) पण दुसरीकडे पाहता, जर आपण आपल्या लाक्षणिक हृदयाची चांगली काळजी घेतली तर साधे व सुव्यवस्थित जीवन जगल्यामुळे प्राप्त होणारे सूख आणि मनःशांती आपण अनुभवू शकतो. हाच जीवनाचा सर्वोत्तम मार्ग असल्याची, खरा ख्रिस्ती धर्म पूर्वीपासूनच शिफारस करत आला आहे. प्रेषित पौलाने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “चित्तसमाधानासह भक्ति हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.”—१ तीमथ्य ६:६-८.
होय, देवाच्या सुभक्तीच्या मार्गात चालण्याचा सराव व व्यायाम करण्याद्वारे आपले लाक्षणिक हृदय निरोगी व मजबूत राहील. आपल्या आध्यात्मिक आहारावर लक्ष ठेवल्यामुळे आपोआपच आपण या जगाच्या विनाशकारक मार्गांना आणि विचारसरणीला थारा देणार नाही; यामुळे आपल्या आध्यात्मिक आरोग्याचे सर्व प्रकारच्या अपायकारक व हानीकारक गोष्टींपासून संरक्षण होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवाच्या संघटनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या त्याच्या तरतुदींचा स्वीकार करण्याद्वारे आपण नियमितपणे आपल्या लाक्षणिक हृदयाची तपासणी करून घेतली पाहिजे. असे नेमाने केल्यास आध्यात्मिक हार्ट अटॅकमुळे होणारे दुःखद परिणाम टाळण्यास आपल्याला बरीच मदत मिळेल.
[तळटीप]
^ अधिक माहितीकरता कृपया यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित सावध राहा! नियतकालिकाच्या जानेवारी १, १९९७ अंकातील “हृदयविकाराचा झटका—यावरील उपाय?” ही लेखमालिका पाहा.
[१० पानांवरील संक्षिप्त आशय]
अपुऱ्या आहारामुळे ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या कठीण होऊन शारीरिक हृदयाला नुकसान होऊ शकते त्याचप्रमाणे, अयोग्य आध्यात्मिक आहारामुळे लाक्षणिक हृदय निकामी होऊ शकते
[१० पानांवरील संक्षिप्त आशय]
आध्यात्मिक अर्थाने बैठ्या जीवनशैलीमुळे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागू शकतात
[११ पानांवरील संक्षिप्त आशय]
‘जीवनाच्या चिंता’ लाक्षणिक हृदयाकरता सहजप मरणप्राय ठरू शकतात
[११ पानांवरील चित्र]
आध्यात्मिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक व्याधी जडू शकतात
[१३ पानांवरील चित्रे]
उत्तम आध्यात्मिक सवयी लावून आपण लाक्षणिक हृदयाचे रक्षण करू शकतो
[९ पानांवरील चित्राचे श्रेय]
AP Photo/David Longstreath