व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आपसात क्षमा करा”

“आपसात क्षमा करा”

“आपसात क्षमा करा”

देवाने तुमची पातके क्षमा केली आहेत यावर तुमचा विश्‍वास आहे का? असे दिसते, की अमेरिकेतील बहुतेक प्रौढ लोकांचा असा विश्‍वास आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन इन्स्टिट्यूट फॉर सोशियल रिसर्च येथे घेतलेल्या एका अभ्यासाचे प्रमुख डॉ. लॉरेन टुसन यांनी असा अहवाल दिला, की १,४२३ अमेरिकन लोकांच्या सर्व्हेत, ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सुमारे ८० टक्के प्रौढांनी म्हटले, की देवाने त्यांची पातके क्षमा केली होती.

एक उल्लेखनीय गोष्ट अशी की सर्व्हेतील केवळ ५७ टक्के लोकांनी म्हटले, की त्यांनी देखील इतरांना क्षमा केली होती. या आकडेवारीवरून आपल्याला डोंगरावरील येशूच्या प्रवचनातील शब्दांची आठवण होते: “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाहि क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताहि तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही.” (मत्तय ६:१४, १५) होय, काही अटींवर अर्थात इतरांना क्षमा करण्याची आपली तयारी असेल तर काही अंशी देव आपल्या पापांची क्षमा करतो.

प्रेषित पौलाने कलस्सैमधील ख्रिश्‍चनांना या तत्त्वाची आठवण करून दिली. त्याने त्यांना आर्जवले: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.” (कलस्सैकर ३:१३) हे खरे आहे, की असे करणे नेहमी सोपे नसते. उदाहरणार्थ, तुम्हाला कोणी अविचारीपणे किंवा बोचेल अशाप्रकारे बोलले असेल तर त्यांना क्षमा करणे आपल्याला इतके सोपे वाटत नाही.

तरीपण, क्षमा केल्याने अनेक फायदे होतात. समाजशास्त्रज्ञ डॉ. डेव्हीड आर. विल्यम्स आपल्या संशोधनाविषयी असे म्हणाले: “इतरांना क्षमा करणे व मध्यमवयीन व वृद्ध अमेरिकन लोकांचे मानसिक आरोग्य यांत एक विशिष्टप्रकारचा अतूट संबंध आम्हाला आढळून आला आहे.” हे, सुज्ञ राजा शलमोनाच्या शब्दांच्या एकवाक्यतेत आहे ज्याने सुमारे ३,००० वर्षांआधी लिहिले होते: “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे.” (नीतिसूत्रे १४:३०) क्षमा करण्याची प्रवृत्ती, देवाबरोबर आणि आपल्या शेजाऱ्‍यांबरोबर आपले चांगले नातेसंबंध विकसित करण्यास बढावा देत असल्यामुळे, इतरांना मनापासून क्षमा करण्याची मनोवृत्ती बाळगण्यास आपल्याजवळ ठोस कारण आहे.—मत्तय १८:३५.