व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खऱ्‍या देवावर तुमचा भरवसा आहे का?

खऱ्‍या देवावर तुमचा भरवसा आहे का?

खऱ्‍या देवावर तुमचा भरवसा आहे का?

अमेरिकन म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीद्वारे नियुक्‍त केलेले एक शोध पथक एका आर्क्टिक प्रदेशाचा अभ्यास करायला रवाना झाले होते. सुमारे सात वर्षांआधी म्हणजे १९०६ साली, रॉबर्ट इ. पीअरी यांनी हा प्रदेश पाहिल्याचे वृत्त दिले होते.

उत्तर अमेरिकेच्या एकदम वायव्येकडे असलेल्या केप कोल्गेट येथून पीअरी यांना एका दूर देशात पांढरी शिखरे असल्यासारखी दिसली होती. त्यांनी त्या ठिकाणाला क्रॉकर प्रदेश असे नाव दिले—त्यांना अर्थसाहाय्य देणाऱ्‍या एकाचे ते नाव होते. या ठिकाणाचा सुगावा लावण्यासाठी रवाना झालेल्या शोध पथकाला डोंगर-दऱ्‍या व बर्फाच्छादित शिखरांच्या प्रदेशाची एक झलक दिसली तेव्हा त्यांना केवढा आनंद झाला असेल! पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की, तो केवळ आर्क्टिकचा आभास होता. वातावरणामुळे संभावणाऱ्‍या या आभासाने पहिल्यांदा पीअरी फसले होते आणि आता त्यांनीसुद्धा अशा एका प्रदेशाच्या शोधात पुष्कळ वेळ, पैसा आणि शक्‍ती खर्च केली होती जो मुळात खरा नव्हताच.

आज, अनेक लोक त्यांना खऱ्‍या वाटत असलेल्या देवी-देवतांची भक्‍ती करतात, त्यांच्यामागे वेळ खर्च करतात. येशूच्या प्रेषितांच्या दिवसांमध्ये, ज्यूपितर आणि मर्क्युरीसारख्या देवतांची उपासना केली जात होती. (प्रेषितांची कृत्ये १४:११, १२) आज, शिंटो, हिंदू व इतर धर्मांमध्ये कोट्यवधी देवी-देवतांची पूजा केली जाते. बायबल म्हणते की, ‘अशी बरीच दैवते व बरेच प्रभू आहेत.’ (१ करिंथकर ८:५, ६) हे सर्व देवी-देवता खरे असू शकतात का?

‘वाचवू न शकणारे’ देव

उपासनेसाठी प्रतिमांच्या किंवा प्रतिकांच्या उपयोगाचे एक उदाहरण आपण घेऊ या. मूर्तींवर भरवसा ठेवणाऱ्‍यांना किंवा प्रार्थनेसाठी त्यांचा उपयोग करणाऱ्‍यांना वाटते की या मूर्तींजवळ अलौकिक शक्‍ती आहे व त्या लोकांना वरदान देऊ शकतात अथवा संकटांपासून त्यांचे रक्षण करू शकतात. पण त्या खरोखर वाचवू शकतात का? अशा वस्तूंबद्दल स्तोत्रकर्त्याने काव्यरूपात म्हटले: “राष्ट्रांच्या मूर्ति केवळ सोनेरुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृति आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; आणि त्यांच्या मुखात मुळीच श्‍वास नाही.” खरोखर, ते ‘वाचवू न शकणारे’ देव आहेत.—स्तोत्र १३५:१५-१७; यशया ४५:२०, ईजी-टू-रीड व्हर्शन.

मूर्तीकार आपली हस्तकला जिवंत व शक्‍तिशाली आहे असे म्हणतील. तसेच मूर्तींची पूजा करणारे त्यांच्यावर भरवसा ठेवतील. संदेष्टा यशया म्हणाला, “ते [मूर्तीला] उचलून खांद्यावर घेतात, त्याला नेऊन त्याच्या स्थानी स्थापितात.” तो पुढे म्हणाला, “तेथे तो उभा असतो, आपल्या स्थानावरून हालत नाही; त्याचा धावा केल्यास तो येत नाही, त्यांस संकटातून तारीत नाही.” (यशया ४६:७) सत्य हेच आहे की, भक्‍त कितीही श्रद्धेने मूर्तीची उपासना करत असला तरीही ती निर्जीवच राहते. अशा कोरीव आणि ओतीव मूर्ती ‘काही लाभाच्या नाहीत.’—हबक्कूक २:१८.

करमणुकीच्या आणि खेळ-क्रीडेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना तसेच राजकीय व धार्मिक नेत्यांना देव मानणे, त्यांची पूजा करणे किंवा त्यांचे अवास्तव कौतुक करणे हीसुद्धा आज एक सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. शिवाय, पैसा हा अनेकांचा देव आहे. पण या सर्व मूर्तींना, वास्तवात नसलेले स्थान देण्यात आले आहे. आपल्या भक्‍तांच्या आशा ते पुरवत नाहीत आणि पुरवू शकतही नाहीत. उदाहरणार्थ, पैसा अनेक समस्यांवरील उपाय आहे असे वाटते परंतु धनसंपत्तीची शक्‍ती फसवी आहे. (मार्क ४:१९) एका संशोधकाने असा प्रश्‍न केला: “पुष्कळांना इच्छित असलेली व सर्व समस्यांवरील उपाय मानलेली गोष्ट मिळवल्यावरसुद्धा, निराशेपासून मानसिक आघातापर्यंतचे परिणाम घडावेत याचे कारण काय?” होय, धनसंपत्तीच्या मागे लागलेल्या व्यक्‍तीला चांगले आरोग्य, समाधानकारक कौटुंबिक जीवन, मैत्रीचे बंध किंवा निर्माणकर्त्यासोबतचा मौल्यवान नातेसंबंध अशा महत्त्वाच्या गोष्टींचा त्याग करावा लागेल. त्याचा देव म्हणजे एक ‘निरर्थक मूर्ती’ ठरते!—योना २:८.

“कोणी उत्तर दिले नाही”

जे खरे नाही त्याला खरे मानणे मूर्खपणाचे आहे. एलीया संदेष्ट्याच्या दिवसांतील बआल दैवताच्या उपासकांना कठीण अनुभवातून हा धडा शिकायला मिळाला. स्वर्गातून अग्नी पाठवून अर्पण केलेला पशू गिळंकृत करण्याची शक्‍ती बआलमध्ये आहे असा त्यांचा ठाम विश्‍वास होता. ते तर, “सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत . . . बआलाचे नाव घेत व हे बआला, आमचे ऐक, असे म्हणत राहिले”! पण बआलला ऐकायला कान आणि बोलायला तोंड होते का? त्या वृत्तान्तात पुढे म्हटले आहे: “पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही.” कोणीही “लक्ष पुरविले नाही.” (१ राजे १८:२६, २९) बआल खरा, जिवंत किंवा सक्रिय देव नव्हता.

तेव्हा जो देव खरा आहे त्याला ओळखून त्याची उपासना करणे किती महत्त्वाचे आहे! पण तो कोण आहे? आणि त्याच्यावर भरवसा ठेवल्याने आपल्याला काय लाभ होणार?

[३ पानांवरील चित्रे]

प्रदेश शोधण्यासाठी क्षितिज न्याहाळताना पीअरीचा साथीदार इगीन्या

रॉबर्ट ई. पीअरी

[चित्राचे श्रेय]

Egingwah: From the book The North Pole: Its Discovery in १९०९ Under the Auspices of the Peary Arctic Club, १९१०; Robert E. Peary: NOAA

[४ पानांवरील चित्रे]

या जगात पूज्य मानल्या जाणाऱ्‍या गोष्टींमुळे अनेकजण फसले आहेत