सर्व गोष्टींकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहणे
सर्व गोष्टींकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहणे
न्यूयॉर्क, अमेरिका. सप्टेंबर १४, २००२ चा दिवस. छान ऊन पडले होते. त्या दिवशी, पॅटरसन शिक्षण केंद्रात आणि त्या परिसरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या इतर दोन संकुलांमध्ये ६,५२१ जणांचा एक आंतरराष्ट्रीय जमाव एकत्र आला होता. वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या ११३ व्या वर्गाच्या पदवीदान समारंभाकरता हा जमाव जमला होता. या प्रशालेतील विद्यार्थी १४ देशांतील होते आणि ते पाच महिन्यांपासून मिशनरी सेवेचे प्रशिक्षण घेत होते. मिशनरी सेवेकरता त्यांना १९ देशांमध्ये नेमण्यात आले होते.
यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य, कॅरी बार्बर ज्यांनी वयाची ९७ वर्षे ओलांडली आहेत ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. गिलियड प्रशालेच्या सुमारे ६० वर्षांच्या इतिहासाकडे त्यांनी लक्ष वेधले ज्यामुळे हजारो लोकांना मिशनरी क्षेत्रासाठी सज्ज करण्यात आले आहे. बंधू बार्बर म्हणाले: “त्यांच्या जादा प्रशिक्षणामुळे उत्कृष्ट परिणाम लाभले आहेत ही अतिशयोक्ती नाही. प्रशिक्षित मिशनऱ्यांकडून मिळालेल्या मदतीमुळे नम्र अंतःकरणाच्या हजारो जणांनी यहोवाला आपले जीवन समर्पित केले आहे आणि त्याची खरी उपासना व पवित्र सेवा स्वीकारली आहे.”
गिलियडला जाण्याआधी, पुष्कळ विद्यार्थी अधिक सेवाकार्य करायला इच्छुक होते. कॅनडात एक दांपत्य राहत असलेल्या ठिकाणी चिनी वंशाचे पुष्कळ लोक राहत होते; त्यांच्याशी बोलता यावे म्हणून या दांपत्याने एक वर्षाहून अधिक काळ मॅन्डरीन भाषेत शिकवणी घेतल्या. दुसऱ्या एका जोडप्याने स्वतःहून ॲल्बेनियन भाषा शिकायला सुरवात केली आणि काही काळाने ते अल्बेनियाला राहायला गेले व तेथे बायबलबद्दल आवड असलेल्या वाढत्या संख्येच्या लोकांची त्यांनी मदत केली. वर्गातील इतर जण हंगेरी, ग्वातेमाला आणि डॉमिनिकन प्रजासत्ताक या राष्ट्रांतून आले होते; या ठिकाणी देवाच्या वचनाच्या शिक्षकांची अधिक गरज असल्यामुळे त्यांनी येथे स्थलांतर केले होते.
आफ्रिका, पूर्व युरोप, मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि पूर्वेकडील दूरचे देश या नेमलेल्या देशांमध्ये जाण्याआधी पदवीधर झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीत देवाचा विचार करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले.
देवाच्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहणे
बंधू बार्बर यांनी प्रस्ताविक भाषण दिल्यानंतर अमेरिकेच्या शाखा समितीचे सदस्य, मॅक्सवेल लॉईड यांना आमंत्रित केले. त्यांच्या भाषणाचे शीर्षक होते, “देवाच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टींकडे पाहणे.” बंधू लॉईड यांनी दावीद आणि देवाचा पुत्र, येशू यांच्या उदाहरणांकडे लक्ष वेधले. (१ शमुवेल २४:६; २६:११; लूक २२:४२) पाच महिन्यांच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना देवाच्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहायला शिकवण्यात आले होते याची आठवण करून दिल्यावर वक्त्याने विचारले: “आपल्या नवीन नेमणुकीत लोकांबरोबर बायबल अभ्यास चालवताना, त्यांना देवाच्या दृष्टिकोनातून गोष्टींवर कारणमीमांसा करायला तुम्ही मदत कराल का?” इतरांना काही सुचवण्यासंबंधी त्यांनी विद्यार्थ्यांना असा सल्ला दिला: “‘माझ्या दृष्टिकोनातून, मला असं वाटतं . . . ’ असं म्हणू नका, तर देवाचा दृष्टिकोन काय आहे हे पाहण्यास त्यांची मदत करा. असे केल्याने, तुमच्या नेमणुकीत तुमच्याशी सहवास ठेवणाऱ्यांकरता तुम्ही मोठा आशीर्वाद ठराल.”
त्यानंतर, गेरट लॉश हे नियमन मंडळाचे सदस्य कार्यक्रमातील पुढील वक्ते होते. “मी तुजबरोबर आहे” या विषयावर बोलत असताना त्यांनी अशा अनेक प्रसंगांची उदाहरणे दिली जेव्हा यहोवा म्हणाला, “मी तुजबरोबर आहे.” (उत्पत्ति २६:२३, २४; २८:१५; यहोशवा १:५; यिर्मया १:७, ८) आपल्या काळातही, आपण विश्वासू राहिलो तर आपणही असाच आत्मविश्वास बाळगू शकतो. बंधू लॉश म्हणाले: “बायबल अभ्यास करण्यासाठी आपल्याला लोक सापडतील का अशी तुम्ही चिंता करता का? लक्षात ठेवा, यहोवा म्हणतो, ‘मी तुजबरोबर आहे.’ तुम्हाला भौतिक गोष्टींची चिंता वाटते का? यहोवा म्हणतो, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’” (इब्री लोकांस १३:५) भाषणाच्या शेवटी बंधू लॉश त्यांनी विद्यार्थ्यांना आठवण करून दिली की, येशूने आपल्या विश्वासू अनुयायांना शिष्य बनवण्याच्या कार्यात त्यांच्यासोबत असण्याचे वचन दिले.—मत्तय २८:२०.
“अग्नीत तुम्हाला सुरक्षा मिळेल का?” हे गिलियड प्रशिक्षक लॉरेन्स बोवन यांच्या भाषणाचे शीर्षक होते. त्यांनी म्हटले की, एदेनमध्ये निर्माण झालेल्या वादविषयांमुळे यहोवाला अनन्य भक्ती देण्याची इच्छा दाखवलेल्या प्रत्येकासमोर अडचणी आणि काही वेळा अग्नी परीक्षा आल्या आहेत. त्यांनी पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना इब्री लोकांस ५:८, ९) यहोवाची तुलना सोने शुद्ध करणाऱ्याशी करता येते जो सोन्यातील अशुद्धता काढून टाकण्यासाठी योग्य प्रमाणात उष्णतेचा उपयोग करतो. अर्थात, अग्नी परीक्षेतून पार झालेला विश्वास शुद्ध सोन्यापेक्षा अधिक सुरक्षा देतो. का? बंधू बोवन म्हणाले, “कारण शुद्ध केलेला विश्वास कोणत्याही दबावात खंबीर राहू शकतो आणि ‘शेवटपर्यंत’ टिकून राहायला आपल्याला तो सज्ज करतो.”—मत्तय २४:१३.
येशूचे अनुकरण करायला उत्तेजन दिले. तो यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिला होता व यहोवाने आपल्या पुत्राच्या आज्ञाधारकतेला परिपूर्ण करण्यासाठी अनुमती दिलेल्या अग्नी परीक्षा येशूने स्वीकारल्या होत्या म्हणून त्याला खरी सुरक्षा मिळाली. (आणखी एक गिलियड प्रशिक्षक, मार्क नुमार यांनी विचारले: “तुम्ही इतरांना प्रसन्न करणारे व्हाल का?” त्यांचे शीर्षक १ शमुवेल २:२६ मधील वचनावर आधारलेले होते ज्यामध्ये शमुवेलावर “परमेश्वर व मानव . . . प्रसन्न होते” असे म्हटले आहे. शमुवेलाच्या उदाहरणाचा विचार केल्यावर, बंधू नुमार, ज्यांनी दहापेक्षा अधिक वर्षे आफ्रिकेत मिशनरी सेवा करण्यात घालवली होती ते म्हणाले: “देवाने तुम्हाला दिलेल्या कार्यात विश्वासूपणे टिकून राहिल्याने तुम्हावर देखील देव प्रसन्न होईल. त्याने तुम्हाला बहुमोल अशी मिशनरी नेमणूक दिली आहे.” त्यानंतर, बंधू नुमार यांनी आपल्या नेमणुका देवाने सोपवलेली पवित्र सेवा आहे असे समजावे आणि त्या पार पाडताना देवाच्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहावे असे पदवीधर होणाऱ्या वर्गाला उत्तेजन दिले.
प्रशालेच्या दरम्यान, विद्यार्थ्यांना सप्ताहांती त्या परिसरातील लोकांसोबत “देवाची महत्कृत्ये” सांगायला अनेक संधी मिळाल्या. (प्रेषितांची कृत्ये २:११) ते दहा विविध भाषांमध्ये या महत्कृत्यांविषयी सांगू शकले. आणखी एक गिलियड प्रशिक्षक वॉलस लिव्हरन्स यांनी काही विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली; हे अनुभव “‘देवाची महत्कृत्ये’ लोकांना कार्य करण्यास प्रवृत्त करतात” या शीर्षकाच्या भाषणात सांगण्यात आले. ते म्हणाले: “पेन्टेकॉस्टच्या दिवशी एका माडीवरच्या खोलीत असणाऱ्यांना, आत्म्याने, ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ बोलायला प्रवृत्त केले. तोच आत्मा देवाच्या सर्व विश्वासू सेवकांमध्ये कार्य करतो.” काहीजण, अधिक लोकांना साक्ष देता यावी म्हणून नवीन भाषा शिकायला प्रवृत्त झाले आहेत.
देवाच्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहण्याविषयी व्यावहारिक सल्ला
सुरवातीच्या भाषणांनंतर, गॅरी ब्रो आणि विल्यम यंग या अमेरिकेतील शाखा दफ्तरातील सदस्यांनी, सध्या मिशनरी ज्या देशांमध्ये आहेत त्या देशांतील विविध शाखा समितींच्या सदस्यांची त्याचप्रमाणे ४१ वर्षांपासून मिशनरी सेवेत असलेल्या एका जोडप्याची मुलाखत घेतली. एक निरीक्षण असे करण्यात आले होते: “जे कमीत कमी अपेक्षा ठेवतात ते जास्त काळ टिकून राहतात. आपण या ठिकाणी का आलो आहोत यावर ते लक्ष केंद्रित करतात. आपण सुवार्तेचा प्रचार करायला आणि लोकांना यहोवाविषयी जाणण्यास मदत करायला आलो आहोत हे त्यांना माहीत असते.”
नियमन मंडळाचे आणखी एक सदस्य, डेव्हिड स्प्लेन यांनी “तुम्ही दूर जात नाही!” या विषयावर भाषण देऊन कार्यक्रमाचा समारोप केला. प्रशालेच्या ४६ विद्यार्थ्यांना जगभरातील विविध देशांमध्ये पाठवले जात असताना त्यांच्या या शब्दांचा काय अर्थ असावा? ते म्हणाले: “तुम्ही पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात असला, तरी जोपर्यंत विश्वासू राहाल तोपर्यंत देवाच्या घरात असाल.” होय, सर्व विश्वासू ख्रिस्ती, शारीरिकदृष्ट्या कोठेही असले तरी देवाच्या महान आध्यात्मिक मंदिरात, किंवा घरात सेवा करत आहेत; हे आध्यात्मिक मंदिर पहिल्या शतकात येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी अस्तित्वात आले. (इब्री लोकांस ९:९) यहोवा पृथ्वीवरील आपल्या सर्व विश्वासू सेवकांच्या जवळ असतो हे ऐकून उपस्थित असलेल्यांना किती दिलासा मिळाला असेल! येशू पृथ्वीवर होता तेव्हा ज्याप्रमाणे यहोवाला त्याच्यामध्ये आस्था होती त्याचप्रमाणे आपण कोठेही असलो तरी आपल्या सर्वांमध्ये आणि आपल्या सेवेमध्ये त्याला आस्था आहे. त्यामुळे उपासनेच्या बाबतीत, आपण एकमेकांपासून आणि यहोवा व येशूपासून कधीही दूर नसतो.
जगभरातून आलेल्या शुभेच्छा स्वीकारल्यावर, नेमणुका घोषित केल्यावर आणि गिलियडमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाबद्दल वर्गाने लिहिलेले प्रशंसेचे पत्र वाचून दाखवल्यावर अध्यक्षांनी यशस्वीरित्या कार्यक्रमाचा समारोप केला. त्यांनी नव्या मिशनऱ्यांना आपले उत्तम कार्य करत राहण्यास आणि यहोवाच्या सेवेत सदा आनंदी राहण्यास उत्तेजन दिले.—फिलिप्पैकर ३:१.
[२३ पानांवरील चौकट]
वर्गाची आकडेवारी
विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले: एकूण देश: १४
नेमलेले देश: १९
एकूण विद्यार्थी: ४६
सरासरी वय: ३५.०
सत्यात सरासरी वर्षे: १७.२
पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १३.७
[२४ पानांवरील चित्र]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा ११३ वा पदवीधर वर्ग
खालील यादीत, ओळींना पुढून मागे अशा रितीने क्रमांक देण्यात आला आहे आणि नावे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देण्यात आली आहेत.
(१) लिक्टहार्ट, एम; होसोई, एस.; बर्कटोल्ड, ए.; लीम, सी.; आओकी, जे. (२) बागीआश, जे.; बुके, एस.; बोस्सी, ए.; ऑल्टन, जे.; एस्कोबार, ई.; एस्कोबार, एफ. (३) स्टॉएका, ए.; स्टॉएका, डी.; फ्रीमथ, एस.; कार्लसन, एम.; लब्लँक, आर. (४)ब्याँकी, आर.; ब्याँकी, एस.; कामिन्स्की, एल.; जोसफ, एल.; पॅरिस, एस.; लब्लँक, एल. (५) पॅरिस, एम.; स्कीडमोर, बी.; हॉर्टन, जे.; हॉर्टन, एल.; स्कीडमोर, जी. (६) लीम, बी.; ऑल्टन, जी.; क्वीरीसी, ई.; लाँगल्वे, एम.; स्टायनींगर, एस.; आओकी, एच. (७) लाँगल्वे, जे.; स्टायनींगर, एम.; बोस्सी, एफ.; कामिन्स्की, जे.; बुके, जे.; लिक्टहार्ट ई.; होसोई, के. (८) बागीआश, जे.; क्वीरीसी, एम.; कार्लसन, एल.; फ्रीमथ, सी.; बर्कटोल्ड, डब्ल्यू.; जोसेफ, आर.