दुष्काळासाठी मदत रवाना!
दुष्काळासाठी मदत रवाना!
‘कसल्या प्रकारचा दुष्काळ?’ तुम्ही विचाराल. हा आध्यात्मिक अन्नाचा दुष्काळ आहे! एका प्राचीन इब्री संदेष्ट्याने या दुष्काळाविषयी भाकीत केले होते: “प्रभु परमेश्वर म्हणतो, ‘पाहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन; तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबधीचा होईल.’” (आमोस ८:११) आध्यात्मिक अर्थाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी न्यूयॉर्क पॅटरसन येथील वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या ११२ व्या वर्गाचे ४८ सदस्य, ५ खंडांतील १९ विविध देशांमध्ये आणि समुद्राच्या द्वीपांवर चालले आहेत.
खरोखरचे मांस व अन्नधान्य घेऊन नव्हे तर ज्ञान, अनुभव व प्रशिक्षण घेऊन ते आपापली कामगिरी पार पाडायला चालले आहेत. विदेशी क्षेत्रात मिशनरी सेवेसाठी त्यांचा विश्वास पक्का करण्यासाठी त्यांनी पाच महिने बायबलचा कसून अभ्यास केला. मार्च ९, २००२ रोजी, एकत्र जमलेल्या ५,५५४ लोकांनी, पदवीदानाचा कार्यक्रम आनंदाने ऐकला.
यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य बंधू स्टिफन लेट यांनी अगदी उत्साहाने कार्यक्रमाचा आरंभ केला. जगाच्या विविध भागांतून भेट देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे त्यांनी मनःपूर्वक स्वागत केले. मग, त्यांनी “तुम्ही जगाचा प्रकाश आहा” हे येशूचे शब्द भावी मिशनऱ्यांना कसे लागू होतात त्याविषयी सांगितले. (मत्तय ५:१४) ते म्हणाले: ‘तुमच्या नेमणुकीत तुम्ही, यहोवाच्या विविध अद्भुत कृत्यांवर ‘प्रकाश टाकाल;’ यामुळे, नम्र अंतःकरणाच्या लोकांना यहोवाचे आणि त्याच्या उद्देशांचे सौंदर्य पाहता येईल.’ खोटे सिद्धान्त उजेडात आणण्यासाठी व सत्य शोधणाऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी देवाच्या वचनातील प्रकाशाचा उपयोग करण्याचे उत्तेजन बंधू लेट यांनी मिशनऱ्यांना दिले.
योग्य मनोवृत्ती यशाची गुरूकिल्ली
अध्यक्षांच्या सुरवातीच्या भाषणानंतर, संयुक्त संस्थानाच्या शाखा समितीचे सदस्य, बाल्टासर पर्ला यांनी यशस्वी मिशनरी होण्याकरता पदवीधरांना सहायक ठरतील अशा भाषणांच्या एका मालिकेतील पहिले भाषण दिले. त्यांनी, ‘हिंमत बांधा, धैर्य धरा आणि हे कार्य करा’ या विषयावर भाषण दिले. (१ इतिहास २८:२०) प्राचीन इस्राएलच्या राजा शलमोनाला एक अवघड कामगिरी मिळाली जी त्याने पूर्वी कधी केली नव्हती—जेरुसलेममध्ये एक मंदिर बांधायची कामगिरी. शलमोनाने कार्य केले आणि यहोवाच्या साहाय्याने मंदिर बांधून पूर्ण झाले. हा धडा वर्गाला लागू करत बंधू पर्ला म्हणाले: ‘तुम्हाला एक नवीन कामगिरी मिळाली आहे; मिशनरी कार्य करण्याची कामगिरी. यासाठी तुम्हाला धैर्यशील आणि भक्कम असण्याची गरज आहे.’ जोपर्यंत आपण यहोवाच्या समीप राहू तोपर्यंत तो आपल्याला सोडणार नाही, या सल्ल्यातून विद्यार्थ्यांना सांत्वन मिळाले. ‘मिशनरी या नात्याने तुम्ही पुष्कळ साध्य करू शकता. मिशनऱ्यांनीच माझ्या कुटुंबापर्यंत आणि माझ्यापर्यंत सत्य आणले होते,’ अशाप्रकारे बंधू पर्ला यांनी आपला अनुभव सांगून श्रोत्यांना उत्तेजन दिले!
नियमन मंडळाचे आणखी एक सदस्य, सॅम्युएल हर्ड यांनी दिलेल्या भाषणाचा विषय होता, “यशासाठी यहोवाकडे पाहा.” मिशनरी कार्य प्रेषितांची कृत्ये २०:३५) इतरांसाठी ‘स्वतःला अर्पण’ करण्याच्या अनेक संधी मिशनऱ्यांना मिळतील.—फिलिप्पैकर २:१७.
स्वीकारून विद्यार्थ्यांनी एक करिअर निवडले आहे आणि त्यांचे यश यहोवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावर अवलंबून आहे. आणि यहोवाबरोबर त्यांनी जो नातेसंबंध स्थापित केला होता त्याच्या आधारावरच त्यांना यश मिळणार आहे. बंधू हर्ड यांनी असे उत्तेजन दिले: ‘गिलियड येथील अभ्यासांद्वारे तुम्ही बायबलचे बरेच ज्ञान संपादन केले आहे. आतापर्यंत तुम्ही आनंदाने ज्ञान घेत राहिला; परंतु, आता यशस्वी होण्यासाठी तुम्ही, शिकलेले ज्ञान इतरांना द्यायला सुरवात केली पाहिजे.’ (प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणता निरोपवजा सल्ला दिला? बंधू मार्क न्यूमर यांनी रूथ ३:१८ या वचनाच्या आधारावर, ‘या गोष्टीचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत स्वस्थ राहा,’ हा आपल्या भाषणाचा विषय निवडला होता. नामी आणि रूथच्या उदाहरणाद्वारे त्यांनी पदवीधारकांना, यहोवाच्या पार्थिव संघटनेने ठरवलेल्या सर्व योजनांवर भरवसा ठेवण्याचे तसेच ईश्वरशासित अधिकाराचा आदर करण्याचे उत्तेजन दिले. विद्यार्थ्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करील अशाप्रकारे बंधू न्यूमर म्हणाले: ‘कधीकधी, तुमच्यावर परिणाम होईल अशाप्रकारचा निर्णय का घेण्यात आला, हे तुम्हाला समजणार नाही किंवा अमुक गोष्ट वेगळ्या पद्धतीने व्हायला हवी होती असे तुम्हाला अगदी तीव्रपणे वाटेल. अशावेळी तुम्ही काय कराल? तुम्हाला बरोबर वाटते त्याप्रमाणे तुम्ही स्वतःहून कार्य कराल की उचित समयी यहोवा आपल्या कल्याणासाठी कार्य करेल असा विश्वास बाळगून त्याच्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवून “स्वस्थ” राहाल?’ (रोमकर ८:२८) ‘देव राज्याच्या कार्याच्या वाढीवर लक्ष केंद्रित करा, लोकांकडे पाहण्याऐवजी यहोवाची संघटना काय करत आहे यावर लक्ष ठेवा,’ हा सल्ला भावी मिशनऱ्यांना त्यांच्या विदेशी नेमणुकांमध्ये निश्चितच मोलाचा ठरेल.
आधी मिशनरी असलेले व आता गिलियड प्रशिक्षक म्हणून कार्य करणारे बंधू वॉलस लिव्हरन्स यांनी भाषणांच्या मालिकेतील शेवटले भाषण दिले. “लक्ष केंद्रित ठेवून देवाच्या सेवेत टिकून राहा,” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. बॅबिलोनचे पतन होताना पाहून व यिर्मयाने जे भाकीत केले होते त्यावरून संदेष्टा दानीएलाने ओळखले होते, की इस्राएलच्या लोकांची बंदिवासातून फार लवकर सुटका होणार होती. (यिर्मया २५:११; दानीएल ९:२) दानीएलाला यहोवाच्या वेळापत्रकाची जाणीव असल्यामुळेच त्याला देवाच्या उद्देशांच्या पूर्णतेवर आपले लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळाली. पण इस्राएली लोकांची मनोवृत्ती याच्या अगदी उलट होती; हाग्गय संदेष्ट्याच्या काळातील इस्राएली लोक म्हणाले: “वेळ अजून आली नाही.” (हाग्गय १:२) आपण कोणत्या काळात राहात आहोत याचे गांभीर्य त्यांनी लक्षात घेतले नाही; ते आपल्याच धुंदीत, आपलेच स्वार्थ पुरवण्यात गुंग झाले होते आणि त्यांना ज्या कामासाठी म्हणजे मंदिराचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी त्यांना बॅबिलोनमधून सोडवण्यात आले होते, ते काम त्यांनी बाजूला सारले. बंधू लिव्हरन्स शेवटी म्हणाले: “त्यामुळे, यहोवाचा उद्देश सतत मनात बाळगून आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका.”
गिलियडचे आणखी एक प्रशिक्षक बंधू लॉरेन्स बावन यांनी, “सजीव वचनाचा उपयोग करणाऱ्यांना यहोवा आशीर्वादित करतो,” असा विषय असलेला भाग हाताळला. (इब्री लोकांस ४:१२) या भागात, वर्गातील अनेकांनी क्षेत्र सेवेतील आपले अनुभव सांगितले; या सर्व अनुभवांतून, प्रचार करताना व शिकवताना बायबलचा उपयोग करणाऱ्यांना यहोवा कसे आशीर्वादित करतो ही गोष्ट ठळकपणे जाणवली. येशू ख्रिस्ताने देवाच्या सर्व सेवकांसाठी एक उत्तम उदाहरण मांडले याकडे त्यांनी लक्ष वेधले; त्यामुळेच, ‘येशू अगदी खात्रीने म्हणू शकत होता, की तो जे काही शिकवत होता ते त्याच्या मनचे नव्हे तर देवाच्या वचनातून होते.’ प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांनी सत्य ओळखले आणि त्यांनी लगेच त्याचा स्वीकार केला. (योहान ७:१६, १७) आजही हे खरे ठरते.
गिलियड प्रशिक्षण प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज करते
नंतर, खूप वर्षांपासून बेथेलचे सदस्य असलेले बंधू रिचर्ड एब्रहॅमसन आणि पॅट्रिक लाफ्रॅन्क यांनी, सहा गिलियड पदवीधारकांची मुलाखत घेतली जे सध्याला विविध प्रकारच्या खास पूर्ण वेळची सेवा करत आहेत. या सहाही पदवीधारकांना गिलियडमधील प्रशिक्षण घेऊन अनेक वर्षे झालेली असली, व सध्या ते वेगळी नेमणूक पार पाडत असले तरी, बायबल अभ्यास, संशोधनाचे प्रकल्प आणि लोकांबरोबर कसे वागायचे याबाबतीत गिलियडमध्ये त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाचा ते अजूनही उपयोग करत आहेत, हे त्यांच्या तोंडून ऐकल्यामुळे ११२ व्या वर्गाच्या पदवीधारकांना खूप उत्तेजन मिळाले.
नियमन मंडळाचे आणखी एक सदस्य, बंधू थिओडोर जॅरस यांनी कार्यक्रमाचे मुख्य भाषण दिले. “सैतानाकडून होणारा द्वेष सहन केल्याने काय साध्य होते” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. गेले पाच महिने, गिलियड विद्यार्थी एका प्रेमळ व ईश्वरशासित वातावरणात राहात होते. परंतु, त्यांच्या वर्गातील अभ्यासात सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण शत्रूच्या जगात राहात आहोत. संपूर्ण जगभरात यहोवाच्या लोकांवर हल्ला होत आहे. (मत्तय २४:९) बायबलमधील अनेक अहवालांचा उपयोग करून बंधू जॅरस यांनी दाखवून दिले की ‘आपण दियाबलाचे खास लक्ष्य आहोत. त्यामुळे यहोवाबरोबर आपण आपला नातेसंबंध आणखी मजबूत केला पाहिजे व येणाऱ्या परिक्षांना धैर्याने तोंड दिले पाहिजे.’ (ईयोब १:८; दानीएल ६:४; योहान १५:२०; प्रकटीकरण १२:१२, १७) बंधू जॅरस शेवटी म्हणाले, की देवाच्या लोकांचा द्वेष होत असला तरी, यशया ५४:१७ नुसार, ‘आपल्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार यशस्वी करणार नाही. यहोवा आपल्या नियोजित वेळी व मार्गाने आपल्या लोकांना सोडवील.’
पूर्णपणे “सज्ज” झालेले गिलियडच्या ११२ व्या वर्गाचे हे पदवीधर, त्यांना सेवा करण्यासाठी जेथे पाठवले जाईल त्या देशातील आध्यात्मिक दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी नक्कीच कार्य करतील. (२ तीमथ्य ३:१६, १७) तेथील लोकांना त्यांनी, पौष्टिक आध्यात्मिक अन्नाचे कशाप्रकारे वाटप केले याविषयीच्या वृत्तांची आपण आतुरतेने वाट पाहूया.
[२३ पानांवरील चौकट]
वर्गाची आकडेवारी
विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ६
नेमलेले देश: १९
एकूण विद्यार्थी: ४८
सरासरी वय: ३३.२
सत्यात सरासरी वर्षे: १५.७
पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १२.२
[२४ पानांवरील चित्र]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा ११२ वा पदवीधर वर्ग
खालील यादीत, ओळींना पुढून मागे अशा रितीने क्रमांक देण्यात आला आहे आणि नावे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देण्यात आली आहेत.
(१) पॅरोट, एम.; हुकर, ई.; आनाया, आर.; रेनॉल्ड्स, जे.; जेझवॉल्डी, के.; गोन्झालेझ, जे. (२) रॉबिन्सन, सी.; फिलिप्स, बी.; मेडमेन्ट, के.; मूर, आय.; नोक्स, जे.; बार्नेट, एस. (३) स्टायर्स, टी.; पामर, बी.; यांग, सी.; ग्रुटह्यूस, एस.; ग्रोप, टी.; बॉक, सी. (४) आनाया, आर.; सूकरेफ, इ.; स्टुअर्ट, के.; सिमोझरॅग, एन.; सिमोटल, सी.; बॉक, इ. (५) स्टुअर्ट, आर.; यांग, एच.; गिलफेदर, ए.; हॅरिस, आर.; बार्नेट, डी.; पॅरोट, एस. (६) मेडमेन्ट, ए.; मूर, जे.; ग्रुटह्यूस, सी.; गिलफेदर, सी.; नोक्स, एस.; स्टायर्स, टी. (७) जेझवॉल्डी, डी.; ग्रोप, टी.; सूकरेफ, बी.; पामर, जी.; फिलिप्स, एन.; सिमोटल, जे. (८) हॅरिस, एस.; हुकर, पी.; गोन्झालेझ, जे.; सिमोझरॅग, डी.; रेनॉल्ड्स, डी.; रॉबिन्सन, एम.