व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गौप्यस्फोट करण्याचा समय

गौप्यस्फोट करण्याचा समय

गौप्यस्फोट करण्याचा समय

काही गोष्टींबाबत गोपनीयता बाळगण्यावर, शांती किंवा अशांती अवलंबून असते. परंतु गौप्यस्फोट करण्याचा समय असू शकतो का? संदेष्टा आमोस, आपल्या देवाविषयी काय म्हणतो ते पाहा: “परमेश्‍वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.” (आमोस ३:७) या शब्दांवरून आपण, गोपनीयतेविषयी काहीतरी शिकू शकतो. यहोवा काही विशिष्ट गोष्टी काही समयापर्यंत गोपनीय ठेवून मग फक्‍त ठराविक लोकांनाच त्या प्रकट करील. याबाबतीत आपण यहोवाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?

कधीकधी, ख्रिस्ती मंडळीतील नियुक्‍त मेंढपाळांना विशिष्ट गोष्ट गोपनीय ठेवणे लाभदायक वाटते. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) जसे की, मंडळीचे हित लक्षात ठेवून ते काही योजनांबद्दलचा तपशील किंवा मंडळीतील जबाबदारींमध्ये झालेला फेरफार विशिष्ट काळापर्यंत गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतील.

पण अशा वेळी, यांत समाविष्ट असलेल्या सर्वांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे, की अमुक गोष्ट जर गोपनीय ठेवण्यात आली आहे तर ती केव्हा आणि कशाप्रकारे सर्वांना सांगितली जाईल. एखादी गोष्ट सर्वांना केव्हा सांगितली जाणार आहे हे त्यांना माहीत झाल्यावर, गोपनीयता बाळगण्यास त्यांना सोपे जाऊ शकते.—नीतिसूत्रे २५:९.