व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गिलियड प्रशाला मिशनरी प्रशिक्षणाची ६० वर्षे

गिलियड प्रशाला मिशनरी प्रशिक्षणाची ६० वर्षे

गिलियड प्रशाला मिशनरी प्रशिक्षणाची ६० वर्षे

“बायबलच्या सखोल अभ्यासामुळे आम्ही यहोवाच्या जवळ आलो आणि त्याच्या संघटनेविषयी पुष्कळ गोष्टी शिकलो. यामुळे आम्ही विदेशी नेमणूकीसाठी तयार झालो.” या शब्दांत, पहिल्या वर्गातून पदवीधर झालेल्या एका विद्यार्थीनीने, वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेतील अभ्यासक्रमाचे वर्णन केले. गिलियड प्रशालेची सुरवात झाल्यापासून अर्थात साठ वर्षांपासून ही प्रशाला मिशनऱ्‍यांना पाठवत आहे. मार्च ८, २००३ रोजी, न्यूयॉर्क, पॅटरसन येथील वॉचटावर शैक्षणिक केंद्रात ११४ व्या वर्गाचा पदवीदान समारंभ झाला. प्रेक्षागृहात आणि कार्यक्रमाचे प्रक्षेपण ज्या ज्या ठिकाणी करण्यात आले होते त्या सर्व ठिकाणी जमलेल्या ६,४०४ बंधूभगिनींनी भाषणे, मुलाखती आणि एक गटचर्चा अशाप्रकारचा कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकला.

नियमन मंडळाचे सदस्य बंधू थिओडोर जॅरस हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. भाषणाच्या सुरवातीला त्यांनी या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष आकर्षित केले की, श्रोतृगण आंतरराष्ट्रीय आहे; कारण, श्रोतृगणातील पाहुणे आशिया, कॅरिबियन, मध्य व दक्षिण अमेरिका आणि युरोप येथून आलेले होते. बंधू जॅरस यांनी, २ तीमथ्य ४:५ वर आधारित, गिलियड प्रशिक्षित मिशनऱ्‍याच्या मुख्य कार्यावर—अर्थात ‘सुवर्तिकाच्या कामावर’ अधिक भर दिला. मिशनरी, लोकांना बायबलचे सत्य शिकवून सत्याची साक्ष देतात.

विद्यार्थ्यांना अंतिम प्रशिक्षण मिळते

संक्षिप्त भाषणांच्या मालिकेतील पहिले भाषण, अमेरिकेतील शाखा समितीतील सदस्य, बंधू जॉन लारसन यांनी दिले; विश्‍वास मजबूत करणाऱ्‍या या भाषणाचा विषय होता: “देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?” (रोमकर ८:३१) या बंधूने आपल्या भाषणात, विद्यार्थ्यांनी, आपल्या नेमणुकींमध्ये असताना, समोर येणाऱ्‍या सर्व प्रकारच्या अडचणीवर मात करण्यास यहोवाच्या शक्‍तीवर पूर्णपणे अवलंबून राहण्याकरता बायबलमध्ये दिलेल्या कारणांचे स्पष्टीकरण दिले. रोमकर ८:३८, ३९ या वचनांचा उपयोग करून, बंधू लारसन यांनी विद्यार्थ्यांना असा सल्ला दिला: “तुमच्याकरता यहोवा ज्या शक्‍तीचा उपयोग करीत आहे त्यावर जरा थांबून अंमळ विचार करा आणि यहोवाला तुमच्यामध्ये असलेली आस्था काही केल्या कमी होणार नाही हे लक्षात ठेवा.”

कार्यक्रमातील पुढील भाग, नियमन मंडळाचे सदस्य बंधू गाय पिअर्स यांनी हाताळला. “आपले डोळे आनंदी ठेवा!” हा विषय त्यांनी निवडला होता. (लूक १०:२३, NW) त्यांनी सांगितले, की खऱ्‍या आनंदात, यहोवाची ओळख करून घेणे, त्याचा चिरकालिक उद्देश समजून घेणे व बायबल भविष्यवाणींची पूर्णता पाहणे समाविष्ट आहे. विद्यार्थी कोठेही गेले तरी, आपले डोळे आनंदी ठेवण्याद्वारे ते खरा आनंद टिकवून ठेवू शकतात. यहोवाच्या चांगुलपणावर खोल मनन करण्याचे व त्याची इच्छा पूर्ण करण्यावर आपले मन आणि हृदय केंद्रित ठेवण्याचे बंधू पिअर्स यांनी पदवीधारकांना उत्तेजन दिले. (स्तोत्र ७७:१२) सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवण्याद्वारे गिलियड पदवीधारक, समोर येणाऱ्‍या कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर मात करू शकतात.

विद्यार्थ्यांना दररोज शिकवणाऱ्‍या दोन प्रशिक्षकांकडून संपूर्ण वर्गाला शेवटचे उत्तेजन मिळाले. बंधू लॉरेन्स बोवन यांनी आपल्या भाषणाच्या शीर्षकात, “तुम्ही गौरवाच्या शोधात आहात का?” असा प्रश्‍न विचारला. पुष्कळ लोक, गौरव म्हटले की स्तुती, सन्मान, व प्रतिष्ठा, असा विचार करतात. परंतु स्तोत्रकर्ता आसाफाला, खऱ्‍या गौरवाचा अर्थ समजला—यहोवाबरोबरच्या सन्मानित नातेसंबंधाचा अमूल्य खजिना. (स्तोत्र ७३:२४, २५) बायबलच्या नियमित गहन अभ्यासाद्वारे यहोवाबरोबर घनिष्ठ संबंध कायम ठेवण्याचे उत्तेजन सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना देण्यात आले. ख्रिस्तामार्फत यहोवाच्या उद्देशांच्या पूर्णतेविषयीची सविस्तर माहिती देवदूतांना “न्याहाळून पाहण्याची उत्कंठा” लागली आहे. (१ पेत्र १:१२) देवाचे गौरव होता होईल तितके प्रकट करण्याकरता ते आपल्या पित्याविषयी शक्य तितके अधिक शिकून घेऊ इच्छितात. मग, बंधू बोवन यांनी, अमूल्य खजिना शोधण्यास इतरांना मदत करण्याद्वारे आपल्या मिशनरी नेमणुकीत यहोवाचे गौरव करण्यास विद्यार्थ्यांना आर्जवले.

प्रशालेचे रेजिस्ट्रार, बंधू वॉलस लिव्हरन्स यांनी भाषणांच्या मालिकेतील शेवटले भाषण दिले; ‘पवित्र गूढतेत देवाच्या बुद्धीविषयी बोला,’ हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. (१ करिंथकर २:७) ही देवाकडील बुद्धी काय आहे जिच्याविषयी प्रेषित पौल आपल्या मिशनरी सेवेदरम्यान बोलला? ती बुद्धी म्हणजे, विश्‍वव्यापी शांती व ऐक्य आणण्यासाठी यहोवाचा सुज्ञ व शक्‍तिशाली मार्ग होय. या बुद्धीचे केंद्र येशू आहे. सामाजिक शुभवर्तमानाचा प्रचार करण्याऐवजी, देव आदामाच्या पापाचे परिणाम नाहीसे कसे करणार आहे ते पाहण्यास पौलाने लोकांना मदत केली. (इफिसकर ३:८, ९) बंधू लिव्हरेन्स यांनी आपल्या श्रोत्यांना असे आर्जवले: “पौलाप्रमाणे तुम्ही देखील सेवेच्या आपल्या विशेषाधिकाराचा उपयोग करा; आपली मिशनरी नेमणूक ही, यहोवा, आपले उद्देश कसे पूर्ण करणार आहे हे पाहण्यास लोकांना मदत करण्यासाठी एक संधी आहे, असा पौलाचा दृष्टिकोन होता.”

यानंतर, आणखी एक गिलियड प्रशिक्षक बंधू मार्क न्यूमर यांनी, वर्गातील अनेक विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली. “देवाच्या वचनाचा अभ्यास केल्याने आवेशी सेवक तयार होतात” असे शीर्षक असलेल्या या चर्चेत, रोमकर १०:१० मधील पौलाच्या शब्दांवर अधिक जोर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी, प्रशालेत असताना क्षेत्र सेवेत त्यांना आलेले अनेक अनुभव सांगितले. त्यांनी सांगितलेल्या अनुभवांवरून हे दिसून आले, की आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो व त्यावर मनन करतो तेव्हा आपले हृदय, यहोवा देव आणि त्याचे राज्य यांविषयी असलेल्या अद्‌भुत गोष्टींनी भरते आणि आपल्या तोंडूनही याच गोष्टी निघतात. वॉचटावर शैक्षणिक केंद्र येथे पाच महिने राहत असताना विद्यार्थ्यांनी, जवळपासच्या मंडळ्यांच्या नेहमी कार्य केल्या जाणाऱ्‍या क्षेत्रात ३० पेक्षा अधिक गृह बायबल अभ्यास सुरू केले.

प्रौढ बंधूकडून उत्तम सल्ला

या प्रशालेदरम्यान, विद्यार्थ्यांना अमेरिकेतील बेथेल कुटुंबातील सदस्यांबरोबर सहवास ठेवल्यामुळे फायदा झाला. बेथेल कुटुंबातील सदस्य, बंधू रॉबर्ट सिरान्को आणि बंधू रॉबर्ट पी. जॉन्सन यांनी, यहोवाची अनेक वर्षांपासून सेवा करत असलेल्या अनेक बंधूभगिनींच्या तसेच वॉचटावर शैक्षणिक केंद्र येथे सध्या खास प्रशिक्षण घेत असलेल्या प्रवासी पर्यवेक्षकांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखत घेतलेले सर्व जण गिलियड पदवीधर होते ज्यांनी एकेकाळी मिशनरी म्हणून सेवा केली होती. या मुरलेल्या आध्यात्मिक बांधवांकडून बुद्धीचे शब्द ऐकावयास मिळाल्याने, सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या कुटुंबांना आणि मित्रांना दिलासा मिळाला.

“सेवेमध्ये आणि मंडळीत शक्य तितके व्यस्त राहा,” असाही सल्ला त्यांना देण्यात आला. “स्वतःविषयी फाजील चिंता करू नका. मिशनरी या नात्याने तुमचा जो उद्देश आहे त्यावर लक्ष केंद्रित ठेवा आणि तुम्हाला जेथे नेमले जाते त्याला आपले घर समजा.” गिलियड प्रशाला एका सेवकाला, मग त्याला कोठेही नेमण्यात आले तरी भल्या कार्यासाठी सज्ज कसे करते याचे उदाहरण इतर उपयुक्‍त विवेचनांद्वारे मिळाले. येथे काही उदाहरणे आहेत: “आम्ही सहकार्य देण्यास व एकत्र काम करावयास शिकलो.” “प्रशालेने आम्हाला नवीन संस्कृतींचा स्वीकार करायला मदत केली.” “एका वेगळ्या दृष्टिकोनातून शास्त्रवचनांचा उपयोग करायला आम्हाला शिकवण्यात आले.”

नियमन मंडळाचे अनेक वर्षांपासूनचे सदस्य बंधू जॉन ई. बार यांनी कार्यक्रमाचे प्रमुख भाषण दिले. ‘त्याचा नाद सर्व पृथ्वीवर पोहंचला’ हा त्यांच्या भाषणाचा शास्त्र आधारित विषय होता. (रोमकर १०:१८) त्यांनी प्रश्‍न विचारला: देवाचे लोक आज हे आव्हान पूर्ण करू शकले आहेत का? होय निश्‍चितच! १८८१ साली टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या वाचकांना असे विचारण्यात आले होते: “तुम्ही प्रचार करीत आहात का?” बंधू बार यांनी श्रोत्यांना, अमेरिका, ओहायो, सीडर पॉईन्ट येथे १९२२ साली झालेल्या अधिवेशनातील, “राजा आणि त्याचे राज्य यांची घोषणा करा,” या ऐतिहासिक हाकेची आठवण करून दिली. काळाच्या ओघात देवाच्या विश्‍वासू सेवकांच्या आवेशाने त्यांना सर्व राष्ट्रांना राज्याच्या अद्‌भुत सत्यांची घोषणा करण्यास प्रवृत्त केले आहे. छापील साहित्याद्वारे आणि बंधूभगिनींच्या तोंडून सुवार्तेची घोषणा पृथ्वीच्या कानाकोंपऱ्‍यात पोंहचवण्यात आली आहे—हे सर्व यहोवाच्या गौरवासाठी आणि त्याच्या स्तुस्तीसाठी केले जात आहे. समारोपात, बंधू बार यांनी पदवीधारकांना आपल्या आशीर्वादांचा विचार करण्यास आर्जवून म्हटले: “तुमच्या नेमणुकीत असताना तुम्ही दररोज यहोवाला प्रार्थना करता तेव्हा, ‘त्याचा नाद सर्व पृथ्वीवर पोहंचला’ या शब्दांच्या पूर्णतेत तुम्हाला भाग घेऊ दिल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक आभार माना.”

या भाषणानंतर, विविध शाखांमधून आलेल्या शुभेच्छा वाचून दाखवण्यात आल्या आणि अध्यक्षांनी प्रत्येक पदवीधारकाला एक डिप्लोमा दिला. कार्यक्रमाचा आनंद आणि सर्वांची आवडती प्रशाला सोडून जाण्याचे दुःख अशा मिश्र भावनांनी एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांच्या वतीने नियमन मंडळाला आणि बेथेल परिवाराला संबोधून एक मनःपूर्वक ठराव वाचून दाखवला; “येथून पुढे सर्वकाळ” यहोवाची स्तुती करण्याचा पदवीधारकांचा दृढनिश्‍चय आहे, असे त्या ठरावात म्हटले होते.—स्तोत्र ११५:१८.

आमची अशी प्रार्थना आहे, की या पदवीधारकांना नवीन ठिकाणाची सवय व्हावी आणि त्यांच्याआधी सुमारे ६० वर्षांपासून अशा कार्यासाठी गेलेल्या बंधूभगिनींप्रमाणे या पदवीधारकांनी देखील जगव्याप्त प्रचार कार्याला हातभार लावावा.

[२३ पानांवरील चौकट]

वर्गाची आकडेवारी

विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: १२

नेमलेले देश: १६

एकूण विद्यार्थी: ४८

सरासरी वय: ३४.४

सत्यात सरासरी वर्षे: १७.६

पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १३.५

[२४ पानांवरील चित्र]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा ११४ वा पदवीधर वर्ग

खालील यादीत, ओळींना पुढून मागे अशा रितीने क्रमांक देण्यात आला आहे आणि नावे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देण्यात आली आहेत.

(१) रोझा, डी.; गॅरीगोलस, जे.; लिंडस्ट्रम, आर.; पॅव्हनेलो, पी.; टेट, एन. (२) व्हॅन हाऊट, एम.; डोनाबयुअर, सी.; मार्टिनेझ, एल.; मिलर, डी.; फेस्ट्रे वाय.; नटर, एस. (३) मार्टिनेझ, पी.; क्लार्क, एल.; मॉन, बी.; फिस्शर, एल.; रोमो, जी. (४) रोमो, आर.; ईडी, एस.; टायमन, सी.; कॅम्पबेल, पी.; मिलर, डी.; रोझा, डब्ल्यू. (५) लिंडस्ट्रम, सी.; गॅरीगोलस, जे.; मार्कविच, एन.; लिंडाला, के.; व्हॅन डेन होईवेल, जे.; टेट, एस.; नटर, पी. (६) मॉन, पी.; पॅव्हनेलो, व्ही.; ईडी, एन.; वेस्ट, ए.; क्लार्क, डी.; मार्कविच, जे. (७) फिस्शर, डी.; डोनाबयुअर, आर.; करी, पी.; करी, वाय.; कार्फानो, डब्ल्यू.; वेस्ट, एम.; टायमन, ए. (८) व्हॅन हाऊट, एम.; कॅम्पबेल, सी.; फेस्ट्रे, वाय.; कार्फानो, सी.; व्हॅन डेन होईवेल, के.; लिंडाला, डी.