व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“अश्रू गाळणारा” वृक्ष आणि त्याचे बहुपयोगी “अश्रू”

“अश्रू गाळणारा” वृक्ष आणि त्याचे बहुपयोगी “अश्रू”

“अश्रू गाळणारा” वृक्ष आणि त्याचे बहुपयोगी “अश्रू”

“जखमेसाठी मलम” घे असे यिर्मया ५१:८ म्हणते. जखमेचे दुखणे लगेच शमविण्याचा व जखम बरी करण्याचा गुणधर्म असलेल्या या विशेष मलमाचा उगम नेमका कोठून होतो याचा शोध लावताना आपण थेट इजीअन समुद्रातील कायऑस बेटावर येतो.

उन्हाळ्याच्या सुरवातीला, कायऑसमधील शेतकरी एका आगळ्यावेगळ्या प्रकारच्या कापणीच्या तयारीला लागतात. हे शेतकरी, रुमा मस्तकी नावाच्या झुडूपसदृश्‍य सदापर्णी वृक्षाखालची जमीन झाडून साफ केल्यानंतर पांढऱ्‍या मातीने सारवतात. मग, या वृक्षाच्या सालीवर ते उभे चरे पाडतात जेणेकरून त्यातून एकप्रकारचा पदार्थ ‘गळू’ लागतो. फिक्या रंगाचे रेझीनचे “अश्रू” या चऱ्‍यांतून पाझरतात. दोन ते तीन आठवड्यांनंतर जमा झालेले हे रेझीनचे घट्ट झालेले थेंब, शेतकरी थेट वृक्षावरूनच किंवा सारवलेल्या जमिनीवरून गोळा करतात. गोंद मस्तकी म्हटल्या जाणाऱ्‍या या ‘अश्रूंचा’ उपयोग मलम बनवण्यासाठी केला जातो.

परंतु, कापणीच्या कामासाठी धीर आणि परीश्रम यांची अत्यंत आवश्‍यकता आहे. राखट रंगाच्या या पीळदार वृक्षाच्या फांद्यांची वाढ अतिशय मंद गतीने होत असते. साधारण दोन ते तीन मीटर उंची असलेल्या या वृक्षाची पूर्ण वाढ व्हायला ४० ते ५० वर्ष लागतात.

या वृक्षाच्या फांद्या कापणे व “अश्रू” गोळा करणे इतकेच काम यात नाही तर मस्तकी बनवण्यासाठी आणखी कामही असते. मस्तकीचे “अश्रू” गोळा केल्यानंतर ते निवडले जातात, धुतले जातात व आकार आणि दर्जा याप्रमाणे वेगळे केले जातात. नंतर, मस्तकीचे आणखीन शुद्धीकरण केल्यावर ती बहुपयोगासाठी तयार होते.

अमूल्य वृक्षाचा इतिहास

“मस्तकी” यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा, “दात खाणे” असा अर्थ असलेल्या संज्ञेशी संबंध आहे. या शब्दावरून असे सूचित होत असावे, की प्राचीन काळापासून मस्तकी रेझीनचा उपयोग मुखशुद्धीसाठी चुईंगम म्हणून केला गेला असावा.

मस्तकीविषयीचा सर्वात प्राचीन उल्लेख सा.यु.पू. पाचव्या शतकातील ग्रीक इतिहासकार हेरोडिटस याने केलेला आढळतो. इतर प्राचीन लेखक आणि वैद्य तसेच अपोल्लोडोरस, डायसकोरडीझ, थिओस्कोरीथीस आणि हिपोक्रेट्‌स यांनीसुद्धा मस्तकीच्या औषधीय उपयोगाचा उल्लेख केला. मस्तकीचे वृक्ष भूमध्य समुद्राच्या किनाऱ्‍यालगत वाढत असले तरी, सा.यु. ५० पासून फक्‍त कायऑसमध्येच मस्तकीचे उत्पादन केले जाते. कायऑसवर विजय मिळवणाऱ्‍या रोमनांपासून जिनोई, ओटोमनांपर्यंत सर्वांना, खरे तर मस्तकी मिळवण्याचे जास्त आकर्षण होते.

बहुपयोगी मस्तकी

प्राचीन ईजिप्शियन वैद्य, विविध दुखण्यांवर, जुलाब व सांधेदुःखीवर मस्तकीचा उपयोग करीत असत. धूप आणि मृत शरीरांची ममी करण्यासाठीसुद्धा ते मस्तकीचा उपयोग करीत. बायबलमध्ये औषधी गुणधर्मांसाठी, सौंदर्यप्रसाधनांसाठी तसेच मृतदेहाचे जतन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या मसाल्यांच्या बाबतीत उल्लेख करण्यात आलेला ‘गिलादातील मलम’ हा कदाचित मस्तकी वृक्षापासूनच बनवला जात असावा. (यिर्मया ८:२२; ४६:११) असेही म्हटले जाते, की मस्तकी वृक्षाच्या प्रजातीतील एका जातीच्या वृक्षातून स्रावणारा गोडसर सुंगधी चीक, पवित्र वापरापुरताच मर्यादित असलेल्या पवित्र धूपातील एक पदार्थ असू शकतो.—निर्गम ३०:३४, ३५.

हल्ली तैलचित्र, फर्निचर आणि संगीत वाद्य यांच्या संरक्षणासाठी मस्तकीचा उपयोग रोगण म्हणून केला जातो. निरोधन करण्यासाठी व जलरोधक म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो शिवाय कापडांसाठी जो रंग वापरला जातो व कलाकार जो रंग वापरतात त्यासाठीही ते सर्वात उत्तम स्थिरकारी समजले जाते. चिकटवण्यासाठी आणि कातडी कमावण्यासाठी सुद्धा मस्तकीचा उपयोग केला जातो. मस्तकीच्या प्रसन्‍नदायक सुंगधामुळे व इतर गुणधर्मांमुळे, साबण, सौंदर्यप्रसाधने आणि अत्तर यांकरता देखील त्याचा वापर केला जातो.

जगभरात, औषधांच्या २५ अधिकृत याद्यांमध्ये मस्तकीचे वर्णन करण्यात आले आहे. अरब देशांत आजही नेहमी त्याचा पारंपरिक औषधांमध्ये उपयोग केला जातो. दातांत भरण्याच्या लुकणांकरता आणि औषधांच्या कॅप्सुल्सच्या आतील आवरणाकरता मस्तकीचा उपयोग केला जातो.

‘अश्रू गाळणाऱ्‍या’ मस्तकी वृक्षाच्या बहुपयोगी ‘अश्रूंनी’ अनेक शतकांपासून, जखमेचे दुखणे शमविणारा व जखम बरी करणारा मलम म्हणून काम केले आहे. म्हणूनच अगदी उचितपणे यिर्मयाच्या भविष्यवाणीने म्हटले: “जखमेसाठी मलम” घे.

[३१ पानांवरील चित्रे]

कायऑस

मस्तकीची कापणी

मस्तकीचे “अश्रू” अलगदपणे गोळा केले जातात

[चित्राचे श्रेय]

Chios and harvest line art: Courtesy of Korais Library; all others: Kostas Stamoulis