यहोवा आपल्या लोकांना प्रकाश देऊन शोभायमान करतो
यहोवा आपल्या लोकांना प्रकाश देऊन शोभायमान करतो
“[“हे स्त्री,” NW] ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुजकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुजवर उदय पावले आहे.”—यशया ६०:१.
१, २. (अ) मनुष्यजातीची काय स्थिती आहे? (ब) मानवजातीला वेढणाऱ्या अंधकाराला कोण कारणीभूत आहेत?
“आज एखादा यशया किंवा संत पौल असता तर!” १९४० च्या दशकात अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी हे खेदजनक उद्गार काढले. पण त्यांनी असे का म्हटले? कारण त्यांच्या काळात जगाला सर्वात उच्च कोटीच्या नैतिक मार्गदर्शकांची गरज असल्याचे त्यांना जाणवले. त्या काळात मानवजात २० व्या शतकातील सर्वात काळोख्या अवधीतून, अर्थात दुसऱ्या महायुद्धातून गेली होती. युद्ध समाप्त झाले होते, पण जगात अद्यापही शांती नव्हती. सर्वत्र अंधकाराचे राज्य होते. किंबहुना, युद्ध संपून आता ५७ वर्षे झाली तरीही जग अद्यापही अंधकारात बुडालेले आहे. आज अध्यक्ष ट्रूमन हयात असते तर यशया किंवा प्रेषित पौलाच्या दर्जाच्या नैतिक मार्गदर्शकांची आजही मानव समाजाला गरज असल्याचे त्यांनी नक्कीच ओळखले असते.
२ अध्यक्ष ट्रूमन यांना याची कल्पना होती किंवा नव्हती हे आपण सांगू शकत नाही, पण पौलाने मनुष्यजातीवर असलेल्या अंधकाराच्या साम्राज्याविषयी उल्लेख केला होता आणि त्याने आपल्या लिखाणांत याविषयी इशारा देखील दिला होता. उदाहरणार्थ, त्याने सहविश्वासू बांधवांना अशी ताकीद दिली: “कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर ६:१२) यावरून पौलाने दाखवून दिले की जगातील आध्यात्मिक काळोखाची तर त्याला जाणीव होतीच पण हा अंधकार का आहे याचीही त्याला कल्पना होती. याला कारणीभूत आहेत प्रभावशाली दुरात्मिक शक्ती, ज्यांना त्याने ‘जगाचे अधिकारी’ म्हटले. जगातील या काळोखाला शक्तिशाली दुरात्मे कारणीभूत असल्यामुळे, मानव हा अंधकार कसा मिटवू शकतील?
३. मानवजात अंधकारमय स्थितीत असूनही यशयाने विश्वासू लोकांकरता काय भाकीत केले?
३ यशयाने देखील मनुष्यजातीला पीडणाऱ्या अंधकाराविषयी सांगितले. (यशया ८:२२; ५९:९) पण आपल्या काळाकडे निर्देश करून त्याने देवाच्या प्रेरणेने असे भाकीत केले की या अंधकारमय काळातसुद्धा प्रकाशाची आवड धरणाऱ्यांना देव प्रकाशमान दृष्टिकोन बाळगण्यास मदत करेल. आज पौल किंवा यशया आपल्यामध्ये नाहीत हे खरे आहे, पण त्यांची प्रेरित लिखाणे मात्र आपल्या मार्गदर्शनाकरता उपलब्ध आहेत. यहोवावर प्रीती करणाऱ्यांकरता हा केवढा मोठा आशीर्वाद आहे हे जाणून घेण्याकरता, यशयाच्या पुस्तकातील ६० व्या अध्यायातील त्याच्या भविष्यसूचक शब्दांकडे आपण लक्ष देऊ या.
एक भविष्यसूचक स्त्री प्रकाशमान होते
४, ५. (अ) यहोवा एका स्त्रीला काय करण्याची आज्ञा देतो आणि तो कोणते आश्वासन देतो? (ब) यशया अध्याय ६० यात कोणती उत्साहवर्धक माहिती मिळते?
४ यशया ६० अध्यायाचे पहिले शब्द एका अशा स्त्रीला उद्देशून बोलले आहेत जी अतिशय दुःखी स्थितीत, अंधकारात जमिनीवर पडलेली आहे. अचानक प्रकाश किरणे त्या अंधकाराला चिरतात आणि यहोवा अशी हाक देतो: “ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुजकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुजवर उदय पावले आहे.” (यशया ६०:१) या स्त्रीने उभे राहून देवाच्या प्रकाशाचे गौरव प्रतिबिंबित करण्याची वेळ आली आहे. का? पुढील वचनात या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळते: “पाहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे; पण तुजवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुजवर दिसत आहे.” (यशया ६०:२) ही स्त्री यहोवाच्या आज्ञेचे पालन करते तेव्हा तिला एक उत्तम आशीर्वाद मिळण्याचे आश्वासन दिले जाते. यहोवा म्हणतो: “राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील.”—यशया ६०:३.
५ या तीन वचनांतील उत्साहवर्धक शब्द यशयाच्या ६० व्या अध्यायातील उर्वरित भागात असलेल्या माहितीची प्रस्तावना व सारांश देतात. यात एका भविष्यसूचक स्त्रीच्या अनुभवांविषयी भाकीत केले आहे; तसेच, सध्या मानवजातीवर असलेल्या अंधकारातही आपण यहोवाच्या प्रकाशात कशाप्रकारे वास करू शकतो हे यात स्पष्ट करण्यात आले आहे. पण या तीन प्रास्ताविक वचनांतील प्रतीके कोणाला चिन्हित करतात?
६. यशया ६० व्या अध्यायातील स्त्री कोण आहे आणि पृथ्वीवर कोण तिचे प्रतिनिधीत्व करतात?
६ यशया ६०:१-३ येथे उल्लेख केलेली स्त्री म्हणजे आत्मिक प्राण्यांचा समावेश असलेली यहोवाची स्वर्गीय संघटना आहे. आज पृथ्वीवर ‘देवाच्या इस्राएलातील’ शेषजन अर्थात ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याची आशा असलेल्या आत्म्याने अभिषिक्त ख्रिश्चनांची आंतरराष्ट्रीय मंडळी सियोनेचे प्रतिनिधीत्व करते. (गलतीकर ६:१६) शेवटी, एकूण १,४४,००० सदस्यांचे हे आध्यात्मिक राष्ट्र बनते आणि यशया अध्याय ६० ची आधुनिक काळातील पूर्णता त्यांच्यापैकी ‘शेवटल्या काळात’ पृथ्वीवर जिवंत असलेल्यांवर केंद्रित आहे. (२ तीमथ्य ३:१; प्रकटीकरण १४:१) या भविष्यवाणीत या अभिषिक्त ख्रिश्चनांच्या साथीदारांविषयी, अर्थात ‘दुसऱ्या मेंढरांच्या’ ‘मोठ्या लोकसमुदायाविषयी’ देखील बरेच काही सांगितले आहे.—प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६.
७. सियोनेची स्थिती १९१८ साली कशी होती आणि याविषयी कशाप्रकारे पूर्वभाकीत करण्यात आले होते?
७ त्या भविष्यसूचक स्त्रीने पूर्वचित्रित केल्यानुसार ‘देवाचे इस्राएल’ देखील विशिष्ट कालावधीत अंधकारात पडलेल्या स्थितीत होते का? होय हे ८० हून अधिक वर्षांआधी घडले. पहिल्या महायुद्धादरम्यान, अभिषिक्त ख्रिश्चनांना साक्षकार्य सुरू ठेवण्याकरता बराच संघर्ष करावा लागला. पण १९१८ साली, युद्धाच्या शेवटल्या वर्षी संघटित रूपातील प्रचाराचे कार्य जवळजवळ थांबलेच. जागतिक प्रचार कार्याची देखरेख करणारे जोसेफ एफ. रदरफोर्ड यांना व इतर मुख्य ख्रिस्ती बांधवांना खोट्या आरोपांखाली दीर्घकालीन तुरुंगवास ठोठावण्यात आला. त्या काळात पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्त ख्रिश्चनांची प्रकटीकरणाच्या पुस्तकात भविष्यसूचक वर्णनातील प्रेतांशी तुलना करण्यात आली; ‘आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेल्या मोठ्या नगरातील रस्त्यावर’ त्यांची प्रेते पडली होती असे त्यांच्याविषयी वर्णन करण्यात आले. (प्रकटीकरण ११:८) तो काळ सियोनेकरता, म्हणजे तिचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पृथ्वीवरील तिच्या अभिषिक्त मुलांकरता अतिशय अंधकारमय काळ होता!
८. कोणते नाट्यमय परिवर्तन १९१९ साली घडून आले आणि यामुळे काय परिणाम झाला?
मत्तय ५:१४-१६) या ख्रिश्चनांच्या पुनरुज्जीवित आवेशामुळे इतरजणही यहोवाच्या प्रकाशाकडे आकर्षित झाले. सुरवातीला या नवीन लोकांना देवाच्या इस्राएलातील सदस्य म्हणून अभिषिक्त करण्यात आले. यशया ६०:३ येथे त्यांना राजे म्हटले आहे कारण देवाच्या स्वर्गीय राज्यात ते ख्रिस्तासोबत सहवारस होतील. (प्रकटीकरण २०:६) नंतर, दुसऱ्या मेंढरांचा एक मोठा लोकसमुदाय यहोवाच्या प्रकाशाकडे आकर्षित होऊ लागला. हे लोकच भविष्यवाणीत उल्लेख केलेली “राष्ट्रे” आहेत.
८ पण १९१९ साली एक नाट्यमय परिवर्तन घडून आले. यहोवाने सियोनेस प्रकाशमान केले! देवाच्या इस्राएलातील अद्याप जिवंत असलेले, देवाचा प्रकाश प्रतिबिंबित करण्याकरता उभे राहिले आणि सुवार्तेच्या घोषणेचे कार्य त्यांनी पुन्हा एकदा निर्भयपणे हाती घेतले. (स्त्रीचे पुत्र व कन्या घरी परततात!
९, १०. (अ) स्त्रीला कोणते आनंददायक दृश्य दिसते आणि हे कशास पूर्वचित्रित करते? (ब) सियोनेस कोणत्या कारणांमुळे आनंद झाला?
९ आता यहोवा यशया ६०:१-३ यातील माहितीचा खुलासा करण्यास सुरवात करतो. तो भविष्यसूचक स्त्रीला दुसरी आज्ञा देतो. तो काय म्हणतो याकडे लक्ष द्या: “तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा!” स्त्री या आज्ञेचे पालन करते आणि तिला अतिशय आनंददायक दृश्य दिसते! तिचे पुत्र व कन्या घरी परतत आहेत. वचनात पुढे म्हटले आहे: “ते सर्व एकत्र होत आहेत, तुजकडे येत आहेत; तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणीत आहेत.” (यशया ६०:४) १९१९ साली सुरू झालेल्या राज्य घोषणेच्या जागतिक कार्यामुळे हजारो नवीन लोक यहोवाच्या सेवेकडे आकर्षित झाले. हे देखील सियोनेचे “पुत्र” व ‘कन्या’, अर्थात देवाच्या इस्राएलचे अभिषिक्त सदस्य बनले. अशारितीने १,४४,००० च्या शेवटल्या सदस्यांना प्रकाशाकडे आणण्याद्वारे यहोवाने सियोनेस शोभायमान केले.
१० आपली मुले आपल्याजवळ आल्यानंतर सियोनेस झालेल्या आनंदाची तुम्ही कल्पना करू शकता का? पण यहोवा सियोनेला आनंदित होण्याकरता आणखी कारणे देऊ करतो. पुढे म्हटले आहे: “हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुजकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ति तुजकडे येईल.” (यशया ६०:५) या भविष्यसूचक शब्दांनुसार १९३० च्या दशकापासून, पृथ्वीवर सर्वदा जगण्याची आशा असणाऱ्या लोकांचा समुदाय सियोनेकडे आला आहे. हे लोक देवापासून दुरावलेल्या मानवजातीच्या ‘समुद्रातून’ बाहेर आले आहेत आणि ते राष्ट्रांच्या संपत्तीचे प्रतिनिधीत्व करतात. ते “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु” आहेत. (हाग्गय २:७; यशया ५७:२०) या “निवडक वस्तू” आपापल्या पद्धतीने यहोवाची सेवा करण्याकरता वेगवेगळ्या दिशेने जात नाहीत याकडेही लक्ष द्या. उलट, ते आपल्या अभिषिक्त बांधवांच्या सोबतीने उपासना करण्याकरता येण्याद्वारे आणि ‘एका मेंढपाळाच्या’ नेतृत्वाखाली “एक कळप” होण्याद्वारे सियोनेच्या शोभेत भर पाडतात.—योहान १०:१६.
व्यापारी व मेंढपाळ सियोनेस येतात
११, १२. सियोनेकडे जाणाऱ्या झुंडींचे वर्णन करा.
११ भाकीत करण्यात आलेल्या या एकत्रीकरणामुळे यहोवाची स्तुती करणाऱ्यांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ होते. याविषयी भविष्यवाणीच्या पुढील शब्दांत भाकीत केले आहे. तुम्ही स्वतः सियोन पर्वतावर भविष्यसूचक स्त्रीसोबत उभे असल्याची कल्पना करा. तुम्ही पूर्व दिशेला पाहता, तो तुम्हाला काय दिसते? “उंटांच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील, परमेश्वराचा आनंदभराने गुणानुवाद करितील.” (यशया ६०:६) व्यापाऱ्यांच्या झुंडी आपले उंटांचे काफले जेरूसलेमकडे जाणाऱ्या वाटेवरून आणतात. एखाद्या पुराप्रमाणे या झुंडी सबंध प्रदेश व्यापून टाकतात! विक्रेत्यांजवळ मोलवान वस्तू, “सोने व ऊद” आहेत. आणि हे व्यापारी सर्वांसमोर देवाची स्तुती करण्याकरता, “परमेश्वराचा आनंदभराने गुणानुवाद” करण्याकरता त्याच्या प्रकाशात येतात.
१२ केवळ व्यापारीच नव्हे, तर मेंढपाळ देखील सियोनेकडे झुंडीने येत आहेत. भविष्यवाणी पुढे असे सांगते: “केदारचे सर्व कळप तुजजवळ एकवट होत आहेत; यशया ६०:७अ) मेंढपाळांच्या वेगवेगळ्या जमाती आपल्या कळपातील सर्वात उत्तम दान यहोवाला देण्याकरता पवित्र नगरीत येत आहेत. ते स्वतः देखील सियोनेकरता काम करण्यास तयार आहेत! यहोवा या विदेश्यांचे स्वागत कसे करतो? तो स्वतःच याचे उत्तर देतो: “ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन.” (यशया ६०:७ब) या विदेश्यांची अर्पणे व सेवा यहोवा दयाळूपणे स्वीकारतो. ते त्याच्या मंदिराची शोभा वाढवतात.
नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील.” (१३, १४. पश्चिमेकडून काय येताना दिसते?
१३ आता वळून जरा पश्चिमी क्षितिजाकडे पाहा. तुम्हाला काय दिसते? दूर पाहिल्यास, समुद्रावर पांढऱ्या ढगासारखे काहीतरी दिसते. तुमच्या मनात येणारा प्रश्न स्वतः यहोवाच विचारतो: “जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात तसे जे उडत आहेत ते कोण?” (यशया ६०:८) यहोवाच आपल्या प्रश्नाचे उत्तरही देतो: “द्वीपे माझी वाट पाहत आहेत; तुझा देव परमेश्वर याच्या नामासाठी, इस्राएलाच्या पवित्र प्रभुसाठी तार्शीशची गलबते तुझ्या पुत्रांस त्यांच्या सोन्यारूप्यांसहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत, कारण परमेश्वराने तुला वैभव युक्त केले आहे.”—यशया ६०:९.
१४ तुम्ही या दृश्याची कल्पना करू शकता का? पांढरा मेघ थोडा जवळ आला आहे आणि आता तो सुदूर पश्चिम टोकावर असंख्य ठिपक्यांप्रमाणे दिसत आहे. जणू पक्षांचा थवा लाटांवरून अलगद उडत आहे. पण ते आणखी जवळ आल्यावर तुम्हाला दिसते की हे पक्षी नसून वाऱ्यावर फडफडणारी जहाजांची शीडे आहेत. जेरूसलेमच्या दिशेने इतकी जहाजे येत आहेत की ती कबुतरांच्या झुंडींप्रमाणे दिसतात. दूरदूरच्या बंदरांवरून ही जहाजे अत्यंत वेगाने उपासकांना यहोवाची सेवा करण्याकरता जेरूसलेमकडे घेऊन येत आहेत.
यहोवाच्या संघटनेचा विस्तार
१५. (अ) यशया ६०:४-९ यातील शब्द कोणत्या वाढीविषयी भाकीत करतात? (ब) खरे ख्रिस्ती कशाप्रकारची प्रवृत्ती दाखवतात?
१५ सबंध जगात १९१९ पासून घडलेल्या विस्ताराचे किती सुस्पष्ट भविष्यसूचक चित्र ४ ते ९ वचनांत वाचायला मिळते! यहोवाने सियोनेला इतक्या वाढीचा आशीर्वाद का दिला? कारण १९१९ पासून देवाच्या इस्राएलने आज्ञाधारकपणे व सातत्याने यहोवाचा प्रकाश पसरवला आहे. पण ७ व्या वचनानुसार हे नवीन लोक ‘देवाच्या वेदीवर चढतात’ याकडे तुम्ही लक्ष दिले का? वेदीवर बलिदाने दिली जातात आणि भविष्यवाणीचा हा भाग आपल्याला या गोष्टीची आठवण करून देतो की यहोवाच्या सेवेत बलिदानांचा समावेश आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “मी . . . तुम्हाला विनवितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.” (रोमकर १२:१) पौलाच्या शब्दांनुसार खरे ख्रिश्चन केवळ आठवड्यातून एकदा धार्मिक सभांना उपस्थित राहून समाधान मानत नाहीत. तर ते आपला वेळ, शक्ती आणि संपत्ती खऱ्या उपासनेच्या वाढीकरता खर्च करतात. अशा समर्पितभावाने उपासना करणाऱ्यांमुळे यहोवाच्या भवनाची शोभा वाढत नाही का? यशयाच्या भविष्यवाणीत असे घडण्याविषयी भाकीत करण्यात आले होते. आणि आपण याची खात्री बाळगू शकतो की हे आवेशी उपासक यहोवाच्या नजरेत शोभायमान आहेत.
१६. प्राचीन काळात पुनर्निमाणाच्या कार्याला कोणी हातभार लावला आणि आधुनिक काळात कोणी हे केले आहे?
१६ या नवीन लोकांना काम करण्याची इच्छा आहे. भविष्यवाणी पुढे म्हणते: “परदेशचे लोक तुझे कोट बांधीत आहेत, त्यांचे राजे तुझी सेवा करीत आहेत.” (यशया ६०:१०) बॅबिलोनच्या बंदिवासातून यहूदी परतल्यावर या शब्दांची पहिल्यांदा पूर्णता झाली तेव्हा विदेशी राजांनी व इतर लोकांनी खरोखरच जेरूसलेमच्या मंदिराच्या व शहराच्या पुनर्निर्माणाकरता बरीच मदत केली. (एज्रा ३:७; नहेम्या ३:२६) आधुनिक काळातील पूर्णतेत मोठ्या लोकसमुदायाने खऱ्या उपासनेच्या निर्माण कार्यात अभिषिक्त ख्रिश्चनांना साहाय्य पुरवले आहे. ख्रिस्ती मंडळ्यांच्या उभारणीत हातभार लावण्याद्वारे त्यांनी यहोवाच्या शहरासमान संघटनेचे “कोट” बांधले आहेत. तसेच त्यांनी शब्दशः देखील बांधकाम कार्यात—अर्थात राज्य सभागृहे, संमेलनगृहे, आणि बेथेल इमारतींच्या निर्माण कार्यात सहभाग घेतला आहे. या सर्व मार्गांनी ते यहोवाच्या वाढत चाललेल्या संघटनेच्या गरजा पूर्ण करण्याकरता आपल्या अभिषिक्त बांधवांना साहाय्य करतात!
१७. कोणत्या एका मार्गाने यहोवा आपल्या लोकांची शोभा वाढवतो?
१७ यशया ६०:१० येथील शेवटले शब्द किती उत्तेजनदायक आहेत! यहोवा म्हणतो: “मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडिले तरी आता मी प्रसन्न होऊन तुजवर दया केली आहे.” होय, १९१८/१९ दरम्यान यहोवाने आपल्या लोकांना ताडन दिले. पण आता ते गतकाळात जमा झाले आहे. आता यहोवाची त्याच्या अभिषिक्त सेवकांवर व दुसऱ्या मेंढरांतील त्यांच्या साथीदारांवर दया दाखवण्याची वेळ आली आहे. यहोवाच्या आशीर्वादाने त्यांच्यामध्ये होणारी अभूतपूर्व वाढ याचा पुरावा आहे; जणू तो त्यांना ‘वैभवयुक्त’ बनवत आहे.
१८, १९. (अ) आपल्या संघटनेत येणाऱ्या नवीन लोकांबद्दल यहोवा कोणते अभिवचन देतो? (ब) यशया ६० च्या उर्वरित वचनांतून आपल्याला काय समजते?
१८ दर वर्षी, आणखी लाखो “परदेशी” यहोवाच्या संघटनेसोबत सहवास राखतात, आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक लोकांकरता यहोवाच्या संघटनेचे द्वार नेहमी खुले राहील. यहोवा सियोनेस म्हणतो: “राष्ट्रांची संपत्ति तुजकडे आणावी, त्यांचे राजे तुजकडे मिरवीत यशया ६०:११) काही विरोधी “वेशी” बंद करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना असे करण्यात यश मिळणार नाही हे आपण जाणून आहोत. स्वतः यहोवाने म्हटले आहे की या नाही तर त्या मार्गाने वेशी सतत उघड्या राहतील. वाढ होत राहील.
आणावे म्हणून तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या अहोरात्र बंद म्हणून राहणार नाहीत.” (१९ या शेवटल्या दिवसांत यहोवाने आपल्या लोकांना इतर मार्गांनीही आशीर्वादित केले आहे, यांना वैभवयुक्त केले आहे. यशया ६० च्या उर्वरित वचनांतून हे मार्ग कोणते आहेत ते भविष्यसूचक रितीने स्पष्ट होईल.
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
• देवाची “स्त्री” कोण आहे आणि पृथ्वीवर तिचे प्रतिनिधीत्व कोण करत आहे?
• सियोनेचे पुत्र व कन्या जमिनीवर पडलेल्या अवस्थेत केव्हा होते आणि ते केव्हा व कशाप्रकारे ‘उठले’?
• वेगवेगळ्या प्रतिकांचा वापर करून यहोवाने राज्य प्रचारकांमध्ये होणाऱ्या वाढीविषयी कसे भाकीत केले?
• यहोवाने आपल्या लोकांना कशाप्रकारे प्रकाशमान केले आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१० पानांवरील चित्र]
यहोवा आपल्या ‘स्त्रीला’ उठण्याची आज्ञा देतो
[१२ पानांवरील चित्र]
दुरून येणारा जहाजांचा ताफा क्षितिजावर कबुतरांप्रमाणे दिसतो